गुरुवार, ७ जुलै, २०२२

राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे स्वरूप आणि प्रकिया Process and Nature of President of India Election

 

राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे स्वरूप आणि प्रकिया –

घटनेच्या कलम ५४ व ५५ मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीविषयी तरतूदी केलेल्या आहेत. भारतीय राष्ट्रपती पदासाठी अत्यंत किचकट व गुतागुंतीच्या क्रमदेय मतदान पद्धतीद्वारा निवडणूक घेतली जाते. देशाचा सर्वोच्च प्रमुख या नात्याने राष्ट्रपतीची निवड केंद्रसरकार सोबत घटकराज्याचे प्रतिनिधित्व करणारा असावा या व्यापक हेतूने  दोन्ही स्तरावरील प्रतिनिधीचा समावेश केलेला आहे. राष्ट्रपतीची निवडणूक प्रत्यक्ष  की अप्रत्यक्ष व्हावी याबद्दल घटना समितीत चर्चा झाली. भारतीय राष्ट्रपतीपदाचे स्वरूप शासकाचे असल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा अवलंब केला. राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजे जनतेने निवडलेल्या प्रतिनिधिमार्फत केली जाते.

निर्वाचन मंडळ- (Electoral College)- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एक निर्वाचन मंडळाची निर्मिती जाते. निर्वाचन मंडळातील सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत असतात. या निर्वाचन पुढील सदस्यांचा समावेश होतो.

अ) लोकसभेचे सर्व निर्वाचित सदस्य

ब) राज्यसभेचे सर्व निर्वाचित सदस्य

क) सर्व घटकराज्यातील विधानसभेचे सर्व निर्वाचित सदस्य

वरील सदस्यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. राष्ट्रपती पदासाठी मतदान करणाऱ्या संसद आणि विधानसभा सदस्यांचे मतमूल्य सारखे नसते. राष्ट्रपतीच्या निवडणुक विविध राज्यातील प्रतिनिधीत्वाचे प्रमाण सारखे राहील. विधानसभा मत मूल्य ठरविण्याबाबत घटनेत माहिती दिलेली आहे. भारतातील मोठ्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या जास्त आहे. लहान राज्यांची अत्यंत कमी आहे. प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य सारखे ठेवले तर मोठ्या राज्यांचा जास्त प्रभाव पडला असता. लहान राज्यांना संरक्षण बहाल करण्याच्या मत मूल्याचे सूत्र निश्चित केलेले आहे. या सूत्रानुसार राज्याच्या लोकसंख्येला राज्यातून निवडून दिल्या जाणाऱ्या विधानसभा सदस्य संख्येने भागावयाचे आणि या भागाकाराला लहान करण्यासाठी त्याला एकहजारने भागायचे. येणारा भागाकार त्या राज्यातील विधानसभा सदस्या मत मूल्य असेल.

विधानसभा सदस्य मत मूल्याचे सूत्र-

राज्यांची लोकसंख्या                                                     1

राज्य विधानसभा सदस्य मत मूल्य सूत्र-------------------------------------------------------- X---------------

      विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या                               1000

या सूत्रामुळे राज्याची विधानसभा सदस्यसंख्या व लोकसंख्या कमी जास्त असली तरी समतोल साध्य करणे शक्य होते. प्रत्येक राज्याची लोकसंख्या व विधानसभा निर्वाचित सदस्यांची संख्या माहिती असल्यास विधानसभेच्या प्रत्येक सदस्याचे मत मूल्य वरील सूत्राच्या आधारे काढता येते. राज्याराज्यातील मूल्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी वरील सूत्राचा वापर केला जातो.

संसद सदस्य मत मूल्याचे सूत्र

संसद आणि विधानसभा सदस्याच्या मूल्यात समतोल करणे गरजेचे असते. त्यासाठी पटनाकारांनी पुढील सूत्राचा अवलंब केलेला आहे.

