शनिवार, ३० जुलै, २०२२

राजकीय बदलाला कारणीभूत घटक Main Factor of Political Change

 

राजकीय बदलाला कारणीभूत घटक :-

Main Factor of Political Change

राजकीय बदल अचानक वा अनपेक्षितरीत्या पडत असतात असे काही विचारवंत मानतात परंतु हा दृष्टिकोन अशास्त्रीय मानला जातो. कारण राजकीय बदल अचानक होत नसून ती घडविण्यासाठी काही कारणे कारणीभूत असतात. ती कारणे पुढीलप्रमाणे होत.

) नवीन तंत्रज्ञानाचा उदय- राजकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. प्राचीन काळात दळणवळण साधनाच्या अभाव आणि संसूचन माध्यमाच्या अभावामुळे राजकीय व्यवस्थेतील सर्व घटकांशी संपर्क साधने शक्य नव्हते. परंतु आधुनिक काळ नवीन तंत्रज्ञानाच्या उदयानसाधने, संसूचन माध्यमाच्या विकासामुळे जनतेशी संपर्क प्रस्थापित करणे राजकीय व्यवस्ता सहज शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जनतेच्या शासनाकडून आशाआकांक्षा वाढत चालेल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झालेली आहे. मानवी जीवनात सुसह्यता आणि सुलभता निर्माण झाली आहे. दैनंदिन जीवनातील सुबत्तेमुळे राजकारणाविषयी विचार मानवास मोकळा वेळ उपलब्ध झालेला आहे. त्यातून राजकीय बदलास पोषक वातावरण निर्माण होत असते.

२) आर्थिक बदल- आर्थिक व्यवहारातील बदलाचा राजकीय घडामोडीवर निश्चित परिणाम होत असतो. आधुनिक काळात आर्थिक घटक राजकारणाला प्रभावित करणारे सर्वात महत्त्वपूर्ण घटक मानले जातात. जागतिकीकरणाच्या युगात देशादेशांतील सीमारेषेचे महत्त्व कमी होऊन आंतरराष्ट्रीय व्यापार, निर्यात, भांडवल गुंतवणूक या आर्थिक क्षेत्रातील घटकाचा राजकीय व्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडत असतो. विविध समाज घटक आणि गटांचे परस्पराशी असलेल्या संबंधावर राजकीय संबंध अवलंबून असतात. आर्थिक बदलाचा राजकीय बदलावर निश्चित परिणाम होत असतो. उदा. १९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीत असल्यामुळे नरसिंहराव सरकारने समाजवादी धोरणाचा त्याग करून जागतिकीकरणाचा स्वीकार केला होता याचा अर्थ आर्थिक बदल राजकीय बदलाची दिशा निश्चितीचे कार्य करीत असतात.

३) आंतरराष्ट्रीय परिस्थिती :- आंतरराष्ट्रीय राजकारणात पडणान्या पहामोडीचा राजकीय बदलावर निश्चित परिणाम होत असतो, उदारी साम्यवादी शासन नष्ट झाल्यामुळे जगात साम्यवादयांची पिछेहाट होऊन भांडवलशाहीची सरशी झालेली दिसते. राष्ट्राराष्ट्रातील संघर्ष, तणाव किंवा युद्धाचा देखील राजकीय बदलाचा परिणाम होत असतो. उदा. भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाचे भारतावर दीर्घकालीन परिणाम झालेले दिसतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात पडलेल्या घडामोडीमुळे देखील राजकीय बदलाला हातभार लागत असतो. उदा. पश्चिमी आशियाई निर्माण झालेल्या तणावामुळे खजिनतेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात पढणाच्या घडामोडीतून अनेक देशात राजकीय बदल झालेले दिसून येतात.

४) राजकीय सुधारणा- राजकीय सुधारणा राजकीय परिवर्तनास सहाय्यक ठरत असतात, राजकीय सुधारणातून नवीन नवीन राजकीय मूल्य, संस्था आणि नव राजकीय विचाराचा जन्म होत असतो. ब्रिटिशाच्या आगमनापूर्वी भारतीय समाजात राजकीय सुधारणेला फारसा वाव नसल्यामुळे समाजात स्थिर स्वरूपाच्या राजकीय संस्था अनेक शतकापासून कार्यरत होत्या अनेक राजवटी आल्या आणि गेल्या परंतु पारंपरिक संस्थेमध्ये फारसा बदल झाला नाही. ब्रिटिशांनी केलेल्या राजकीय सुधारणामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर राजकीय बदलास प्रारंभ झाला. ब्रिटिशांनी राजकीय सुधारणाच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन मूल्य आणि संस्था भारतात सुरू केल्यामुळे भारतात राजकीय बदल झालेला दिसतो उदा ब्रिटिशांनी केलेल्या संसदीय राजवटीच्या प्रयोगामुळे भारतात लोकशाही विचारांचे बीजारोपण होण्यास हातभार लावलेला दिसतो.

