भारतीय संसद संपूर्ण माहिती/Indian Parliament full information/Indian Polity Parliament
संसद ही भारतातील केंद्रीय स्तरावरील सर्वोच्च कायदा निर्मिती संस्था आहे.
भारतीय कायदेमंडळाला संसद या नावाने संबोधले जाते. भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या
भागात 79 ते 122 मध्ये संसदेची रचना कालावधी कार्यपद्धती अधिकार आणि विशेष अधिकार इत्यादींचा
समावेश आहे.
•
संसद
घटक-
•
भारतीय संविधानानुसार कलम 79 नुसार राष्ट्रपती, राज्यसभा आणि
लोकसभा या तिन्ही घटकांची मिळून संसद बनलेली आहे.
•
राष्ट्रपती हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला
तरी त्याच्या संमतीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. तसेच संसदेचे
अधिवेशन बोलवण्याचा रद्द करण्याचा, अधिवेशन चालू नसताना वटहुकूम काढण्याचा, सार्वत्रिक
निवडणुकीनंतर पहिल्या किंवा प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात संसदेला संबंधित
करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असल्यामुळे त्यांना संसदेचा अविभाज्य भाग मानले
जाते.
•
भारताचे संसद ही द्विगृही आहे. लोकसभा हे संसदेचे प्रथम व
कनिष्ठ सभागृह आहे.
•
लोकसभा
रचना-
•
घटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेत 550 इतके सदस्य असतील. 530 सदस्य
राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष व गुप्त मतदानाद्वारे निवडले जातील तर
20 सदस्य केंद्रशासित प्रदेशातील मतदार संघातून प्रत्यक्ष व गुप्त मतदानाद्वारे
निवडले जातील.
•
संसदेत अनुसूचित
जाती-जमातीं साठी काही जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 84 आणि अनुसूचित
जमातींसाठी 47 अशा एकूण 131% जागा म्हणजे 24.03 %जागा राखीव आहेत.
•
सध्या संसदेची सदस्य संख्या 545 इतकी आहे.
•
106 व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेत 2029 पासून महिलांना 33 टक्के आरक्षण
देण्यात आले आहे.
•
कालावधी- सदस्य 5 वर्ष, घटनेच्या कलम 84 नुसार लोकसभेसाठी 25 वर्ष वय असणे
आवश्यक आहे.
•
राज्यसभा
रचना
•
कलम 80 राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सदन आहे.
•
राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे. त्यातील 238 सदस्य
राज्यांच्या विधानसभांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींकडून निवडले
जातात.
•
उरलेले 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. कला, साहित्य
विज्ञान आणि समाजसेवा क्षेत्रातील बारा व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करत असतो.
•
कालावधी- सदस्य 6 वर्ष, स्थायी सभागृह
•
घटनेच्या कलम 84 नुसार राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्ष वय असणे
आवश्यक आहे.
•
कलम 89 उपराष्ट्रपती हा राज्यसभा पदसिद्ध अध्यक्ष असतो.
•
संसद
अधिवेशन व इतर बाबी-
•
कलम 85 नुसार संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा
राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रपती संसदीय कामकाज मंत्र्याच्या सल्ल्याने अधिवेशन
बोलवत असतो. घटनेनुसार दोन अधिवेशनामध्ये 180 दिवसापेक्षा जास्त अंतर असू नये.
भारतात संसदेची पावसाळी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अशी तीन अधिवेशन बोलवले जातात.
•
गणसंख्या- 1/10 किंवा 10 सदस्य उपस्थिती आवश्यक
•
संसदेचे कामकाज चालवण्यासाठी दोन्ही सभागृहांना स्वतःचे
नियम बनवण्याचा अधिकार कलम ११८ नुसार आपल्या संविधानाने दिला.
•
लोकसभेत किमान १०%
जागा मिळवणाऱ्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद देण्याची कायदेशीर तरतूद
१९७७ पासून आपल्याकडे केली गेली आहे.
•
संसदीय आयुधे-
तारांकित,
अतारांकित
प्रश्न, अर्ध्या तासाची चर्चा, स्थगन प्रस्ताव, अल्पमुदतीची चर्चा, लक्षवेधी सूचना, अडीच तासांची
चर्चा, अविश्वास ठराव, हरकतीचे मुद्दे, शून्य प्रहर इत्यादी
•
संसद
सदस्य अपात्रता-
•
कलम 102 (1) अन्वये लाभाचे पद धारण करणाऱ्या, न्यायालयाने मानसिक
दृष्ट्या विकल किंवा दिवाळखोर घोषित केलेल्या, तसेच भारतीय नागरिक
नसलेल्या सदस्याला अपात्र केले जाऊ शकते.
•
लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार निवडणूक गुन्हा वा
भ्रष्ट व्यवहारात दोषी, दोन वर्षापेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा, तसेच पक्षांतर
बंदी कायद्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.
•
60 दिवसापेक्षा विनापरवानगीने गैरहजर राहिल्यास सदस्यत्व रद्द
होऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box