शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

राजकीय आधुनिकीकरणाचे अभिकरणे वा माध्यमे- Means of Political Modernization

 

राजकीय आधुनिकीकरणाचे अभिकरणे वा माध्यमेMeans of Political Modernization 

राजकीय आधुनिकीकरण ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या संचालनासाठी अधिकर्त्याची गरज असते. राजकीय आधुनिकीकरणात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात असते. त्यांच्याद्वारे राजकीय आधुनिकीकरणाचे उद्देश व लक्ष्यप्राप्ती केली जात असते त्यांनाच अभिकरणे असेही म्हटले जात असते. राजकीय आधुनिकीकरणाचे अभिकरणे आधुनिकीकरण प्रक्रियेला गतीशील बनविण्याचे कार्य करीत असतात. राजकीय आधुनिकीकरणाचे अभिकरण पुढीलप्रमाणे होत.

१) राजकीय अभिजन- सर्व समुदायात व समाजात मूठभर असे योग्य व संपन्न लोक असतात त्यांना राजकीय अभिजन असे म्हणतात. त्यांची संख्या मूठभर असली तरी ते सामान्य लोकांना प्रभावित करून त्यांचे नेतृत्व करत असतात. अभिजन वर्ग संख्येने अत्यअल्प असतो. सर्वसामान्य जनता अभिजनाच्या मार्गदर्शन आणि आदेशानुसार वाटचाल करीत असतात. हा वर्ग आपला प्रभाव कायमस्वरूपी टिकविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात त्यासाठी जनआकांक्षाची पूर्ती करण्याचा प्रयत्न करीत असतात. जनतेच्या अनुपयोगी, परंपरागत मूल्य आणि संस्थाच्या जागी नवीन मूल्य आणि संस्थाची प्रस्थापना करण्याचा प्रयास करीतअसतात समाजावर असलेल्या त्यांच्या प्रभावामुळे जनता या नव्या बदलाचा स्वीकार करत असतात. या पद्धतीने अभिजन वर्ग आधुनिकीकरण प्रक्रियेला गती देतात. राजकीय आधुनिकीकरण प्रक्रियेतून परंपरागत अभिजन वर्गाचे स्थान नवीन अभिजन वर्ग घेत असतो हा वर्ग राजकीय आधुनिकीकरण प्रक्रियेला नेतृत्व प्रदान करतो.

२) बुद्धिजीवी वर्ग :- समाज आणि राजकीय व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत बुद्धिजीवी वर्गाची भूमिका निर्णायक मानली जाते. बुद्धिजीवी वर्ग सातत्याने नवीन नवीन चिंतन मनन करीत असतो. कालपरत्वे मूल्य आणि संस्थाची समीक्षा करून त्यात काळानुरूप बदल घडवून आणण्यासाठी विवेकपूर्ण उपाययोजना सूचवित असतो. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची साधने देखील सुचवित असतो. वास्तविक बुद्धिजीवी वर्गाकडे कोणत्याही प्रकारची सत्ता नसते परंतु ते बुद्धिच्या जोरावर आपला प्रभाव प्रस्थापित करत असतात. त्यांच्याकडे असलेल्या योग्यता जाणून राज्यकर्ता वर्ग त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेत असतात याचा अर्थ बुद्धिजीवी वर्ग अप्रत्यक्ष पद्धतीने राजकीय आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गतिशील बनविण्यात सहकार्य करीत असतात. लोकशाही व्यवस्थेत बुद्धिजीवी वर्ग राजकीय आधुनिकीकरणाच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी मदत करीत असतात.

३) आर्थिक विकास :- आर्थिक विकास देखील राजकीय आधुनिकीकरण प्रक्रियेस सहाय्यक ठरत असतो. आर्थिक विकासातून उत्पादन आणि तंत्रज्ञानाचा विकास होत असतो. तसेच आर्थिक विकास समाजाची औद्योगिक स्थिती स्पष्ट करत असतो. आर्थिक विकासातून व्यक्तीचे दरडोई उत्पन्न आणि राहणीमानात दर्जात फरक पडत असतो. वाढत्या उत्पन्न वाढीतून व्यक्तीची राजकीय समज विकसित होऊन आधुनिकीकरण प्रक्रियेला गती प्राप्त होत असते. उदा. युरोपात औद्योगिकीकरणातून आधुनिकीकरण प्रक्रियेचा जन्म झाला. आर्थिक विकासातील गतीने वेग घेतल्यानंतरच आधुनिकीकरणाची प्रक्रियेने गती पकडलेली दिसते त्यातून समाजात नवी मूल्य आणि संस्थाचे महत्त्व वाढू लागले.