५) क्रांती :- उत्क्रांतीच्या मार्गाने हळूहळू बदल होत जातो. क्रांतीच्या माध्यमातून होणारा बदल अचानक वा आकस्मिकपणे होतो. राजकीय व्यवस्था परिवर्तनास प्रतिबंध करू लागली की तणाव वाढू लागतात, सनदशीर मार्गाने तणाव निवळल्यास संतप्त गट प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धात क्रांती करून राजकीय परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. राजकीय व्यवस्था जनआकांक्षाच्या विपरीत वर्तन करत असेल तर क्रांतीची शक्यता बळावते. सनदशीर मार्गाने होणाच्या परिवर्तनाची दिशा निश्चित करता येते मात्र क्रांतीच्या मार्गाने होणान्या परिवर्तनाबद्दल कोणताही अंदाज बांधता येत नाही. उदा. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर निर्माण झालेली गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. क्रांतीतून होणाऱ्या परिवर्तनातून राजकीय मूल्यात बदल होऊन राजकीय परिवर्तनाला सहाय्य मिळू शकते. उदा. १९१७साली रशियात झालेल्या क्रांतीमुळे झारशाही नष्ट होऊन साम्यवादी व्यवस्थेच्या स्थापनेतून साम्यवादी मूल्याचे बीजारोपण झालेले होते. जगाच्या इतिहास विविध देशात झालेल्या क्रांतीतून व्यापक राजकीय बदल झालेले दिसतात. उदा. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मूल्यांना महत्व प्राप्त झालेले दिसते.

६) राजकीय अभिजन :- राजकीय बदलावर समाजातील राजकीय अभिजनाचा प्रभाव पडता असतो. प्रत्येक देशात राजकीय श्रेष्ठजन आपले व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, जनसंपर्क, संघटनकौशल्य इत्यादीच्या जोरावर समाजाला प्रभावित करून राजकीय बदल घडवून आणतात. उदा. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात पहिले पंतप्रधान पंडित नेहरूच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे भारतात लोकशाही आणि राजकीय विकासात हातभार लागलेला दिसतो. राजकीय अभिजन आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर राजकीय परिवर्तनाशी दिशा देखील निश्चित करत असतात. उदा. चर्चिल आणि रूझवेल्ट यांनी दुसऱ्या महायुद्धकाळात आखलेल्या धोरणाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर व्यापक परिणाम झाले. राजकीय नेतृत्वात बदल झाल्यास व्यवस्थेच्या कार्यक्षमता आणि कार्यशैलीत देखील बदल होत असतो. उदा. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी कार्यशैलीतील फरक महत्त्वाचा मानला जातो. विविध देशातील राजकीय बदलाचा विचार करत असताना त्या देशातील प्रभावी नेतृत्वाचा कार्याचा विचार करावाच लागतो. विशिष्ट परिस्थितीचा फायदा घेऊन व लोकमताचा पाठिंबा मिळवून नेतृत्व राजकीय बदल वेगाने घडवून आणू शकतात. उदा. इंदिरा गांधींनी १९६९ साली केलेले बँकाचे राष्ट्रीयकरण राजकीय परिवर्तनावर राजकीय अभिजनाचा प्रभाव पडत असला तरी त्यांच्या कार्यावर देखील काही मर्यादा असतात. उदा. पंडित नेहरूचे व्यक्तिमत्व कितीही श्रेष्ठ असले तरी चीन युद्धात झालेल्या पराभवामुळे टीकेला सामोरे जावे लागले. अर्थात राजकीय अभिजनावर परिस्थितीच्या मर्यादा पडता असला तरी राजकीय बदलात दिशा देण्यात त्यांची भूमिका निर्णायक असते.

७) विचारप्रणाली :- राजकीय बदल घडवून आणण्यात विचारप्रणाली देखील महत्त्वाचे स्थान आहे. विचारसरणीची निर्मिती करून तिचा यशस्वी उपयोग करून घेण्याचे कौशल्य राजकीय नेतृत्वाकडे असेल तर व्यापक राजकीय बदल घडवून आणता येतात. उदा. भारतात पंडित नेहरू हिंदू-मुस्लिमामधील तणाव कमी करण्यासाठी धर्मनिरपेक्षता तत्त्वांचा पुरस्कार केला होता. राजकीय व्यवस्थेवर विविध विचारधारा आणि विचारवंताचा प्रभाव पडत असतो. कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या साम्यवादी विचारधारेमुळे रशिया, चीन आणि जगातील इतर देशात क्रांतीहोऊन राजकीय बदल घडून आलेले दिसतात. राजकीय विचारवंताकडून मांडल्या जाणाऱ्या विचारसरणीला राजकीय नेतृत्व व्यावहारिक मुलामा चढवतात आणि त्यातून अपेक्षित राजकीय बदल घडवून आणतात. उदा. रूसोच्या विचारसरणीतील सामान्य ईहा कल्पनेपासून प्रेरणा घेऊन फ्रेंच क्रांतिकारक नेतृत्वाने फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणली. विचारसरणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनोभूमिका बदलता येतात, जनतेपुढे नवे आदर्श उभे करता येतात, तसेच जनतेत एकत्मता निर्माण करता येते म्हणून विचारसरणी राजकीय परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.

