राजकीय नेतृत्व अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि आधारभूत घटक :
नेतृत्व म्हणजे काय ? :- 'नेता' आणि 'नेतृत्व' हे शब्द अत्यंत प्रचलित आणि लोकप्रिय आहेत. नेतृत्व ही
संकल्पना आज नव्हे तर प्राचीन काळापासून महत्त्वपूर्ण मानली जाते. समूहातील
सदस्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, समूह संरक्षणासाठी आणि समूहांचे दैनंदिन कार्य
चालविण्यासाठी विशेष योग्यता असलेल्या व्यक्तीकडे नेतृत्व सोपविण्याची मानसिकता व
परंपरा प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत कायम चालत आलेली दिसते याचा अर्थ
नेतृत्व ही मानवाची नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे.
प्रत्येक समाजात लोकांच्या आदरास पात्र ठरलेल्या
अनेक महान व्यक्ती जगाच्या इतिहासात निर्माण झालेल्या असतात. त्यांनी आपआपल्या
क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेली दिसते. त्यापैकी अनेकांचा प्रभाव
मृत्यूनंतरही दीर्घकाळ कायम राहिलेला आहे. या सर्वांसाठी नेतृत्व ही संज्ञा
समाजशास्त्रात वापरली जाते. प्रत्येक क्षेत्र व काळात नेतृत्वाचे स्वरूप भिन्न असू
शकतात. पण काही वैशिष्टये मात्र सर्वत्र सारखीच असू शकतात. त्या वैशिष्टयांच्या
आधारावर नेतृत्वाच्या संकल्पनेचा अभ्यास करू शकतो.
राजकीय नेतृत्व अर्थ, व्याख्या-
नेतृत्व ही संज्ञा आपल्या नित्य परिचयाची असली
तरी तिचे संकल्पनीकरण करणे अत्यंत कठीण कार्य आहे. नेतृत्व ही एक सामाजिक समस्या
आहे. निसर्गानि निर्माण केलेल्या विषमतेतून नेतृत्व निर्माण होत असते. समाजातील
विशिष्ट लोकाजवळ उपजत गुण असतात त्यांच्या जोरावर समाजात श्रेष्ठ स्थान किंवा
नेतृत्व प्राप्त करीत असतात म्हणून या संकल्पनेचा अभ्यास समाजशास्र आणि
मानसशास्त्रात निरनिराळया दृष्टिकोनातून केला जात होता. आधुनिक राज्यशास्त्रात
राजकीय नेतृत्व ही महत्त्वपूर्ण संकल्पना मानली जाते आणि या संकल्पनेचा
शास्त्रशुद्धपणे अभ्यास देखील केला जात असतो.
१) चेस्टर बर्नार्ड :- नेतृत्व म्हणजे व्यक्तीच्या वर्तणुकीतील असे
गुण की ज्यामुळे संघटितपणे कार्य करणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या कार्याला
मार्गदर्शन मिळते.
२) जॉर्ज टेरी:- लोकांना प्रभावित करून त्यांची संबंधित
उद्दिष्टये साध्य करणारी कृती म्हणजे नेतृत्व होय.
३) कुंटझ आणि आडोनेल :- नेतृत्व म्हणजे समान उद्दिष्ट सामूहिकरित्या
साध्य करण्यासाठी लोकांचे मन वळविणारी कृती होय.
वरील व्याख्याचा अध्ययन केल्यास असे दिसून येते
की, नेतृत्व म्हणजे दुसऱ्याला प्रभावित करण्याची क्षमता होय. या क्षमतेच्या जोरावर नेता अनेकांना प्रभावित करूनही समूहाला योग्य ती दिशा देऊ
शकतो. समूहाला प्रभावित करण्याची
क्षमता ज्या व्यक्तीकडे जास्त असते त्यांच्याकडे नेतृत्व सोपविले जात असते. नेतृत्व ही
पारस्परिक अंतःक्रिया असते. नेता जरी समूह सदस्यांना प्रभावित करीत असला तरी समूह सदस्य वा
अनुयायी आपल्या व्यवहार वा कृतीतून नेत्याला प्रभावित करत असतात याचा अर्थ नेतृत्व
संकल्पनेत दुहेरी स्वरूपाची आंतरक्रिया असते.
