शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

राजकीय आधुनिकीकरणाचे परिणाम- Impact of Political Modernization

 

राजकीय आधुनिकीकरणाचे परिणाम- Impact of Political Modernization 

राजकीय आधुनिकीकरण ही एकाकी घडणारी प्रक्रिया नाही. राजकीय आधुनिकीकरण सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात होणाऱ्या बदलावर अवलंबून असते. एक व्यापक स्वरूपाच्या आधुनिकीकरणाचा राजकीय आधुनिकीकरण एक भाग आहे. परंपरागत राजकिय व्यवस्थेत हे बदल स्थिर स्वरूपात कायम झाले म्हणजे ती राजकीय व्यवस्था आधुनिक स्वरुपाची मानली जाते.

१) परंपरागत राजकीय व्यवस्थेत सत्तेचे स्थान श्रेष्ठ वर्गात जन्म व स्थानावर आधारित असे. आधुनिक व्यवस्थेत उपलब्धी व गुणवत्ताच्या आधारावर निश्चित केले जाते. अशा पद्धतीने परंपरागत राजकीय सत्तेची रचना बदलून आधुनिक राजकीय सत्तेची रचना तयार केली जाते.

२) आधुनिक राजकीय व्यवस्थेत ऐहिक आणि निधर्मी स्वरूपाची राष्ट्रीय सत्ता उदयास येते अशी सत्ता केंद्रीत स्वरूपाची असून तिचे विकेंद्रीकरण निरनिराळ्या राजकीय विभागात झालेले दिसते.

 ३) राजकीय व्यवस्थेत सतत वाढत जाणाऱ्या मागण्यांना तोंड देण्यासाठी व त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी विभागीय व वैशिष्टयपूर्ण अशा राजकीय संघटना स्वरूपाच्या रचना निर्माण होतात, तशा रचनाचे जाळे आधुनिक व्यवस्थेत निर्माण झालेले दिसते.

४) राजकीय व्यवस्था व व्यक्ती या दोहात एक प्रकारचे तादात्म्य प्रस्थापित झालेले असते. आपण एका राजकीय व्यवस्थेचे घटक आहोत याची जाणीव व्यक्तीला होते यालाच नागरीकत्वाची भावना असे म्हणतात.

५) राजकीय व्यवस्थेच्या व्यवहारात लोकांचा वाढता सहभाग दिसून येतो. राजकीय व्यवस्थेची अंतिम शक्ती जनता असते. शासकीय श्रेष्ठजनाला याच आधारावर अधिमान्यता प्राप्त होते. शासकीय सत्ता जबाबदार स्वरूपाची समजली जाते. जनता व शासकिय श्रेष्ठजन यात मध्यस्थ म्हणून राजकीय पक्ष, दबा सारखा रचना उदयास येतात.

) राष्ट्रीय राजकीय व्यवस्था व आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था यात संबंध जोडला जातो आणि दोहात परस्पर देवाणघेवाण त्या ऐकमेकांवर परिणाम करित असतात.

 ७) शासकिय व्यवस्था ही विभेदित व कार्यात्मक दृष्टीने संघटित करण्यात आली असते. शासकीय रचनात अंतर्गत एकीकरण साधण्यात आलेले दिसते.

८) राजकीय निर्णय विवेक युक्त व निरपेक्ष कार्यविधीच्या आधारावर घेतले जातात.

९) विधीव्यवस्था ही निरपेक्ष व अवैयक्तिक स्वरूपाची असते. न्यायिक नियामक व्यवस्था कायदयावर आधारित असते.

१०) आधुनिकीकरणामुळे परंपरागत समाज रचनेच्या कार्यभागाला गीण स्थान प्राप्त होते.

११) परंपरागत मूल्य व्यवस्थाचे स्थान नवीन मूल्य व्यवस्था धारण करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video