राजकीय आधुनिकीकरण अर्थ आणि व्याख्या,वैशिष्टये वा
उद्दिष्टये
Political Modernization Meaning, Definition and Objective
or Characteristic
राजकीय आधुनिकीकरण ही एक प्रक्रिया आहे ती सामाजिक व राजकिय जीवनात
अव्याहतपणे चालू असते. समाज हा गतीशील आहे त्यातील लोकांच्या आशा आकांक्षा कधी स्वतःहून तर
कधी कधी इतर बाहय प्रभावामुळे बदलत जातात व त्यानुसार समाजाची रचना बदविण्याचा
प्रयत्न होत असतो असा हा सतत वाढत जाणारा बदल याला आधुनिकीकरण म्हणता येईल. समाजात उपलब्ध
साधनसामुग्रीचा विचारपूर्वक उपयोग करून त्या आधारा समाजात नवीन बदल घडवून आणणेयालाही
आधुनिकीकरण म्हणात येते. पायाच्या देशाच्या प्रभावाने आणि औदयोगिकरणातून समाजाला
स्वरूप बदलते तेवून आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असे मानले जाते. आज
आधुनिकीकरण म्हणजे पश्चिमीकरण असा ठोबळ मानाने अर्थ घेतला जातो अर्थात हा अर्थ
पूर्णपणे योग्य नाही. सर्वच क्षेत्रात आधुनिकीकरणाच्या प्रेरणा पाश्चमात्य
राष्ट्राकडून आलेल्या असल्या तरी आधुनिकीकरण म्हणजे पाश्चिमात्यीकरण असे ठोबळमानाने
मानता येत नाही. आधुनिकीकरणात पाश्चिमात्यीकरणापेक्षा व्यापक प्रक्रिया आहे.
राजकीय आधुनिकरणाच्या व्याख्या:
आधुनिकीकरण ही संकल्पना संदिग्ध स्वरूपाची
असल्याने तिचा नेमक्या भाषेत अर्थ व्यक्त करणे कठीण आहे. आधुनिकीकरण ही सामाजिक व
राजकीय जीवनात अखंड चालणारी प्रक्रिया आहे. समाजातील उपलब्ध साधना बुद्धिनिष्ठ
उपयोग करून नव समाज निर्माण करणे आणि त्यातून समाजाची रचना बदलण्याचा प्रयत्न केला
जातो असा सतत होत जाणारा प्रयत्न म्हणजे राजकीय आधुनिकीकरण होय.
१) रॉबर्ट वार्ड :- आधुनिक समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने उपलब्ध
साधनसामुग्रीचे विचारपूर्वक नियोजन आणि यासंबंधी ती प्रक्रिया असते त्यास
आधुनिकीकरण असे म्हणतात.
२) हटिंग्टन :- मानवी विचार व क्रिया यासंबंधीच्या सर्व
क्षेत्रात बदल घडवून आणणारी बहुमुखी प्रक्रिया म्हणजे आधुनिकीकरण होय,
३) क्लॉद वेल्च:- साधनसामुग्रीच्या विचारपूर्वक वापरावर आधारित व आधुनिक समाज
निर्मितीचा उद्देश असलेली प्रक्रिया म्हणजे आधुनिकीकरण होय.
राजकीय आधुनिकरणाची वैशिष्टये वा उद्दिष्टये :-
राजकीय आधुनिकीकरण ही एकाकी घडणारी प्रक्रिया
नाही. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इत्यादी जीवनाच्या विविध क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे
आधुनिकीकरण चालू असते त्या प्रक्रियेचा अंश राजकीय आधुनिकीकरण असते. पारंपरिक
राजकीय संस्थामध्ये एकाकी बदल होऊ लागतात हे बदल स्थिर झाले की त्याला राजकीय आधुनिकीकरणाचे स्वरूप प्राप्त
होते. उदा. रशिया क्रांतीनंतर हे नवे बदल झाले. ते बदल स्थिर झाल्यानंतर रशियाचे आधुनिकीकरण
झाले असे मानले जाऊ लागले. आज आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेपासून कोणताही देश अलिप्त
राहू शकत नाही. काही देशात ही प्रक्रिया संथगतीने तर काही देशात जलद गतीने असते.
