लोकमत संकल्पना अर्थ, व्याख्या आणि वैशिष्टये वा विशेषतः
लोकमत म्हणजे काय ? :
लोकमत शब्द १८ व्या शतकात प्रचलित झाला. जेम्स
ब्राईस विचारवंताने 'अमेरिकन
कॉमनवेल्थ' ग्रंथात लोकमत विषयावर स्वतंत्र प्रकरण लिहिलेले
होते. लोकमत ही संकल्पना प्राचीन काळात वापरली जात असली तरी ती अत्यंत मर्यादित
अर्थाने वापरली जात होती असे आढळते. लोकमत संज्ञेचा अर्थ सैद्धांतिक आणि अमूर्त
पातळीवरचा होता. दुसऱ्या महायुद्धानंतर लोकमत ह्या संकल्पनेचा सविस्तर आणि शाखीय
पद्धतीने राज्यशास्त्रात अध्ययन होऊ लागले. लोकशाहीच्या विकासाबरोबर लोकमताचे
महत्त्व वाढले. लोकांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय जाणीव जागृतीतून लोकमत ही
संकल्पना अर्थपूर्ण बनली आहे. आपण एका सुसंघटित समाजाचे घटक आहोत नागरिक म्हणून
आपले काही उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या आहेत या जाणीवेतून लोकमताची निर्मिती झालेली
आहे. उदारमतवादी लोकशाहीतून विकसित झालेल्या सार्वत्रिक प्रौढमताधिकार तत्त्वातून
लोकमत निर्मितीच्या दृष्टीने पोषक ठरलेल्या दिसतात. निवडणुका, राजकीय पक्ष व दबावगटांची निर्मिती, निर्वाचित
विधिमंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थाचा उदय या गोष्टी
लोकशाहीसोबत लोकमत निर्मितीला देखील पूरक ठरलेल्या आहेत. लोकमत म्हणजे काय,
लोकमताची निर्मिती कशी होते, लोकमतात बदल कसा
होता इत्यादी गोष्टीचे अध्ययन लोकमत संकल्पनेच्या अंतर्गत राज्यशास्त्रात केले जात
असते. लोकमत शब्दात लोक आणि मत या दोन शब्दाचा समावेश आहे. लोक आणि मत दोघांचा
अर्थ संदिग्ध आहे. लोक म्हणजे किती लोक, कोणते लोक तर मत
म्हणजे काय? मत म्हणजे एकमत की बहुमत याचा निश्चित अर्थ
सांगणे अवघड आहे.. लोक शब्दाचा अर्थ सर्व लोक असा न होता विशिष्ट प्रश्नाशी जे लोक
निगडित असतील त्या प्रश्नासंदर्भात संगोपांग चर्चा करून
अनुकूल किंवा प्रतिकूल मत तयार करतात त्या मताला लोकमत असे म्हणतात. विशिष्ट
प्रश्न वा घटनेबद्दल समुदायाचा वा गटाचा जो आवाज वा सूर असतो त्याला लोकमत असे
म्हणतात.
लोकमत संकल्पना अर्थ, व्याख्या आणि वैशिष्टये :-
लोकमत शब्दांत अनेक अर्थ लपलेले असल्याने
लोकमताची निश्चित व्याख्या करणे निश्चित अवघड आहे. लोकमत संकल्पनेविषयी
राज्यशास्त्रात व्यापक अध्ययन झालेले आहे. मात्र लोकमताच्या व्याख्येबाबत
अभ्यासकांमध्ये एकमत दिसून येते नाही. या संकल्पनेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक
विचारवंताने स्वतंत्र व्याख्या केलेली आहे. लोकमत म्हणजे बहुसंख्याकांचे मत नसते
तसेच समाजातील सर्व व्यक्तींच्या मतांचा संचय नसतो. लोकमत निर्माण होण्यासाठी
एखादी घटना घडावी लागते व त्या घटनेच्या संदर्भात लोकांच्या व्यक्त केलेल्या
प्रतिक्रियातून लोकमत निर्माण होते. लोकमताची व्याख्या करतांना विशिष्ट घटनेच्या
किंवा प्रकरणाच्या संदर्भात करावी लागते. विशिष्ट प्रकरणांच्या लोकांचे दृष्टिकोन, श्रद्धा व मूल्य व्यक्त होतात. म्हणजेच
घटनेची जाणीव व परस्परात त्याविषयीच्या वैचारिक देवाण-घेवाणातून लोकमताची निर्मिती
होते. त्यामुळे सार्वजनिक स्वरूपाच्या विशिष्ट प्रश्नावर लोकांमध्ये असलेला
दृष्टिकोन व त्यांची मते यांच्या समुच्चयाला लोकमत असे म्हणता येईल. लोकमतातून
लोकांच्या एखाद्या विशिष्ट प्रकरणविषयीचा समान दृष्टिकोन व्यक्त होत असतो.
लोकमतातून दिशा व्यक्त होते.. लोकांची अनुकूलता किंवा प्रतिकूलता व्यक्त होते.
सार्वजनिक दृष्टया महत्वाच्या बाबीवर अनुकूल व प्रतिकूल अशी दोनही प्रकारची मते
असू शकतात किंवा काही प्रमाणात अनिश्चितता असू शकते.
२) लॉवेल : सुबंध लोकांना मान्य होण्यासारखा दोन किंवा
दोनापेक्षा जास्त विसंगत विचारप्रवाहापैकी जो विचारप्रवाह बहुसंख्य लोकांना मान्य
आहे तो विचारप्रवाह म्हणजे लोकमत होय.