८) राजकीय पक्ष :- कोणत्याही देशात राजकीय परिवर्तनाचा प्रक्रियेत राजकीय पक्षाचा फार मोठा वाटा असतो. राजकीय पक्ष विविध राजकीय कार्यक्रम, सुधारणा जनतेपुढे मांडून राजकीय बदलाच्या प्रक्रियेला सक्रिय करण्याचे कार्य करतात. राजकीय पक्ष सत्ता हस्तगत करून शासनाच्या माध्यमातून विविध धोरणे, योजना आणि कार्यक्रम आखून जनतेत राजकीय बदलाचे बीजारोपण करीत असतात. उदा. १९४९ च्या क्रांतीनंतर चीन मध्ये झालेल्या प्रचंड राजकीय बदलात कम्युनिष्ट पक्षाचा वाटा सर्वात जास्त होतो. लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेला राजकीय पक्ष राजकीय बदलाची दिशा निश्चित करत असतो. उदा. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर मोठया प्रमाणावर राजकीय बदल घडलेले दिसतात. राजकीय पक्ष लोकांच्या प्रवृत्तीत आणि क्रियाशीलतेत बदल घडवून आणू शकतात. राजकीय पक्ष विशिष्ट व्यक्तीला अधिकारपदावर बसविण्याचा प्रयत्न करतात. उदा. भारतात काँग्रेस पक्ष गांधी घराण्यातील व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसविण्याचा प्रयत्न करतात.

९) राजकीय संघटना व स्वयंसेवी संस्था- राजकीय बदलात राजकीय आणि स्वयंसेवी संस्थाचा देखील सहभाग असतात. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात विविध राजकीय संघटना आणि विविध समूहांनी केलेल्या आंदोलनामुळे ब्रिटिशांना भारतीयांना राजकीय स्वातंत्र्य बहाल करावे लागले. स्वयंसेवी संस्था राजकीय बदलासाठी शासन व्यवस्थेवर दडपण आणण्यासाठी आंदोलने, घेराव, उपोषणे इत्यादी मार्गानि प्रयत्न करीत असतात. उदा. लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी बोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वयंसेवी संस्थाच्या सहकायनि दिल्ली येथे जंतरमंतर येथे उपोषण करून सरकारवर प्रचंड दडपण आणले होते. स्वयंसेवी संस्था राजकीय बदलासाठी सकारात्मक लोकमत निर्मितीसाठी देखील प्रयत्न करीत असतात. स्वयंसेवी संस्थानी केलेल्या प्रचारामुळे देखील राजकीय बदलास पोषक वातावरण निर्माण होण्यास सहाय्य मिळत असते. राजकीय संस्थामुळे राजकीयबदलात अडथळे निर्माण होतात असा आक्षेप घेतला जातो त्यासाठी इंग्लंडच्या उमराव गृहाचे उदाहरण दिले जाते मात्र इतर देशातील द्वितीय सभागृह परंपरावादी नाहीत. नव्याने निर्माण झालेल्या राजकीय संस्था राजकीय बदलावर अनुकूल बदल घडवून आणतात. उदा. लोकपाल संस्थेच्या निर्मितीमुळे सनदी नोकरावर नियंत्रण प्रस्थापित होते.

१०) सामाजिक संघटन :- सामाजिक संघटन ही विशाल सामाजिक बदलाची प्रक्रिया असते. कार्ल ड्वाइश यांनी सामाजिक संघटन राजकीय बदलावर विविध दिशांनी प्रभाव टाकत असल्याचे निदर्शनात आणून दिले आहे. समाजात नित्य वाढत जाणारा नागरी समाज, साक्षरता आणि सुशिक्षित वर्गामुळे राजकीय प्रक्रियेवर व्यापक परिणाम होत असतात. या वर्गाच्या वाढीमुळे राजकीय धोरण प्रक्रियेवर दडपण येत असते. त्यामुळे राजकारणात दर्जात्मक बदल होत असतो. कारण नागरीकरणातून लोकांचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग वाढतो. शासन व जनता याच्यातील प्रत्यक्ष संपर्कामुळे राजकीय निर्णय प्रक्रिया गतिमान होऊन राजकीय बदलाचा मार्ग सुकर बनत असतो. युरोपीय देशाच्या आधुनिकीकरणामागे सामाजिक संघटन प्रक्रिया कारणीभूत मानली जाते. सामाजिक संघटनात व्यक्ती, गट व समाजाच्या आकांक्षा यातील बदल अपेक्षित असतो. युरोपीय देशात सामाजिक संघटनाची प्रक्रिया दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्यामुळे तेथे लवकर राजकीय परिवर्तन घडलेले दिसते.

अशा पद्धतीने राजकीय बदल घडवून आणण्यासाठी विविध घटक कारणीभूत असतात. भारताच्या संदर्भात वरील बहुसंख्य घटक राजकीय बदलास कारणीभूत ठरलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video