मंगळवार, १९ जुलै, २०२२

लोकमत निर्मितीची प्रक्रिया आणि पायऱ्या:- Formation and Steps of Public Opinion

 

लोकमत निर्मितीची प्रक्रिया आणि पायऱ्या:-

Formation and Steps of Public Opinion

कौटुंबिक सहजीवन, शैक्षणिक पर्यावरण, धार्मिक संस्था, राजकीय पक्ष, दबावगट आणि जनसंपर्क साधने इत्यादीद्वारे लोकमताची जडणघडण होत असते. लोकमत हे अलगपणे किंवा तुटक अवस्थेत निर्माण होत असते. लोकमत निर्मितीवर रूढी, परंपरा व समाजातील मूलभूत विचारसरणीचा प्रभाव पडतो. समाजाची मूलभूत विचारसरणी सदैव सुप्त स्वरूपात अस्तित्वात असते ती लोकमतातून व्यक्त होत असते. त्यामुळे लोकमताबदल साधारणत: अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. व्यक्तीच्या सभोवताली असलेल्या बाहय पर्यावरणाचाही लोकमत निर्मितीवर प्रभाव पड़त असतो. लोकमताची निर्मिती संसूचन प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असत. समाजात संसूचन माध्यमे किती व कशा प्रकारची आहेत यावर लोकमताची निर्मिती अवलंबून असते. कारण ज्या प्रकरणावर लोकमत तयार होते ते प्रकरण लोकांपर्यत पोहचवावे लागते. त्यासाठी संसूचन माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. लोकमत निर्मितीत वृत्तपत्र, आकाशवाणी आणि टी.व्ही ही राजकीय संसूचनाची महत्त्वाची माध्यमे मानली जातात. राजकीय पक्ष, दबावगट आणि सामाजिक समुह देखील लोकमत निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देत असतात, सामाजिक समुह सदस्यांचे सामाजीकरण] घडवून आणत असतात. समूह आणि पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या संस्कारातून प्रत्यक्षाप्रत्यक्ष मार्गाने लोकमताची निर्मिती होत असते.

लोकमत निर्माण होण्याची प्रक्रिया मानसिक असते. लोकमत निर्मितीसाठी लोकांचा दर्जा व नेतृत्व देखील आवश्यक असते. लोकांमध्ये एखादया प्रश्नाबद्दल उलटसुलट चर्चा करण्याची पात्रता नसेल किंवा लोकांमध्ये वैचारिक चिकित्सेऐवजी आज्ञापालनाचे मूल्य प्रभावी असेल तर लोकमताची निर्मिती होऊ शकत नाही म्हणून लोकांच्या पात्रता आणि गुणवत्तेवर देखील लोकमत निर्मिती होत असते. नेतृत्व हा घटक लोकमत निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखादया प्रश्नावर नेत्यांनी मत व्यक्त केल्यानंतर त्या मतास अनेक लोक पाठिंबा देतात. त्यामुळे नेता हा लोकमत निर्मितीला दिशा देऊ शकतो अथवा लोकमत निर्मितीसाठी प्रेरणास्त्रोत देखील बनू शकतो. लोकमताची निर्मिती समाजातील एखादया थोडया गटात सुरू होतेआणि बऱ्याच लोकांनी तो विचार मान्य केल्यानंतर त्याचे लोकमतात रूपांतर होते. लोक एखादया प्रकरणाबद्दल उलट सुलट विचार मांडतात त्यातूनही लोकमत तयार होते. उदा. दाभोळ येथे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाल्याबरोबर लोकांनी विरोध दाखविला व त्यातून पुढे राज्यभर तयार झाले

लोकमत निर्मितीच्या पायऱ्या:-

 प्रा. डेव्हिसन यांनी लोकमत निर्मितीच्या पुढिल पायऱ्या सांगितल्या आहेत.

१) एखादया घटनेतून समाजात एखादा प्रश्न निर्माण होतो. उदा पक्ष प्रतिनिधीच्या पक्षांतरामुळे पक्षांतर विरोधी विधेयक व कायदे यावद्दल समाजात चर्चा सुरू होते.

(२) लोकांच्या निरनिराळया गटात त्या प्रश्नावर चर्चा होते. हितसंबंधी आणि व्यक्ती यात प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरू होते.

३) एखादया नेत्याकडून त्या विषयावर विचार मांडले जातात. त्या विचाराच्या आधारावर लोक चर्चा करतात.

४) गटात होणारी चर्चा समाजात पसरते व त्या विषयावर सर्वत्र चर्चा होते.

५) त्या विशिष्ट प्रश्नाबद्दल लोकांचा दृष्टिकोण तयार होतो.

६) पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन लोक दृष्टिकोण निश्चित करतात आणि त्या दृष्टिकोणानुसार लोकांची कृती होते.

     लोकमत घडविणाऱ्या काही पायऱ्या प्रा. डेव्हिडसने सांगितल्या असल्या तरी त्या क्रमाने लोकमत घडेल या विषयी शंका असली तरी लोकमतासाठी पुढील गोष्टी आवश्यक मानल्या जातात. लोकांचे विचार वाहनासाठी संसूचन सोयी अस्तित्वात असाव्या लागतात. इतराशी संबंध प्रस्थापित करण्याचे वा संपर्क साधण्याचे स्वातंत्र्य असावे लागते. लोकांमध्ये सार्वजनिक प्रश्नावर विचार करण्याची पात्रता असली पाहिजे. सार्वजनिक प्रश्नाबद्दल नागरिकात रस वा जागृती असावी लागते. एखादी महत्त्वाची वा गंभीर घटना अस्तित्वात यावी लागते. त्या घटनेबद्दल जागृती निर्माण करणारी एखादी व्यक्ति पुढे यावी लागते किंवा एखाद्या गटाला पुढाकार घ्यावा लागतो. कारण लोकमत निर्मिती सर्व व्यक्तीचा समावेश नसतो तर थोडयाच व्यक्ती समावेश असतो. या सर्व गोष्टी अस्तित्वात आल्यास लोकमत तयार होते. म्हणून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात, अविकसित देशापेक्षा विकसित देशात लोकमताची निर्मिती जलद गतीने होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...