सामाजिक संशोधन
अर्थ, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि महत्त्व
संशोधन ही एक शास्त्रीय चिकित्सा करण्यासाठी केलेली कृती असते. संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाचा शोध घेता येतो. एखादी घटना प्रसंग व विषयाबाबतची माहिती प्राप्त करता येते. सामाजिक संशोधन हे संशोधनाचा एक भाग असतो. समाजाशी संबंधित संशोधन करणे. समाजात निर्माण झालेल्या सामाजिक राजकीय समस्येच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेऊन त्यावर योग्य उपाययोजना सुचवण्यासाठी सामाजिक संशोधनाचा आधार घेतला जातो.
सामाजिक संशोधन
अर्थ आणि व्याख्या-
v मोझर- सामाजिक घटना आणि समस्या याविषयी नवीन ज्ञान
प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या क्रमाबद्ध संशोधनाला सामाजिक संशोधन असे म्हणतात
v व्हिटने:
"मानवी समूहाच्या संबंधांच्या अध्ययनाचा समावेश समाजशास्त्रीय संशोधनामध्ये होतो.
v सामाजिक जीवनात निर्माण झालेल्या समस्येबद्दल ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाने हाती घेतलेल्या कार्य
योजनेला सामाजिक संशोधन असे म्हणता येते.
सामाजिक संशोधनाच्या कसोट्या-
Ø सामाजिक संशोधन हे सामाजिक घटनेची संबंधित असते. सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंची अध्ययन केले जाते.
Ø समाजातील घडणाऱ्या घटनातील पारस्परिक संबंधांचा अभ्यास करून सामाजिक कार्यप्रणाली समजून घेता येतो.
Ø सामाजिक संशोधन हे अनुभवावर आधारित तथ्यांवर असते
Ø सामाजिक संशोधनात मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो.
Ø सामाजिक समस्यांचे परीक्षण करून त्यांचे समाजावर होणारे परिणाम आणि त्याविरुद्ध शक्य अशा उपाययोजनांचा शोध घेणे.
Ø सामाजिक वास्तव व सामाजिक जीवन यांचा सर्वांगीण अभ्यास करणे.
Ø सामाजिक संशोधन हे पद्धतशीर अध्ययन असते आणि या अध्ययनाचे निष्कर्ष सापेक्ष असतात.
Ø सामाजिक संशोधन सामाजिक नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरते.
सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये
आणि महत्त्व-
Ø सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक घटनांचा अभ्यास करता येतो.
Ø सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून नव्या तथ्याचा शोध घेता येतो व जुन्या तथ्याचे परीक्षण करता येते.
Ø कार्यकारण संबंधाचा शोध घेता येतो.
Ø सामाजिक समस्यांच्या अभ्यास करून निर्मूलनासाठी आवश्यक उपाय योजना सुचवता येतात.
Ø सामाजिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी आवश्यक मार्ग सुचवता येतात.
Ø सामाजिक ताणतणावाचे निराकरण करण्यासाठी विविध
पर्यायांचा शोध घेता येतो
Ø सामाजिक संशोधनातून हाती आलेल्या निष्कर्ष आणि सिद्धांताच्या आधारावर भावी संशोधनाला दिशा व चालना
देता येते.