3) एच.एल. चाइल्डस : समूहाच्या सदस्यांनी वा लोकांनी
शब्दांत अभिव्यक्त केलेल्या आपल्या अभिव्यक्तींना लोकमत असे म्हणतात.
लोकमत संकल्पनेच्या अर्थाबाबत असलेल्या
विविधतेमुळे काही अभ्यासकांनी लोकमताची व्याख्या न करता लोकमत संकल्पनेचे विश्लेषण
केलेले आहे. लोकमत संकल्पनेच्या अर्थ आणि व्याख्यामध्ये असलेली विविधता, संदिग्धता आणि वादविवादामुळे काटेकोर वा
शाखीय व्याख्या सापडणे शक्य नाही. मॉरिस जीन्सबर्ग यांनी 'लोकमत
हे मनांच्या आंतरक्रियेतून निष्पन्न होणारे सामाजिक उत्पादन होय' असे म्हटले आहे यांचा अर्थ लोकमताची अर्थ प्रत्येक अभ्यासकांच्या लेखी
भिन्न असला तरी वरील व्याख्यावरून लोकमताची काही लक्षणे वा वैशिष्टये स्पष्ट करता
येतात ती पुढील प्रमाणे होत.
२) लोकांना ज्या प्रश्नाबद्दल आत्मीयता आणि जिव्हाळा असतो
त्या प्रश्नाबद्दल लोकमताची निर्मिती होत असते.
३) लोकांना ज्या प्रश्नाबद्दल माहिती उपलब्ध होते किंवा
माहिती मिळते त्या प्रश्नासंबंधी लोकमत निर्माण होते.
४) लोकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येक जण
आपल्या आकलनक्षमता आणि तर्कबुद्धीच्या जोरावर किंवा इतरांशी चर्चा करून निर्णय घेत
असतो.
५) पूर्वग्रह, समज-गैरसमज, श्रद्धा आणि भावना ह्याचाही
प्रभाव लोकमत निर्मितीच्या वैचारिक प्रक्रियेवर होत असतो.
६) राष्ट्रहित समाजहित किंवा सार्वजनिक हित हा लोकमत
निर्मितीचा एक महत्त्वाचा आधार
असतो.
७) समाजाच्या विविध स्तरामधुन लोकमताच्या होणाऱ्या अविष्कारातून राज्यकर्त्या वर्गाला राजकीय निर्णय घेण्याचे सूत्र उपलब्ध होत असते.
८) निर्णय प्रक्रिया ही लोकमताच्या प्रभावाने घडत असते.
लोकमताची काही लक्षणे स्पष्ट केलेली असली तरी प्रा. हर्मन
फायनर यानी लोकमताची तीन लक्षणे सांगितलेली आहेत.
१) तत्कालीन परिस्थितीचे लोकमतात दर्शन असते.
२) लोकमतातून सर्वसामान्य दृष्टिकोन आणि लोकांच्या धारणा
प्रगट होतात.
३) लोकांच्या आशाआकांक्षाचे प्रतिबिंब लोकमतातून घडत असते.
लोकमताची विशेषतः लोकमत संकल्पनेचे अध्ययन केल्यानंतर या संकल्पनेची काही
विशेषत: दिसून येतात.
१) लोकमतची प्रथम विशेषतः म्हणजे ज्या मताला लोकांची
मान्यता आहे. त्याला लोकमत असे म्हणतात. मान्यता म्हणजे सर्वमान्य नव्हे तर
कमीतकमीबहुसंख्याक लोकांची मान्यता असणे गरजेचे असते.
२) लोकमत कोणत्या एका व्यक्तीचे मत नसते तर ते संपूर्ण
समुदायाचे सामुहिक मत असते.
४) लोकमत निर्मितीसाठी समूहातील प्रत्येक सदस्याला विचार
मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.
५) लोकमत अंधविश्वासावर आधारित नसते तर जनतेच्या
तर्कशक्तीवर आधारित असते. समुदायात विशेष समस्या उत्पन्न होते तेव्हा लोकमत
निर्माण होत असते.
६) लोकमतावर समुदायाची संस्कृती, रूढी, प्रथा आणि
परंपरेचा प्रभाव पडत असतो.
७) लोकमत समुदायाचे मूल्य, मानके आणि व्यवहारावर अवलंबून असतो.
८) समुदायात विशिष्ट घटना, प्रसंगाबद्दल जितकी आत्मीयता असेल तेवढ़या प्रमाणात लोकमताची निर्मिती वेगाने होत असते.
९) लोकमत ही परिवर्तनशील संकल्पना आहे. समाजातील प्रतिष्ठीत
शक्तीशाली वर्गांचा लोकमत
निर्मितीवर प्रभाव पडत असतो.
१०) लोकमत निर्माण होण्यासाठी संपूर्ण जनसमुदायाने सक्रिय
भूमिका निभावण्याची आवश्यकता असते.
११) सदृढ लोकमत निर्मितीसाठी समाजात सामाजिक परिवर्तन होऊ
शकेल असा परंपराचे अस्तित्व असणे आवश्यक मानले जाते.
१२) लोकमतातून निर्माण होणान्या परिवर्तनाचे पूर्वानुमान
लावणे अवघड आहे.
अशा प्रकारे लोकमत संकल्पनेच्या विविध विचारवंतानी विशद
केलेल्या विशेषत: सांगता येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box