शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

सत्ता संकल्पना अर्थ, व्याख्या आणि वैशिष्टे Concept of Power meaning, Definition and characteristics

सत्ता संकल्पना अर्थ, व्याख्या आणि वैशिष्टे  Concept of Power meaning, Definition and characteristics

सत्ता म्हणजे काय ?:-सत्ता ही राज्यशास्त्रातील मध्यवर्ती संकल्पना मानली जाते. सत्तेशिवाय राजकारण आणि राजकीय व्यवस्थेचा आपण विचार करू शकत नाही. राज्यशास्त्र हे सामर्थ्य आणि सत्तेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास म्हणजे सत्तेच्या विविध प्रकार, कार्य आणि परिणामांचा अभ्यास आहे असे काही विचारवंत मानतात. सत्तेवरच राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व अवलंबून असते. सत्ता ही संकल्पना राज्यशास्त्रापुरती मर्यादित नसून समाजव्यापी संकल्पना आहे. सर्व सार्वजनिक घडामोडीत सत्ता अंतर्भूत असते. परंतु तिचे प्रत्यक्ष दर्शन न होता तिचे परिणाम जाणवत असतात. प्रत्येक सामाजिक कृती हा सत्ता वापराचा अविष्कार असतो. प्रत्येक सामाजिक व्यवस्थेत पदसोपान (कुटुंब) असते हे पदसोपान श्रेष्ठ कनिष्ठ संबंधावर आधारलेले असते. वरिष्ठाकडून आज्ञा दिल्या जातात आणि कनिष्ठाकडून आज्ञापालन घडते ही रचना एक प्रकारे सत्तेचा अविष्कार असते. संघटित स्वरूपाचे सामाजिक जीवन म्हणजे एक प्रकारे सत्तेची संघटना असते याचा अर्थ सामाजिक संबंधात देखील सत्तेचे अस्तित्व आढळून येते. राजकीय प्रक्रियेमागील प्रेरक शक्ती म्हणून सत्तेचा आधुनिक राज्यशास्त्रात विचार केला जातो चार्लस मेरियम, जॉर्ज कॅटलिन, लावेल आणि काप्लान इत्यादी विचारांनी सा संकल्पनेला राजकारणाच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू मानून अभ्यास केलेला आहे. आधुनिक सत्तावादी दृष्टिकोनाचे समर्थक 'राज्यशास्त्र म्हणजे सत्ता संबंधाचा अभ्यास 'होय' अशी व्याख्या करतात. ते राजकीय संबंधाना सत्ता संबंध मानतात. आधुनिक राज्यशास्त्रज्ञ सत्तेचे स्वरूप, सत्ता वाटप, सत्ताधारक कोण व प्रत्यक्ष सत्तेचा वापर कोण करतो आणि सत्तेचे परिणाम काय होतात यांचे अध्ययन करतात.

सत्ता संकल्पनेची अर्थ व व्याख्या:-

१) गिल्ड आणि पामर:- इतरांच्या निर्णयावर, वर्तनावर, धोरणावर आणि मूल्यावर परिणाम घडवून आणण्याची अथवा त्यांवर नियंत्रण ठेवण्याची पात्रता म्हणजे सत्ता होय.

 २) शॉ व पीअर्स :- संघर्षात विरोधी किंवा दुसऱ्या पक्षास सामोपचाराने किंवा सक्तीच्या मागनि स्वतःच्या इच्छेप्रमाण वागावयास लावण्याची क्षमता म्हणजेसत्ता होय.

 ३) लिपसन:- सत्ता म्हणजे आग्रही कृतीद्वारे फलित साध्य करून घेण्याची क्षमता होय.

