शनिवार, ३० जुलै, २०२२

राजकीय बदल अर्थ, स्वरूप आणि लक्षणे Political Change Meaning, Nature and symptoms

 

राजकीय बदल अर्थ, स्वरूप आणि लक्षणे Political Change Meaning, Nature and symptoms

राजकीय बदल म्हणजे काय?

राजकीय बदल ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यशास्त्रज्ञानी अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय व्यवस्था ही समाजव्यवस्थेचा एक भाग असते. समाजव्यवस्थेत होणाऱ्या नियमित होणाऱ्या बदलातून राजकीय व्यवस्थेत देखील बदल होत असतात. समाजातील बदलासोबत राजकीय व्यवस्थेत बदल होणे अपरिहार्य असते, परिवर्तनशीलता हे समाजाचे सार्वत्रिक लक्षण असले तरी आधुनिक युगात परिवर्तनाने कमालीचा वेग धारण केलेला आहे. विशेषत: विकसनशील देशात परंपराचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नातून अनेक तणाव निर्माण होतात या तणावाचे निराकरण करण्यासाठी व्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणणे आवश्यक बनते. त्यामुळे विकसनशील देशात ही प्रक्रिया व्यापक प्रमाणावर 'दिसून येते. 'राजकीय बदल' हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. राजकीय बदल संकल्पनेत विकास, विनाश व आधुनिकीकरण तीनही गोष्टी अभिप्रेत असतो. सुधारणा आणि क्रांती हा देखील एक प्रकारचा बदल असतो. सुधारणेच्या माध्यमातून हळूहळू बदल होत असतात तर क्रांतीच्या माध्यमातून अचानक बदल होतात. विकास हा शब्द पूर्वपक्षा परिस्थिती बदल या अर्थाने वापरला जात असतो तर आधुनिकीकरण हा शब्द बदलाची स्थिरता या संदर्भात वापरला जात असतो. 'राजकीय बदल' संकल्पनेत राजकीय अध:पतनाचा विचार करणे गरजेचे असते. बदल हा प्रगतीच्या दिशेने असू शकतो त्याप्रमाणे अधोगतीच्या दिशेने देखील असू शकतो. जनआकांक्षाची पूर्ती करण्यात राजकीय व्यवस्था अपयशी ठरल्यास त्यावेळेस व्यवस्थेचे अधःपतन होण्याची शक्यता असते. व्यवस्था अध:पतनाची विविध कारणे अभ्यासकांनी नमूद केलेली आहेत. 'बदल' हा नेहमी विकासाच्या दिशेने घडवून यांची खात्री नसते. कधीकधी बदल हा विनाशाच्या दिशेने नेणारा असतो. एफ. डब्ल्यू. रिग्ज यांनी काही व्यवस्थामध्ये विकास हा विनाशाचा सापळा ठरण्याची शक्यता असते. उदा. इराणच्या शहाने पाश्चिमात्य देशांच्या मदतीने आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु धर्मांध नेते आणि संघटनांनी आधुनिकीकरण प्रक्रियेस विरोध करून शहाची राजवट संपुष्टात आणली.

राजकीय बदलाची लक्षणे :- ज्या घटनांमधून शासनपद्धतीच्या संरचनामध्ये मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन होते किंवा शासक आणि शासित संबंधात बदल घडतात. नवे सामाजिक संबंध आकाराला येतात त्या घटनाचा समावेश राजकीय बदल संकल्पनेत करता येतो. राजकीय बदलाची पुढीलप्रमाणे लक्षणे आढळून येतात.

१) शासनपद्धतीची पुनर्रचना- शासनव्यवस्थेत औपचारिक आणि अनौपचारिक मार्गाने मूलभूत स्वरूपाच्या बदलाचा राजकीय बदलाच्या संज्ञा मानता येते. कायदयाच्या माध्यमातून शासनपद्धतीच्या रचनेत होणाऱ्या बदलाला औपचारिक बदल होता तर घटनात्मक तरतूदीमध्ये बदल न होता ही बदलत्या काळानुसार शासनाच्या प्रत्यक्ष व्यवहारात बदल होऊन नव्या प्रकारची शासनपद्धती कार्यरत होते त्यास अनौपचारिक बदल मानला जातो. उदा. संसदीय लोकशाही ऐवजी अध्यक्षीय लोकशाहीची स्थापना करणे हा औपचारिक बदल मानता येईल तर संसदीय लोकशाहीत सार्वमत, लोकनिर्णय आणि प्रत्यवाहनाचा अधिकार देने हा दुसऱ्या प्रकारचा बदल मानता येईल. शासनाच्या मूळ रचनेत होणाऱ्या मूलभूत बदल घडत असतो त्यास राजकीय बदल मानता येतो.

२) शासक-शासित संबंधात बदल:- प्रत्येक राजकीय व्यवस्थेत शासक आणि शासित संबंध घटनेने निश्चित केलेले असतात. त्या संबंधाना भंग करून नवे संबंध प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला राजकीय बदल मानले जाते. राजकीय बदल घडवून आणण्यासाठी शासक किंवा शासित दोन्हीपैकी एक घटक पुढाकार घेत असतो. उदा. भारतात जनतेने अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून लोकपाल विधेयक मंजूर करून घेतले. शासन यंत्रणा देखील विविध कायदे, नियम आणि ध्येयधोरणातून जनतेवर नियंत्रण निर्माण करून राजकीय परिवर्तनाला दिशा देत असतात. उदा. १९९१ मध्ये नरसिंहराव सरकारने समाजवादी विचारधारेचा त्याग करून जागतिकीकरणाला प्राधान्य दिले

३) नवे सामाजिक संबंध- राजकीय घटनासोबत सामाजिक घटनादेखील राजकीय परिवर्तनाला सहाय्यक ठरू शकतात. समाजातील बदलते सामाजिक संबंध हा राजकीय बदलाचा आधार होऊ शकतो. उदा. भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जाती आणि जमातींना दिलेल्या आरक्षणामुळे परंपरागतरीत्या समाजाच्या परिघाबाहेर असलेले वर्ग जागृत व संघटित होऊन राजकीय प्रक्रियांवर प्रभाव पाडतात. राजकीयदृष्टया उपेक्षित घटकांच्या वाढत्या राजकीय सहभाग व समावेशनामुळे परंपरागत राजकीय अभिजनाचे महत्त्व कमी होऊन नवे गट सत्ताधारीबनत असतात हा बद्दल राजकीय परिवर्तन मानता येतो. उदा. महाराष्ट्रात बहुजन समाजात निर्माण झालेल्या राजकीय जागृतीमुळे ब्राह्मण समाजाच्या राजकीय प्रभाव कमी होऊन ब्राह्मणेतर नेतृत्व प्रभावी ठरलेले दिसते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video