बहुसंस्कृतिवाद
अर्थ, स्वरूप, उदय, तत्त्वे आणि लक्षणे
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणाचा परिप्रेक्ष्य बदलला. लोकसंख्येचे स्थानांतर व तिच्या पुनर्वितरणामुळे एका राज्याच्या अंतर्गत विविध संस्कृतींचे अस्तित्व दिसू लागले. राज्य अंतर्गत अस्तित्वात असलेले विभिन्न सांस्कृतिक समुदाय आपली स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व कायम ठेवण्यासाठी स्वायत्ततेची मागणी करू लागले. सांस्कृतिक आधारावर केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या विरोधात मतप्रदर्शन करू लागले. त्यामुळे एका राज्यांतर्गत विविध संस्कृतींना स्वातंत्र्य आणि स्वायतत्ता देण्याच्या प्रश्नावर जो विचार विनिमय सुरू झाला त्यातून बहुसंस्कृतिवाद नावाची संकल्पना उदयाला आली.
बहुसंस्कृतिवाद म्हणजे बहुजातीय संस्कृतीला व प्रोत्साहन देणारी संकल्पना आहे. प्रत्येक समाजात विभिन्न प्रकारच्या मान्यता अस्तित्वात असतात. या मान्यतेच्या आधारावर संस्कृतीची उभारणी होत असते. व्यक्ती ही संस्कृतीची जोडलेली असते. व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या अनुभव संस्कृतीत समुदायाद्वारे प्राप्त होत असतात. प्रत्येक संस्कृतीचे मूल्य दुसऱ्या संस्कृतीपेक्षा भिन्न असतात म्हणून सांस्कृतिक संघर्षाचे निराकरण करण्यासाठी विभिन्न संस्कृतीच्या ओळखीला आणि अस्तित्वाला मान्यता देणे गरजेचे असते ही गरज बहुसंस्कृतिवाद पूर्ण करते. बहुसंस्कृतिवाद सांस्कृतिक सापेक्षता व सांस्कृतिक सार्वभौमिकतेला विरोध करून सांस्कृतिक अस्मिता व तिचे अस्तित्व कायम ठेवून एकात्मता निर्माण करणारा आणि सर्व संस्कृतीक समुदायांना समान दर्जा व महत्त्व देणारा विचार आहे.
भीखू पारेख संस्कृतीची तीन तत्वे सांगितले आहेत.
1. प्रत्येक व्यक्ती संस्कृतीशी जोडलेला असतो. संस्कृतीद्वारा निर्मित समाजात व्यक्ती जीवन जगत असतो.
2. प्रत्येक संस्कृतीचा जीवनाविषयी स्वतंत्र दृष्टिकोन अस्तित्वात असतो.
3. प्रत्येक संस्कृतीमध्ये आंतरिक बहुलता वा उपसंस्कृतीतीचे अस्तित्व असते.
या तीन तत्वातील अंतर क्रियांना पारेख बहुसंस्कृतिवाद म्हणतो.
बहुसंस्कृतीवाद म्हणजे राष्ट्रात एकापेक्षा अधिक सांस्कृतिक समूहाचे अस्तित्व असते. सांस्कृतिक विविधता असलेल्या समाजात प्रत्येक सांस्कृतिक समुदायातील लोक आपले वैविध्य कायम ठेवून परस्पर सामंजस्याने आणि सहअस्तित्वाच्या कल्पनेनुसार वास्तव्य करत असतात. राज्य अंतर्गत असलेल्या विविध संस्कृतीचा सन्मान आणि संरक्षणाला महत्त्व देते. सांस्कृतिक अंतराप्रति सन्मान बनविण्यास प्रोत्साहन देते. बहुसंस्कृतिवाद ही संकल्पना विविधतेतून एकता निर्मितीवर भर देते.