राजकीय नेतृत्वाचे आधारभूत घटक :-
नेतृत्व ही व्यक्तिगत प्रक्रिया मानली जात असली तरी व्यक्ती
व्यक्तीतील आंतरसंबंधातून ती विकसित होत असते. नेतृत्वासाठी नेतृत्व करणारा, नेतृत्व स्वीकारणारा, नेतृत्वाला चालना देणारी परिस्थिती आणि
नेतृत्वाचे कार्य इ. चार घटक आवश्यक असतात. नेता, अनुयायी, गटाचे उद्दिष्ट आणि ते साध्य करण्याचे मार्ग
यानुसार नेतृत्वाचे स्वरूप बदलत असते. नेतृत्वासाठी खालील आधारभूत घटक आवश्यक
असतात.
१) नेता :- नेतृत्व एखादा गटात निर्माण होते. नेतृत्व हे नेहमी गटप्रधान असते. विशिष्ट
हितसंबंधावर आधारित लोकांचा संचाला गट म्हणतात. गट आकाराने लहान वा मोठा असू शकतो.
गटातील कार्याचा व्याप लक्षात घेता त्या गटातील नेत्यांची संख्या कमी जास्त होऊ
शकते. म्हणजे त्या विशिष्ट गटात एक प्रमुख नेता आणि इतर उपनेते असतात म्हणजे नेतृत्व
गटाच्या आधारावर निर्माण होत असते. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात
काही विशेष गुण असतात. त्यात पुढाकार घेण्याची वृत्ती, विश्वास संपादन करण्याची कला, मार्गदर्शन करण्याचबुद्धिमत्ता, पेचप्रसंग सोडविण्यासाठी लागणारे धैर्य, नेत्याचा जन्म, शिक्षण, अनुभव, वकृत्व इ. गुण आवश्यक असतात. अॅरिस्टॉटलने इथॉस, पॅथॉस आणि लॉगॉस हे तीन गुण चांगल्या नेतृत्वासाठी आवश्यक मानले आहेत. इथॉस म्हणजे सामाजिक
भावनिष्ठा त्यातून नैतिक चारित्र्य व मनपरिवर्तन क्षमता दिसते तर पथॉस म्हणजे
कारुण्य हाय. कारुण्याच्या आधारावर लोकांच्या भावनांना होत घालू शकतो व त्यांना
भावनिक प्रेरणा देऊ शकतो. लॉगॉस म्हणजे स्वतःच्या कृतीचे भक्कम व तर्कसंगत
स्पष्टीकरण करून बौद्धिक पातळीवर लोकांना प्रेरित करू शकतो. नेतृत्व कार्य व
परिस्थितीसापेक्ष असते. म्हणून निरनिराळ्या परिस्थितीत एकच व्यक्ती नेतृत्व करताना
दिसत नाही. कारण कार्य आणि परिस्थितीच्या आधारावर नेतृत्व निर्माण होते. याच
आधारावर नेतृत्व देखील बदल होतो. एखादया प्रसंगी एखादी व्यक्ती उत्तम प्रकारे
नेतृत्व देऊ शकेल तीच व्यक्ती "दुसऱ्या परिस्थितीत परिणामकारक नेतृत्व देवू
शकेल याची खात्री नसते त्यामुळे एकच व्यक्ती संपूर्णपणे नेतृत्व करेल असे म्हणता
येत नाही.
२) अनुयायी :- नेतृत्वाच्या संबंधात अनुयायांना सुध्दा महत्त्वाचे स्थान असते. नेता नेतृत्व करता म्हणजे आपल्या अनुयायांना
सोबत घेऊन ध्येयप्राप्तीचा प्रयत्न करतो. त्यासाठी नेत्यांला दोन गोष्टी कराव्या
लागतात. कामाच्या स्वरूपानुसार अनुयायाचे वर्तन घडण्यासाठी त्यांना मार्गदर्शन
करणे व प्रेरणा देणे आणि अनुयायाच्या भावना व काम करतांना जाणवणाऱ्या समस्या
समजावून देणे ही कार्य नेता पार पाडत असतो. गटांच्या व्यवहारात अनुयायी सक्रिय
असले पाहिजेत. नेता व अनुयायी यांचा कार्यभाग परस्परपूरक आहे. नेत्याला सर्व
प्रकारचे सहाय्य करणे हे अनुयायाचे काम असते. यात कार्यात सल्ला देणे, माहिती देणे, मतप्रदर्शन करणे इ. गोष्टीचा समावेश होतो.