                                                          सर्व राज्यातील विधानसभा निर्वाचित सदस्य एकूण मते

संसदेच्या प्रत्येक निर्वाचित सदस्याचे मत मूल्य------------------------------------------------------

                                                                          लोकसभा आणि राज्यसभा निर्वाचित सदस्य संख्या

 

सर्व घटकराज्यातील निर्वाचित विधानसभा सदस्यांचे मत मूल्य काढले जाते आणि त्या सर्व राज्यातील विधानसभा निर्वाचित सदस्यांच्या मत मूल्यांची बेरीज केली जाते, त्या बेरजेला जर निर्वाचित संसद सदस्यांच्या संख्येने भाग  दिला तर संसदेच्या प्रत्येक निर्वाचित सदस्याचे मत मूल्य काढता येते. उपरोक्त दिलेल्या दोन्ही सूत्राचा अवलंब करून विधानसभा आणि संसद सदस्याचे मत मूल्य काढले जाते. मतदान करताना प्रत्येक सदस्य एकच मत देतो पण मोजताना वरील सूत्रा प्रमाणे विधानसभा सदस्य आणि संसद सदस्य मत मूल्य गृहीत धरून मतमोजणी केली जात असते. राज्याराज्यातील विधानसभा सदस्याचे वेगवेगळे असते. परंतु संसद सदस्याचे मत मूल्य मात्र समान असते.

राष्ट्रपती निवडणूक कोटा सूत्र-

राष्ट्रपती निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदान पद्धतीला क्रमदेय वा एकल संक्रमणीय किवा प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धत (Single transferable vote) या नावानी संबोधिले जाते. या पद्धतीत मते वाया जाण्याचा आणि मतविभागणी होण्याचा धोका कमी असतो, तसेच निर्विवाद बहुमतप्राप्त उमेदवाराची निवड करता येते. राष्ट्रपती पदावरील उमेदवार बहुमताने निवडून यावा म्हणून विजयी उमेदवाराला विशिष्ट मतांचा कोटा (Quota) मिळविणे आवश्यक असते. हा कोटा पुढील सूत्रांच्या आधारे निश्चित केला जातो.

 

                                    राष्ट्रपती निवडणुकीत झालेले एकूण वैध मतदार

राष्ट्रपती निवडणूक कोटा     ---------------------------------------------------= 1

                                                      निवडावयाच्या प्रतिनिधी संख्या+ 1

 

वरील सूत्राचा अर्थ म्हणजे निवडून आलेल्या उमेदवाराला निम्मेपेक्षा जास्त म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाले पाहिजे हा आहे.

मतपत्रिका आणि मतदान- क्रमदेय मतदान पद्धती साध्या मतदान पद्धतीपेक्षा भिन्न स्वरूपाची असते. पद्धतीत मतपत्रिकेवर सर्व उमेदवाराची नावे दिलेली असतात. मतदारांना फुलांद्वारे किंवा बटण दाबून मतदान करावयाचे नसते तर उमेदवाराच्या नावापुढे पसंती क्रमांक टाकावयाचे असतात. निवडणुकीत सहभागी उमेदवाराच्या संख्येइतके पसंती क्रमांक टाकता येतात परंतु सर्वच पसंती क्रमांक टाकले पाहिजे असे बंधन मतदारावर नसते. मतपत्रिका खालील प्रकारची असते.

उमेदवाराचे नाव

पसंती क्रम

आकाश

3

चेतन

1

राकेश

4

सुशिल

2

 

 मतमोजणी-  मतमोजणी करताना सर्वप्रथम पहिल्या पसंतीचे मते मोजले जातात. एखाद्या उमेदवाराने कोटा पूर्ण केल्यास त्याला विजय घोषित केले जाते. परंतु कोटा पूर्ण न झाल्यास पहिल्या पसंतीची सर्वाधिक कमी मते मिळालेल्या उमेदवाराला निवडणुकीतून बाद केले जाते आणि त्याच्या पहिल्या पसंतीच्या मतदारांनी दुसऱ्या  पसंतीचे मते कोणाला दिली हे   मोजले जाते व ती मते पहिल्या पसंतीच्या मनामध्ये मिळवून बेरीज केली जाते. या पद्धतीने कोटा पूर्ण झाल्यास उमेदवारास विजयी घोषित केले परंतु तरीही कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. वरील पद्धतीप्रमाणे सर्व कमी मते मिळविणाऱ्या उमेदवाराला बाद करून त्यांच्या तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. अशा पद्धतीने आवश्यक कोटा पूर्ण होईपर्यंत सर्वात कमी मते मिळविणाऱ्या उमेदवारास बाद त्याच्या पुढच्या पसंतीची मते मोजून बेरीज केली जाते. कोटा पूर्ण होईपर्यंत मतमोजणी सुरू कोटा मिळविणाऱ्या उमेदवारास विजयी घोषित केले जाते. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अन्य गुंतागुंतीची किचकट निवडणूक पद्धतीचा वापर केलेला असला तरी डॉ. झाकिर हुसेन बाध्य मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता बाकीच्या निवडणुका जवळपास एकतर्फी झालेल दिसतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...