मंगळवार, १९ जुलै, २०२२

लोकमततील बदल घडवून आणणारे घटक :- Changing Factor or Causes of Public Opinion

 

लोकमततील बदल घडवून आणणारे घटक :-

Changing Factor or Causes of Public Opinion

लोकमत हे तात्पुरते व विशिष्ट प्रसंगापुरते मर्यादित असते. ते कधीही स्थिर किंवा कायमस्वरूपी नसते त्यात नेहमी बदल होत असतो. लोकमतात बदल घडण्याची कारणे अभ्यासकांनी नोंदविलेली आहेत. लोकमतात झालेल्या बदलातून सत्ताबदल होत असतो उदा. २०१४ च्या १६ व्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचा पराभव होऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलेला दिसतो हा लोकमतातील बदल मानता येईल. रस्किनच्या मते, प्रत्येक चित्राचे व ग्रंथाचे चाहते अलग अलग असतात त्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगात विविध प्रकारचे लोकमत व्यक्त होते. त्यामुळे लोकमत बदलाची पुढील कारणे व घटक सांगता येतात.

१) परिस्थितीतील बदल- परिस्थितीत काळाप्रमाणे नेहमी बदल होत असतो. परिस्थिती होणारे बदल विविध कारणांमुळे असतात. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातील लोकमत आणि १६ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील लोकमत यात जमीन अस्मानचा फरक दिसून येतो. तत्कालीन काळात उपलब्ध असलेली परिस्थिती आणि सद्य:काळातील परिस्थिती यात फार मोठा फरक आहे. त्यामुळे त्या काळाचे लोकमत सद्यःकाळातशक्य नाही. देशाचा आर्थिक विकास, शिक्षण प्रसार, संसूचन माध्यमातील वाढ, राजकीय व प्रशासकीय संस्थाची वाढ, दळणवळण साधनाचा विकास इ. मुळे लोकांच्या राजकीय आकलनात बदल झाल्यामुळे आपोआप लोकमतात बदल झालेला दिसून येतो. ब्रिटिश कालीन कायदे स्वातंत्र्यपूर्व भारताच्या परिस्थितीशी विसंगत असल्यामुळे हे कायदे बदलले जावे असा विचार लोकांना कडून मांडला जाऊ लागला हा बदलेला नवा विचार हा लोकमत बदलाचे निर्देशक मानावे लागेल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिस्थितीत सातत्यपूर्ण व नियमितपणे बदल होत असतात त्यामुळे लोकमतात बदल होणे हा अपरिहार्य नियम आहे.

२) नेतृत्वाचा प्रभाव :- लोकमताल निणार्यक वळण देण्यात नेतृत्वाचा खूप मोठा असतो. नेतृत्वाच्या प्रभावामुळे ही लोकमतात बदल घडून येतो. नेतृत्वाचा प्रभाव इतरांपेक्षा जास्त पडत असतो. नेतृत्वाच्या कार्य आणि व्यक्तिमत्त्वाविषयी असलेल्या आदरातून लोक त्यांच्या मतानुसार वागण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच सर्वसाधारण व्यक्तिच्या मतापेक्षा पंतप्रधानाच्या मताला जास्त महत्त्व असते. नेतृत्व व आकर्षित व्यक्तिमत्व यांचा लोकमतावर खूप प्रभाव पडतो. उदा. इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली बांगलादेश युद्धात भारताला विजय मिळाल्यामुळे १९७१ च्या निवडणुकीत त्यांच्या नवकाँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आणि त्यांची तुलना दुर्गा देवीशी केली जाऊ लागली. भारतात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला अनुकूल लोकमत बनविण्यात नेहरूच्या नेतृत्वाचा मोठा राहिलेला दिसतो.

३) घटनांचा प्रभाव :- एखादया घटनेतून लोकमता एवढया व्यापक प्रमाणात बदल होऊ शकतात की त्याबद्दल कल्पना सुद्धा करू शकणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर भारत आणि चीन देशामधील सांस्कृतिक, ऐतिहासिक संबंध आणि हिंदी-चिनीचा नारा यातून चिनी नागरिकांबद्दल भारतीयांच्या मनात आत्मीयतेची भावना होती मात्र १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यामुळे चीन बदलच्या आत्मीयतेची जागा शत्रुत्व वा संशयाच्या स्वरूपात बदलली. १९६६ मध्ये लोकमत विषयक राष्ट्रीय संस्थेने केलेला एका अभ्यासात १९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धामुळे रशिया व ब्रिटन विषयीच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागला. ताश्कंद करार करण्यात रशियाने बजावलेल्या भूमिकेतून रशियाविषयी भारतीय जनतेत ममत्व निर्माण झाले होते. याचा अर्थ विशिष्ट घटनेतून लोकमत निर्मितीला चालना मिळत असते.

४) संसूचन माध्यमाचा प्रभाव:- वर्तमान पत्रे, रेडिओ, टि.व्ही., राजकीय पक्षाच्या प्रचार मोहिमा इ. माध्यमे लोकमत निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण मानली जातात. या माध्यमाच्या माध्यमातून प्रकाशित होणारी माहिती खरी व विश्वसनीय मानण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये मोठया प्रमाणावर दिसते. या माध्यमानी बातम्या प्रसारित करतांना आशयात बदल केला तरी लोकमतात बदल होण्याची शक्यता असते. संसूचन माध्यमांमुळे लोकमतात बदल होत असल्याने राजकीय पक्ष व नेते माध्यमांना महत्त्व देतात. संसूचन माध्यमाचा प्रसार ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात अधिक असल्यामुळे शासनविरोधी व लोकमताला अनुकूल चळवळीची सुरूवात शहरी भागात होताना दिसते. आधुनिक काळात संसूचन माध्यमांनी लोकमत बदलात महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. १६ व्या लोकसभा निवडणुकी विविध न्यूज चॅनल्स आणि सोशल मिडीयाने अत्यंत प्रभावी भूमिका बजावलेली दिसते.

वरिल घटकामुळे लोकमतात बदल होत असला तरी लोकमताचाही वरील घटकावर प्रभाव पडत असतो. उदा. पंडित नेहरू व्यक्तिमत्व कितीही मोठे असले तरी चीनवर अतिविश्वास ठेवल्यामुळे भारताला भारत-चीन युद्धात पराभव झाल्यामुळे संसदेत आणि देशात त्यांना मोठया प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. १९७१ च्या निवडणुकी दणदणीत विजय मिळविया इंदिरा गांधी १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणी आणि विरोधी पक्ष नेत्यांना दिलेली वागणुकीमुळे १९७७ च्या निवडणुकीत त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. लोकमतात बदल होण्यासाठी काही घटक प्रभावी असले तरी लोकमतामुळेही वरील घटक प्रभावित होतात हे नाकारता येणार नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...