रविवार, १२ जानेवारी, २०२५

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

 

ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्याने घेतली

कायदा उद्देश -

ग्राहक हक्काचे संरक्षण, प्रभावी प्रशासन आणि ग्राहकांच्या विवादाचे निराकरण करण्यासाठी प्रशासकीय प्राधिकरण स्थापना, निर्माते, उत्पादक आणि विक्रेत्यांकडून केल्या जाणाऱ्या शोषणापासून संरक्षण आणि ग्राहक हिताचे रक्षण करण्यासाठी हा कायदा करण्यात आला.

या कायद्याअंतर्गत ग्राहकांचे संरक्षण, नुकसान भरपाई, निवारण यंत्रणा, ग्राहक हक्क आणि ग्राहक शिक्षण अयोग्य माहिती, भेसळ दिशाभूल करणाऱ्या जाहिराती इत्यादींचा देखील समावेश करण्यात आला 

ग्राहक म्हणजे कोण- ग्राहक शब्दाची कलम २ (७) नुसार व्याख्या करण्यात आली. ग्राहक एक व्यक्ती किंवा व्यक्ती समूह असतो. तो सेवा किंवा उत्पादन वापरासाठी खरेदी करतो. पुनरविक्रीच्या उद्देशाने नाही.

ग्राहक ग्राहक संरक्षण कायदा प्रकिया-

ग्राहक स्वरूप- असंघटीत, निरीक्षर, अगतिक, हक्काची जाणीव नसलेला

उत्पादक- संघटीत, बाजारपेठेची माहिती असलेला, भांडवलदार

तक्रार कर्ता- ग्राहक,  मान्यताप्राप्त ग्राहक संस्था, सरकार

कायदा फायदा- किमान खर्च, स्वत:ची वकिली, ९० दिवसात न्याय आणि जलद न्याय, वकील लावण्याची गरज नाही, ग्राहक प्रत्यक्ष सहभाग

तक्रार यंत्रणा- जिल्हा ग्राहक न्यायालय वा मंच,

राज्य ग्राहक न्यायालय वा मंच, केंद्र ग्राहक न्यायालय वा मंच

तक्रार विषय- अनुचित व्यापारी प्रथा उदा. छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेणे, सदोष वस्तूबद्दल तक्रार, निकृष्ठ सेवा, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती

 

ग्राहक संरक्षण कायदा वैशिष्ट्ये-

Ø  हा कायदा सर्व वस्तू आणि सेवांना लागू होतो. 

Ø  हा कायदा खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि सर्व क्षेत्राचा समावेश करतो 

Ø  हा कायदा ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही लागू करतो. ग्राहक म्हणजे जे वस्तू आणि सेवेचे अंतिम वापर करते.

Ø   जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय विवाद नियंत्रण त्रिस्तरीय यंत्रणा स्थापन करण्यास मान्यता देतो.

Ø   या कायद्याने विक्रेते निर्माते आणि मध्यस्थ यांच्या विरोधात दंड आणि कारावासाची तरतूद केलेली आहे. 

ग्राहक संरक्षण कायदा महत्व-

Ø  विक्रेते आणि उत्पादकांकडून केला जाणाऱ्या गैर प्रकारापासून ग्राहकांना संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. 

Ø  ग्राहकांना विक्रेत्याने केलेल्या उत्पादकांपासून संरक्षण देऊन ग्राहक हक्क प्रस्थापित करतो.

Ø   दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत बद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करतो. 

Ø  ग्राहक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांना हक्काबद्दल जागृत करतो

Ø  . ग्राहकांची बाजू ऐकण्यासाठी योग्य प्राधिकरणाची स्थापना करण्यास मान्यता देतो.

Ø   विक्रेते, निर्माते आणि मध्यस्थ यांना दंड आणि कारावासाची तरतूद

ग्राहक अधिकार-

Ø  ग्राहक सुरक्षा अधिकार- ग्राहकांच्या आरोग्य आणि जीवनासाठी घातक वस्तू आणि सेवा पासून सुरक्षेचा अधिकार प्राप्त होतो. 

Ø  ग्राहक माहितीचा अधिकार- ग्राहकाला वस्तू सेवांचे प्रमाण, गुणवत्ता, शुद्धता, किंमत आणि  मानांकनाबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो.

Ø  निवडण्याचा अधिकार-ग्राहकाला आवडीच्या वस्तू आणि सेवा निवडण्याचा अधिकार हा कायदा देतो. 

Ø  ऐकण्याचा अधिकार-हा कायदा ग्राहकाचे म्हणणे ऐकण्याचा अधिकार देतो. तक्रार निवारणासाठी योग्य यंत्रणा निर्माण करण्याला मान्यता देतो 

Ø  तक्रार निवारण अधिकार-ग्राहकाला शोषणापासून मुक्ती किंवा भरपाई मिळवण्याचा अधिकार प्रदान करतो त्यासाठी निवारण मंच स्थापन केले जातात 

Ø  ग्राहक शिक्षणाचा अधिकार-उत्पादना संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्याचा ग्राहकाला अधिकार आहे.

Ø   नियमन प्राधिकरण-केंद्रीय, राज्य, जिल्हा ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केलेली आहे हे प्राधिकरण ग्राहक हक्काची उल्लंघनाची चौकशी करून कारवाई करते तसेज ग्राहक हक्क उल्लंघना संदर्भात तक्रारी स्वीकारत असते. 

Ø  ई-सुविधा- व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित राहण्याची हा कायदा परवानगी देतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

Right to be Forgotten विसरण्याचा अधिकार महत्त्व

 Right to be Forgotten विसरण्याचा अधिकार महत्त्व विसरण्याचा अधिकार म्हणजे काय?-      राईट टू बी फरगॉटन म्हणजे विसरण्याच्या अधिकाराची सध्या स...