राजकीय आधुनिकीकरणाचे पेचप्रसंग वा अडथळे आणि
समस्या :
Dilemma, obstacles and Problem of Political Modernization
राजकीय आधुनिकीकरणाच्या प्रश्नाने विकसनशील वा नव्याने स्वतंत्र
राष्ट्रांसमोर पुढील पेचप्रसंग निर्माण होतात.
१) विकसनशील व अविकसित देशातील लोकांना परंपरागत गोष्टी
आवडतात कारण त्यांच्यावर तसे संस्कार झाले असतात. परंपरागत सांस्कृतिक
मूल्यासंबंधी त्यांच्यात आदराची भावना असते त्याचे पालन ते निष्ठेने करतात.
आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे परंपरागत समाजात अनेक बदल घडून येतात. हे बदल लोक
सहजासहजी स्वीकारत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर एक पेचप्रसंग निर्माण होतो. नवीन
मूल्य स्वीकारून परंपरागत मूल्यांना तिलांजली दयावी की आधुनिकीकरणाच्या
प्रक्रियेबाबत उदासिन राहावे अशा रितीने समाजाची घडी बिघडू द्यायची नाही असा
पेचप्रसंग होय. पस्परविरोधी दोन संस्कृतीच्या प्रभावाखाली हे देश गोंधळात सापडले
आहेत. पारंपरिक गट, निष्ठा व प्रवृत्ती सहजासहजी त्याग करता येत नाही. मात्र
अधिक व्यापक निष्ठा आणि वैचारिकतेचे तत्त्व या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.
२) दुसरा पेचप्रसंग म्हणजे आधुनिकीकरण जुन्या संस्थाना एक
प्रकारे आव्हान देत असते. त्यात विस्कळीतपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
पण होत असलेला बदल संघ की जलद स्वरूपाचा असावा. उत्क्रांती की क्रांतीच्या
मार्गाने करावा असे अनेक प्रश्न परंपरागत समाजातील लोकांसमोर उभे राहतात. वास्तविक
लोक नवीन गोष्टी स्वीकारण्यास फारसे उत्सुक नसतात. जुन्या गोष्टी कायम राहाव्या ही
लोकांची इच्छा असते. म्हणजे अशा लोकांची पुराणमतवादी दृष्टी ही एक आधुनिकीकरणातील
पेचप्रसंग स्वरूपाची समस्या असते.
३) परंपरागत समाजात जातीय भावना तीव्र स्वरूपात आढळून
येतात. जातीजातीत परस्पर वैमनस्य असते. या परिस्थितीत निधर्मी भावना निर्माण करणे
अवघड कार्य असते. आधुनिकीकरण जातीय भावना नाकारतो. तेव्हा समाज जीवनात ऐहिक व
निधर्मी दृष्टिकोण स्वीकारावा की जातीय निष्ठाकायम ठेवावी अशा पेचप्रसंगात लोक
सापडतात. ४) परंपरागत समाजात राष्ट्रीय एकात्मतेची भावना फार क्षीण स्वरूपाची
असते. स्थानिक अभिमानाला जास्त प्राधान्य असते. वंश, धर्म, प्रांत, भाषा आधारावर लोकांत विभिन्नतेची भावना निर्माण
झाली असते. राष्ट्रीय एकात्मतेची भावना आधुनिकीकरणाद्वारे बळकट केली जाते.
राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणाऱ्या गोष्टी कशा
नेस्तनाबूत करावयाच्या हा एक महान पेचप्रसंग विकसनशील राष्ट्रासमोर निर्माण झालेला
असतो.
५) राजकीय व्यवस्थेशी एकरूपता साधली जात नाही. राष्ट्रवादी
चळवळीतून स्वातंत्र्य मिळविले असले तरी भविष्यकाळासाठी कोणती ध्येय बाळगावीत
याविषयी लोकांचे एकमत होऊ शकत नाही. विकसनशील देशासमोर लोकशाही, साम्यवाद, हुकूमशाही असे निरनिराळे पर्याय असतात. परंपरागत
समाज अधिनायकवादी स्वरूपाचा असतो. निर्णयनिर्धारणात जनतेचा सहभाग विशेष नसतो.
आधुनिकीकरणामुळे अधिनायकवादी जाऊन लोकशाही येते. लोकशाहीत निर्णय निर्धारणात
जनतेचा सहभाग फार मोठा असतो. अशाप्रकारे आधुनिकीकरणामुळे परंपरागत अधिनायकवादी व
आधुनिक लोकशाहीत संघर्ष निर्माण होतो. या संघर्षात लोकशाही यशस्वी होते त्यामुळे
अधिनायकशाहीला लोकशाही एक प्रकारचे संकट वाटते.
६) परंपरागत समाजात लोकांना त्यांच्या स्थितीबद्दल विशेष
असमाधान वाटत नाही. पण आधुनिकीकरणामुळे नवीन नवीन विचार प्रवाह समोर येतात.
त्यामुळे ते आपली सामाजिक स्थिती पडताळून पाहतात त्यातून त्यांच्यात असंतोष
निर्माण होतो. खियांना गौण दर्जा, कामगाराची दयनीय स्थितीमुळे असमाधान निर्माण होऊन ते
संघर्षाला तयार होतात. हा असंतोष कमी करून जनतेत समाधानाची भावना निर्माण करणे ही
विकसनशील देशांना फार त्रस्त करणारी समस्या वाटवे,
७) परंपरागत समाजात समता मानत नाही. समाजात अल्पसंख्य लोक
श्रेष्ठजन असतात. इतर सर्वसाधारण जनता असते. श्रेष्ठजनानी शासन करावे कारण शासन
करण्याकरिता तेच लोक लायक मानले जातात. अशाप्रकारे श्रेष्ठ व कनिष्ठ या आधारावर
परंपरागत समाजाचे व्यवहार चालतात तर आधुनिकीकरणामुळे सर्व लोक समान मानले जातात.
कनिष्ठातील कनिष्ठाला देखील राज्य चालविण्यासाठी लायक समजले जाते. या परिस्थितीत
परंपरागत असमानता व आधुनिकीकरणामुळे निर्माण होणारी समानता यात विरोध निर्माण होतो तो नाहीसा करणे परंपरागत समाजाला
फार कठिण जाते.
८) सामाजिक न्याय संकल्पना आधुनिकरणामुळे निर्माण झालेली
आहे. ती परंपरागत समाजाच्या पचनी पडणे शक्य नाही. कारण परंपरागत समाजात सामाजीक
न्यायाची संकल्पना आढळत नाही. त्यामुळे आधुनिकीकरणामुळे निर्माण झालेली सामाजिक
न्याय संकल्पना व परंपरागत समाजात तिचा अभाव यातून विकसनशील देशाला मार्ग काढणे
अवघड जाते.
अशा प्रकारे आधुनिकीकरणामुळे वरिल समस्या निर्माण होतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box