अनुयायाची संख्या, निष्ठा, नेतृत्वाची स्वीकृती इ. घटकावर नेतृत्वाचा विकास व प्रभाव आणि
अनुयांयाचे समर्थन अवलंबून असते. अनुयायी आणि नेता यांच संबंध दुमार्गी संबंध
असतो. नेतृत्वाकडून अनुयायांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळते, त अनुयायांकडून नेतृत्वाला माहिती व प्रतिसाद
मिळत असतो. नेतृत्व-अनुयायी सत्तासंबंध नसून समानुभूतिपूर्ण समजुतदारपणाचे संबंध
आहेत हे सूत्र मान्य केले ता दुमार्गी व्यवहारांना महत्त्व प्राप्त होते.
अनुयायांकडून मिळणारे समर्थन वा प्रतिसाद नेत्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा
वा उत्साह वाढविणारा असतो.
३) परिस्थिती :- व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि सभोवतालचे भौतिक आणि सामाजिक पर्यावरण यांच्यात
सतत आंतरक्रिया सुरू असते. नेतृत्वाचे सुप्त गुणा पैलू पाडण्याचे कार्य
पर्यावरणाद्वारे होत असते. व्यक्तीच्या नेतृत्व गुणांना प्रेरदेण्याचे कार्यही
पर्यावरण करत असते. परिस्थितीत गटाची वैशिष्टये, गटातील लोकांची संस्कृती, भौगालिक परिस्थिती, लोकांची बौद्धिक क्षमता, गटातील व्यक्तीचे परस्परसंबंधातून निर्माण
झालेली रचना इ. गोष्टीचा समावेश होतो. गटात नवीन लोकांची भरती व असलेल्याचे
बर्हिगमन यामुळे देखील परिस्थितीत बदल होऊ शकतो. परिस्थिती लक्षात घेऊन नेतृत्व
निश्चित केले जाते. केवळ व्यक्तिमत्त्वाचे गुण महत्त्वाचे नाहीत तर परिस्थितीनुसार
नेतृत्व निर्माण होते. नेतृत्वाला परिस्थिती अनुकुल अथवा प्रतिकुल आहे यावर त्याची
शक्ती व क्षमता ठरते. परिस्थिती अनुकुल असेल तर नेतृत्वाची शक्ती जास्त राहते तर
प्रतिकुल परिस्थितीत नेतृत्वाचा कस लागतो.
४) कार्य :- कार्याच्या आधारावर नेतृत्व निश्चित केले जाते. नेतृत्व करण्यासाठी अनेक
प्रकारची क्षेत्रे असतात. त्यापैकी कोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारचे कार्य करणे
आवश्यक आहे. ते किती प्रमाणात यश अपयश किती मिळाले यावर नेतृत्व अवलंबून असते.
कारण कोणत्या प्रकाराचे कार्य आहे व त्याकरिता कोणत्या प्रकारचे नेतृत्व आवश्यक
आहे हे ठरविणे आवश्यक असते. व्यक्तीगत • नेतृत्वापेक्षा कार्यभाग पार पाडणाऱ्या
नेतृत्वाला आज जास्त महत्त्व आहे. नेतृत्व व्यक्तिगत असते. व्यक्तीव्यक्तींमधील
जवळीक हा तिचा आधार असतो. त्यांच्य आपापसातील क्रिया-प्रतिक्रिया, परस्परांविषयीच्या भावना व अभिवृत्ती
नेतृत्वाच्य दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. नेतृत्व क्रियाशीलतेतून व्यक्त होते
यांचा अर्थ नेतृत्व ही गतिशील संकल्पना आहे.
वरील चार घटकांच्या आधारावर नेतृत्व संकल्पनेची
उभारणी होत असते. या घटकाशिवाय नेतृत्वाची उभारणी होऊ शकत नाही. नेतृत्व ही
संकल्पन आधुनिक काळात महत्त्वपूर्ण बनत चालेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक नेतृत्वा बदलची संकल्पना बदलत चालेली आहे. बदलत्या परिस्थित नेता
आणि अनुयायी यांच्या पारंपरिक भूमिकेत बदल होत आहे. नेतृत्वाच्य आज्ञा वा आदेशा
इतकेच अनुयायांच्या प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण बनल्या आहेत. नेता आणि अनुयायी
यांच्या एकतर्फी प्रभावाचे रूपांतर दुमार्गी स्वरूपाचे बनले आहेत अनुयायांच्या
प्रतिक्रियाचा प्रभाव नेतृत्वावर पडत असतो. नेतृत्व संकल्पनेच्या वाढत्या महत्त्वातून या संकल्पनेचा राज्यशास्त्रात अभ्यास होऊ लागलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box