महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा रचना व कार्य-
Maharashtra University Senate Composition and Function
अधिसभा ही सर्व वित्तीय अंदाजाकरिता आणि अर्थसंकल्पीय
विनियोजन आणि विद्यमान आणि भविष्यातील शैक्षणिक कार्यक्रमाच्या बाबतीत सामाजिक
परिणामांची माहिती देण्याकरिता प्रमुख प्राधिकरण आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 कलम 28 (2) मध्ये
अधिसभेची रचना दिलेली आहे.
विद्यापीठ अधिसभा कार्यकाल व बैठक-
- विद्यापीठ अधिसभेचा पाच वर्षाचा कालावधी असतो.
- कुलपती हा विद्यापीठ अधिसभेचा अध्यक्ष असतो. त्याच्या अनुपस्थितीत कुलगुरू अध्यक्ष असतो.
- विद्यापीठ अधिसभेची वर्षातून दोन बैठका होतात. त्यांचा दिनांक निश्चित करण्याचा अधिकार कुलपतींना असतो.
अधिसभा
पदसिद्ध सदस्य-
कुलपती, कुलगुरू, प्र कुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता, संचालक परीक्षा व मूल्यमापन, वित्त व लेखा अधिकारी, विद्यापीठ उप परिसराचे संचालक, संचालक नवोपक्रम, नव संशोधन व साहचर्य, संचालक उच्च शिक्षण किंवा त्यांनी नामनिर्देशित
केलेला सहसंचालक दर्जाचा व्यक्ती, संचालक तंत्र शिक्षण किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला
सहसंचालक दर्जाचा व्यक्ती, संचालक, ज्ञान स्रोत केंद्र, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ, विद्यापीठाचा विद्यार्थी परिषद अध्यक्ष आणि सचिव
अधिसभा निर्वाचित सदस्य-
- प्राचार्य गटातून दहा निर्वाचित सदस्य-S.T, S.C.,N.T, OBC, Women प्रत्येकी प्रवर्गातील एक सदस्य आणि उर्वरित पाच सदस्य खुला प्रवर्गातील
- संलग्न महाविद्यालयातील व्यवस्थापनाची सहा प्रतिनिधी- S.T, S.C.,N.T, OBC, प्रवर्गातून आळीपाळीने किमान एक सदस्य आणि एक महिला सदस्य आणि उर्वरित तीन सदस्य खुला प्रवर्गातील
- संलग्न महाविद्यालयातील अध्यापकांचे दहा प्रतिनिधी- सदस्य-S.T, S.C.,N.T, OBC, Women प्रत्येकी प्रवर्गातील एक सदस्य आणि उर्वरित पाच सदस्य खुला प्रवर्गातील
- नोंदणीकृत पदवीधर गटातील दहा प्रतिनिधी- S.T, S.C.,N.T, OBC, प्रवर्गातून आळीपाळीने किमान एक सदस्य आणि एक महिला सदस्य आणि उर्वरित पाच सदस्य खुला प्रवर्गातील
- विद्यापीठ अध्यापक गटाचे तीन सदस्य- S.T, S.C.,N.T, OBC, प्रवर्गातून आळीपाळीने किमान एक सदस्य आणि एक महिला सदस्य आणि उर्वरित एक सदस्य खुला प्रवर्गातील
अधिसभा नामनिर्देशित सदस्य-
· कुलपती द्वारे दहा नामनिर्देशित सदस्य- त्यापैकी चार कृषी समाज कार्य सहकार, विधी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उरलेल्या सहापैकी उद्योग क्षेत्रातील, शिक्षणतज्ञ, पर्यावरण तज्ञ,
- · कुलगुरू नामनिर्देशित दोन सदस्य- एक विद्यापीठ परिसरातील अध्यापकेतर कर्मचारी तर दुसरा संलग्न महाविद्यालयातील अध्यापकेतर कर्मचारी
- · विधानसभा अध्यक्षांनी अडीच वर्षासाठी नामनिर्देशित केलेले दोन विधानसभा सदस्य
- · विधान परिषद सभापतीने अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नामनिर्देशित केलेला एक सदस्य
- · कुलगुरूंनी एका वर्षासाठी नामनिर्देशित केलेला नगरपालिका किंवा महानगरपालिका सदस्य
- · विद्यापीठ परिसरातील जिल्हा परिषद शिक्षण समितीचा एक वर्षाच्या आळीपाळीने नामनिर्देशित केलेला एक सदस्य
अधिसभा
अधिकार व कार्य-
- · विद्या, संशोधन, विकास, प्रशासन व व्यवस्था यासारखे विद्यापीठाचे आवश्यक असलेले सर्व क्षेत्रांमध्ये करता येऊ शकेल अशा सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्राधिकरणांना सूचना करणे.
- · विद्यमान विद्या विषयक कार्यक्रम व सहयोगी कार्यक्रम यांचे पुननिरीक्षण करणे.
- · उच्च शिक्षणाच्या सामाजिक गरजांशी सुसंगत असे नवीन विद्या विषयक अध्ययनक्रम सुचवणे.
- · विद्यापीठाच्या विकास व सुधारणांसाठी उपाय सुचवणे
- · व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार सन्मान जनक पदव्या प्रदान करणे.
- · विद्यापीठाची स्थूल धोरणे आणि कार्यक्रम यांचे पुननिरीक्षण करणे, सुधारणा व विकासासाठी उपाय सुचविणे.
- · विद्यापीठाचे वार्षिक वित्तीय पत्रक, लेखापरीक्षणावर अहवाल, अनुपालन अहवाल यावर चर्चा करणे आणि संमत करणे.
- · विद्या परिषदेने शिफारस केलेल्या महाविद्यालय आणि परिसंस्थांसाठी सम्यक आणि वार्षिक योजनेस मंजुरी देणे.
- · विद्यापीठ कुलसचिवाने सादर केलेला विद्यार्थी तक्रार निवारण अहवालाचे पुननिरीक्षण करून ते स्वीकृत करणे.
- · संबंधित संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने सादर केलेल्या अहवाल पुननिरीक्षण करून ते स्वीकृत करणे.
- · विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य क्षेत्रात करता येतील अशा सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्राधिकरणांना सूचना देणे.
- · विद्यापीठासाठी परिनियम तयार करणे, त्यात सुधारणा करणे वा निरसित करणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box