     वरील व्याख्याचा विचार करता सत्ता संकल्पनेबाबत विचारवंतांमध्ये एकमत दिसून येत नाही. सत्ता ही राज्यशास्त्रातील अत्यंत गुंतागुंतीची संकल्पना आहे म्हणून सत्ता संकल्पनेचा विचारवंतांनी विविध अर्थानी विचार केलेला आहे तरी देखील विविध व्याख्या अभ्यास करता असे दिसून येते की, स्वतःच्या इच्छेनुसार इतरांचे वर्तन नियंत्रित किंवा प्रभावित करणे हा मध्यवर्ती आशय सत्ता संकल्पनेची व्याख्या करताना अभ्यासकांनी गृहित धरलेला आहे.

 सत्ता संकल्पनेची वैशिष्टये :-

आधुनिक राज्यशास्त्रज्ञ सत्तेची वाटणी विषम प्रमाणात झाल्याचे गृहित धरतात. समाजातील काही व्यक्ती इतरांपेक्षा वरचढ असतात त्या व्यक्ती आपल्या इच्छेनुसार इतरांना वागण्यास भाग पाडतात त्यांना सत्ताधारक मानले जाते. सत्ताधाऱ्या इच्छेनुसार वागणाऱ्यांना सत्ताग्राहक मानले जाते. समाजात सत्ताधारकांची सत्ता मूठभर असते त्यांना राजकीय अभिजन म्हटले जाते तर उरलेल्या इतरांना सत्ताग्राहक म्हटले जाते. समाजात सत्ता ही अभिजनसत्ता असते म्हणून सत्ता संकल्पनेची काही वैशिष्ट्ये दिसून येतात.

 १) सत्ता संबंधी असते :- सत्ता संकल्पनेचा स्वतंत्र घटक म्हणून विचार केला जात नाही. सत्ताधारक आणि सत्ताग्राहक या दोहांच्या उपस्थितीत तिचे अस्तित्व असते. सत्ता ही मानवी संबंधात अंतर्भूत असते याचा अर्थ सत्ता आंतरसंबंधात्मक स्वरूपाची असते. मानवी संबंधाचे अस्तित्व असे पर्यंतच सत्तेचे अस्तित्व असते आणि संबंधाचे अस्तित्व संपल्यास सत्ता नाहीशी होते. सत्ता संबंध प्रस्थापित होण्यासाठी वरिष्ठ-कनिष्ठ, शासक-शासित असे संबंध निर्माण होण गरजेचे असते. पैसा, शक्ती, गुण म्हणजे सत्ता नव्हे यांना फारतर सत्ता वापरण्याची साधने मानता येते या साधनाच्या आधारावर व्यक्तीला सत्ता वापरण्याची क्षमता प्राप्त होते कारण सत्ता एकटया व्यक्तीजवळ नसते ती दुसऱ्यावर असावी लागते म्हणजे सत्तेचे स्वरूप संबंधात्मक असते.

 २) सत्ता सापेक्ष असते :- सत्ता ही सापेक्ष असते. संघर्षाशी जे संबंधित असतात त्यांच्याच बाबतील तिला अर्थ असतो. एका बाबतीत असलेली सत्ता दुसऱ्या बाबतीत असेल असे नाही. तसेच एका गटावर असलेली एखादयाची सत्ता दुसऱ्या गटावर चालेलच असे नाही. उदा. मुख्यमंत्र्याची आमदारावर जितकी सत्ता - असेल तितकी खासदार असेलच असे नाही. सत्ता ही व्यक्ती आणि परिस्थितीसापेक्ष असते. एखादया क्षेत्रात सत्ता असलेल्या व्यक्तीस दुसऱ्या क्षेत्रात सत्ता नसते. एकाच व्यक्तीची सत्ता विभिन्न प्रसंगात कमी अधिक असू शकते. उदा. एखादया समाजसुधारकास सामाजिक प्रश्नाबद्दल लोकांचा जेवढा सहकार्य मिळेल तेवढाच ती व्यक्ती राजकारणात सहभागी झाल्यावर मिळणार नाही. काळ व वेळे संदर्भातही सत्ता सापेक्ष असते. सत्ता ही कायमस्वरूपी नसते. आज असलेली एखादयाची सत्ता भविष्यात नष्ट होईल, कमी होईल किंवा वाढेल. साधनसामुग्रीच्या वापराबाबतही सत्ता सापेक्ष असते. एखादी व्यक्ती संपत्ती जारोवर इतरांना प्रभावित करेल तर एखादी व्यक्ती कार्याच्या आधारावर लोकांना प्रभावित करेल याचा अर्थ सत्ता ही विविध घटना, प्रसंग, वेळ आणि परिस्थिती सापेक्ष असते.