४) राजकीय विचारसरणी :- आधुनिक काळात राजकीय व्यवस्थेच्या आधुनिकीकरणात राजकीय विचारप्रणालीने फार मोठी भूमिका बजावलेली दिसते. राजकीय पक्ष आधुनिकीकरण प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी राजकीय विचारप्रणालीचा आधार घेत असतात. राजकीय पक्ष विचारसरणीच्या आधारावर विभिन्न वर्गामध्ये मूल्यात्मक एकात्मता विकसित करण्याचा प्रयत्न करतात तसेच राजकीय आधुनिकीकरणाच्या बाजूने लोकमत निमितीचा प्रयत्न करीत असतात. जगाच्या इतिहास साम्यवाद, उदारमतवादी विचारसरणीने ही भूमिका प्रभावीपण पार पाडलेली आहे. आधुनिक काळात कल्याणकारी राज्य या विचारप्रणालीने आधुनिकीकरण प्रक्रियेच्या गति देण्यात प्रभावी ठरलेली आहे.

५) संसूचन माध्यमे- राजकीय आधुनिकीकरण प्रक्रियेत संसूचन माध्यमाची भूमिका महत्वपूर्ण मानली जाते. वर्तमानपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन, सिनेमा, इंटरनेट इत्यादी प्रभावी संसूचन माध्यमे आहेत. या साधनाच्या माध्यमातून आधुनिकीकरण प्रक्रियेला सुगम आणि सोधी बनवत असतात. ही साधने विभिन्न वर्गामधील मूल्यात्मक एकता प्रस्थापित करत असतात, समाजात एकीकरण भावना निर्माण करतात, सार्वजनिक हिताप्रति जागरुकता विकसित करत असतात तसेच संसूचन माध्यमे आधुनिकीकरण प्रक्रियेच्या समर्थनार्थ जनमत तयार करीत असतात.

 ६) सामाजिक गतिशीलता :- समाजात होणाऱ्या आर्थिक बदलातून समाजाच्या भौतिक परिस्थितीत परिवर्तन होऊन सामाजिक गतिशीलतेला प्राधान्य विकासामुळे नागरीकरण वाढत असते. वाढत्या नागरीकरणामुळे "मिळते. आर्थिक ग्रामीण भागातून नगरामध्ये स्थलांतराचे प्रमाण वाढत असते. स्थलांतरीत समूहात अपलेल्या परंपरागत मूल्यांमध्ये शहरात वास्तव्यामुळे बदल होत असतो. तसेच नागरीकरणामुळे परंपरागत मूल्याचा प्रभाव कमी होत जाती, सामाजिक गतिशीलतेतून अनेक सामाजिक परिवर्तनाला चालना मिळत असते. सामाजिक गतिशीलतेतून राजकीय आधुनिकीकरण प्रक्रियेला गती प्राप्त होत असते.

७) शासकीय शक्ती :- राजकीय आधुनिकीकरणासाठी काही देश सरकारी सत्तेचा उपयोग करत असतात. विशेषतः विकसनशील सरकारी शक्तीचा वापर करून आधुनिकीकरण प्रक्रियेला वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. विकसनशील देशात सर्वकष सत्ताधारी शासकीय शक्तीचा वापर करून औद्योगिकीकरणाला चालना देतात, सामाजिक परंपरेचा प्रभाव आणि शिक्षणप्रसारासाठी देखील शासकीय दंडशक्तीचा वापर करीत असतात. मात्र काही विचारवंताच्या मते सर्वकष शासनाद्वारे केले जाणारे प्रयत्न आधुनिकीकरणाचे भाग मानले जात नाही. हन्टिंगटनच्या मतानुसार, लोकतांत्रिक मूल्य आणि राजकीय नीतीनिर्माण करण्यात जनसहभागिता राजकीय आधुनिकीकरणाचे मुख्य लक्षण आहे. परंतु सर्वकष शासनपद्धतीच्या आधुनिकीकरणात याचा अभाव असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला राजकीय आधुनिकीकरणात सामील करता येणार नाही. मात्र काही विकसनशील देशात लोकतांत्रिक मूल्याचा वापर करून राजकीय आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. विकसनशील देशातील प्रभावशाली नेतृत्व विकासासाठी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सरकारी शक्तीचा वापर करून व्यापक बदल घडवून आणत असते. उदा. भारतात स्त्रियाबद्दल अनेक अनिष्ठ प्रथा नष्ट करण्यासाठी कायदेशीर तरतूदीचा वापर केलेला दिसतो.

अशा प्रकारे राजकीय आधुनिकीकरण प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी वरील अभिकरणे सहाय्यक ठरत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...