बहुसंस्कृतिवाद संकल्पना
उदय-
बहुसंस्कृतिवाद संकल्पना एक दीर्घकालीन प्रक्रियेचा परिणाम मानले जाते. बहुसंस्कृतिवाद ही संकल्पना संस्कृती एकीकरण अवधारणाच्या विरोधातील प्रतिक्रिया मानले जाते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी युरोप व अमेरिकेत सांस्कृतिक एकीकरण प्रक्रियेमुळे अल्पसंख्यांक समाजावर झालेले अन्याय आणि त्यांच्यावर राष्ट्रीय संस्कृती लादण्याच्या प्रयत्नातून बहुसंस्कृतीवादाचा उदय झाला. बहुसंस्कृतिवाद ही अवधारणा दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आली. दुसऱ्या महायुद्धानंतर लोकशाही शासनप्रणालीचा झालेला विकास बहुसंस्कृतिवादाच्या उदयाला कारणीभूत मानला जातो. लोकशाही व्यवस्थेत विभिन्न प्रकारची विभिन्नतेचा आदर केला जातो. बहुमत ही निर्णय घेण्याची कसोटी असली तरी अल्पसंख्यांकांचा अधिकार प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाचा विचार केला जातो. त्यांची ओळख आणि अस्मितेला धक्का लागणार नाही याचा विचार करून नीति निर्माण केले जाते. सत्तरच्या दशकात तिला मान्यता प्राप्त होऊ लागली. बहुसंस्कृतिवाद संकल्पनेच्या आधारावर नीती निर्धारण करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न कॅनडा व ऑस्ट्रेलिया देशांनी केलेला दिसतो. जागतिकीकरणाच्या उदयानंतर बहुसंस्कृतिवाद संकल्पनेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला. भारतात प्राचीन काळापासून बहुविध संस्कृतीचे अस्तित्व आणि सहअस्तित्वाच्या तत्वाला प्रथमपासूनच मान्यता असल्याकारणाने बहुसंस्कृतिवादाला पोषक वातावरण
असल्याचे दिसून येते.
1.सांस्कृतिक ओळख व अस्तित्वाला महत्त्व
2. अल्पसंख्यांकांचे अधिकाराचे समर्थन
3. सांस्कृतिक सापेक्षतेला विरोध- संस्कृतीतील गुणदोष याच्या आधारावर श्रेणीबद्धतेला महत्त्व देणे.
4. संस्कृतीकरणाला विरोध- बहुसंख्यांक समाजाच्या सांस्कृतिक मूल्यांना राष्ट्रीय स्तरावर स्थापित करण्याचा प्रयत्न
5. संस्कृती विविधता व बहुलतेला महत्व
6. संस्कृतिक विचारविनिमय आणि समानतेचे समर्थन
बहुसंस्कृतिवाद संकल्पना
उदयाचे परिणाम- बहुसंस्कृतिवादाच्या उदयामुळे वर्तमान राजकीय व्यवस्थेत संघटित राजकिय समाजाची कल्पना मागे पडली. एक राज्य, एक राष्ट्र आणि एक संस्कृतीच्या कल्पनेऐवजी विभिन्न संस्कृती आणि विभिन्न जीवनशैली विश्वास आणि मूल्यांवर जीवन व्यतीत करणाऱ्या समुदाय एकाच राज्यात अस्तित्वात असल्याचे दिसू लागले. राज्यांतर्गत राहणाऱ्या विभिन्न सांस्कृतिक समूहांना आणि अल्पसंख्यांक सांस्कृतिक समुदायांना समानतेचा दर्जा आणि अधिकारांची सुरक्षेचा बहुसंस्कृतिवादात विचार केला जाऊ लागला. बहुसांस्कृतिक राज्य इतर सांस्कृतिक संस्कृतींचा स्वीकार करून समान दर्जा देतात. अल्पसंख्यांकांवर आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न न करता त्यांचा आदर करतात. बहुसंस्कृतिवाद ही संकल्पना सांस्कृतिक अस्तित्व टिकवण्यासाठी विभेदीकृत अधिकार, मान्यतेचे राजकारण आणि अंतराचे राजकारण इत्यादींना महत्त्व आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box