 ३) सत्ता संभाव्य व प्रत्यक्ष असते:- सत्ता ही संभाव्य असू शकते. सत्ताविषयक आधार असलेली व्यक्ती तिचा वापर करेल असे नाही अशी क्षमता असलेल्या सत्तेला संभाव्य सत्ता असे म्हणतात. उदा. शासकीय कर्मचारी आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी संपाची धमकी देत असते. शासन देखील अनेकदा इशारा देत असते याचा अर्थ शासनाकडे कारवाई करण्याची संभाव्य सत्ता असते. संभाव्य सत्तेचा वापर होईलच असे नाही अनेकदा संभाव्य सत्ता वापराच्या शक्यतेनेच प्रश्नाचे निराकरण होत असते. उदा. संपकल्यावर शासनाने कार्रवाईच्या आधी दिलेल्या धमकीमुळे संप मागे घेणे. संभाव्य सत्तेने काम भागत नसेल तर प्रत्यक्ष सत्तेचा वापर करावा लागतो. उदा. शासनाने इशारा देऊनही संप मागे घेतला जात नाही तेव्हा संपल्यावर कारवाई करणे म्हणजे प्रत्यक्ष सत्तेचा वापर करणे असते.

 ४) सत्ता परिमाणनक्षम असते :- सत्ता ही परिमाणनक्षम असते. सत्तेचे प्रगट स्वरूप सत्ताग्राहकांच्या वर्तनातून व्यक्त होते. सत्ताधारक सत्ताग्राहकावर किती वर्चस्व गाजवितो याचे अचूक मोजमाप करता येते. सत्तावादी अभ्यासकांनी सत्तेच्या मोजमाप करण्याच्या अनेक शास्त्रीय पद्धतीचा उहापोह केलेला आहे. उदा. अव ब दोन्ही सत्ताधारक आहेत दोन्हीपैकी कोण श्रेष्ठ सत्ताधारक आहे हे ठरविण्यासाठी कोणाच्या इच्छेनुसार जास्त लोक वर्तन करतात या आधारावर श्रेष्ठ कोण आहे हे ठरविता येते.

 ५) सत्ता अमर्याद नसते:- सत्ता ही कधीही अमर्याद नसते. सत्ताग्राहकांची संमती असेल तर सत्ताधारक सत्ता गाजवू शकतो. सत्ताधारक कितीही शक्तीवान असला आणि सत्ताधारकांने ती सत्ता अमान्य केली तर सत्ताधारकाच्या सत्तेला काहीही अर्थ नसतो. सत्ताधारकाने मर्यादाबाहेर जाऊन सत्ता गाजविण्याचा प्रयत्न केला तर सत्ताग्राहकाकडून सत्तेला प्रतिकार होण्याची शक्यता असते. एका निश्चित मर्यादिपर्यंत सत्ताधारक सत्ताग्राहकावर सत्ता गाजवू शकतो.

 ६) सत्ता कमी होत नाही:- सत्ता कधीही कमी होत नाही. समाजातील एका व्यक्तीची सत्ता वाढते तेव्हा दुसन्या व्यक्तीची त्याप्रमाणात कमी झालेली होत नाही. शासन नागरिकांना स्वातंत्र्य देते तेव्हा शासनाचे अधिकार कमी होत नाही कारण शासन जरी नागरिकांना स्वातंत्र्य देत असले तरी अंतिमतः स्वातंत्र्य रक्षणाची जबाबदारी शासनाकडे असते याचा अर्थ सत्ता कमी होत नाही.

 अशा प्रकारे सत्ता संकल्पनेची अंतर्भूत वैशिष्ट्ये सांगता येतात.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video