पाश्चिमात्य देशांशी संपर्क आशिया आफ्रिका खंडातील नवीन राज्यात आधुनिकीकरणाची
प्रक्रिया सुरू झाली परंतु स्पित्झ यांनी विसाव्या शतकातील नवीन राज्यात सुरू
असलेली राजकीय आधुनिकीकरणाची प्रक्रियेहून भिन्न आहे. युरोपातील उदारमतवादी किंवा
व्यक्तिवादी विचारसरणीच्या प्रभावाने तेथील आधुनिकीकरण झालेले आहे. परंतु नवीन
राज्यातील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत शासनाचा वाटा व हस्तक्षेप मोठया प्रमाणावर
दिसून येतो. लुसियन यांच्यामते, युरोपीयन देशात राजकीय विकास व आधुनिकीकरणाच्या प्रश्नांची सोडवणूक स्वतंत्र
व अलगपणे करता आली परंतु विकसनशील नवीन राज्यात मात्र सर्व प्रश्न एकाच वेळी
हाताळावे लागत आहेत. राजकीय आधुनिकीकरण ही एकाकी घडणारी प्रक्रिया नाही. जीवनाच्या
विविध क्षेत्रात फार मोठया प्रमाणावर आधुनिकीकरण सुरू आहे त्याचा एक अंश म्हणजे
राजकीय आधुनिकीकरण होय. पूर्वापार चालत आलेल्या राजकीय संस्थात एकाकी बदल होऊ
लागतात हे बदल स्थिर झाले की त्यालाच राजकीय आधुनिकीकरण स्वरूप प्राप्त होते.
१) आधुनिकीकरणाच्या साहयाने समाजातील निरनिराळे राजकीय
प्रश्नाचे विश्लेषण करणे शक्य व सोपे होते. समाजात बदलाचे स्वरूप कोणते हे लक्षात
येऊ शकते.
२) विकसित देशानी आपल्या समोर विकासाच्या दृष्टीने कोणते
ध्येय ठेवले होते. अविकसित देशाने कोणते ध्येय ठेवावे तसेच ही ध्येय कशी प्राप्त
केली जातात व प्रत्यक्षात ती कितपत साध्य होऊ शकतात हे आधुनिकरणाच्या सहाय्याने
लक्षात येऊ शकते.
३) समाज कोणत्या दिशेने प्रगत होत आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक व राजकीय शक्ती कितपत साहय करीत आहे वा
त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण करीत आहे. समाजातील अपेक्षित बदल कितपत व किती
साध्य होऊ शकेल हे आधुनिकीकरणामुळे जाणून घेता येते.
४) आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला भौगालिक मर्यादा नाही. जगात
कोणत्याही भागात तिचा सर्वत्र होऊ शकतो. प्रत्येक देशाची परंपरागत व्यवस्था आहे.
त्यानुसार त्या देशात एक निश्चित स्वरूपाची शक्तीशाली सामाजिक व राजकीय रचना निर्माण झाली असती अशा पस्थितीत आधुनिकीकरणामुळे तुलनात्मक
अभ्यासाला प्रेरणा मिळू शकते.
५) विकसनशील
देशाच्या आशा व आकांक्षाची माहिती आधुनिकीकरणामुळे शकते. या देशात आकांक्षा कशा
निर्माण होतात त्यापूर्ण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात याची माहिती प्राप्त होऊ
शकते.
६) आधुनिकीकरणाच्या सहाय्याने विकसित देशातील उपलब्धी याचे
स्वरूप लक्षात येऊ शकते. आणि त्यांचे मापन करता येते. विकसित देशाचे आधुनिकरणाचे
उदाहरण समोर ठेवून आपल्या देशाच्या आधुनिकीकरणाचे स्वरुप निश्चित करू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box