भारतीय लोकशाहीवरील
राजकीय वंशवाद किंवा राजकीय घराणेशाहीचा प्रभाव
राजकीय वंशवाद
म्हणजे एकाच परिवारातील अनेक सदस्य राजे करण्यात विविध पदावर असणे होय. लोकशाहीत
वंशवादाला कोणती स्थान नसते. परंतु भारताच्या राजकारणावर वंशवादाचा पगडा दिसून
येतो. 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते 2024 मध्ये झालेल्या
निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकीमध्ये राजकीय वंशवादाचा बोलबाला दिसून येते. भारतात
एखाद्या कुटुंबातील एखादा व्यक्ती मोठा नेता बनल्यानंतर त्या नेत्याच्या वारसा
बाकी सदस्यांना आपोआप प्राप्त होतो. त्या वारशाच्या जोरावर वर्षानुवर्ष सत्ता भोगत
असतात. उदा. पंडित नेहरूंच्या वारसाच्या आघराणेशाहीवादाचे
प्राबल्य दिसून येते. भारतात लोकशाही शासन व्यवस्थेनुसार निवडणुकीच्या माध्यमातून
राज्यकर्ते निवडले जात असले तरी प्रत्यक्षात भारतातील काही मोजक्या घराण्यांच्या
ताब्यात सत्ता असल्याचे दिसून येते. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व दीर्घकाळ गांधी
घराण्यातल्या लोकांनी केलेले दिसून येते. काँग्रेसच्या वंशवादाला विरोध करणाऱ्या
लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, शरद
पवार आणि इतर प्रादेशिक पक्षाने कितीही विरोध केलेला असला तरी जवळपास बहुसंख्य
प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वाने घराणेशाहीचा स्वीकार केलेला दिसतो. त्यामुळे
भारताच्या राजकारणावर मोजक्याच कुटुंबाची पकड दिसून येते.
स्थानिक
ते राष्ट्रीय राजकारणात वारसांचे राजकारण हे प्रमुख वैशिष्ट्य बनलेले आहे.
महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय उमेदवारांना घराणेशाहीची पार्श्वभूमी दिसून येते. 2019
च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 542 पैकी 162 म्हणजे जवळपास 30 टक्के खासदार राजकीय
घराणेशाहीतून पुढे आलेले दिसून येतात. अमेरिकाच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि
जर्मनीच्या मैनहेम युनिव्हर्सिटीच्या संशोधकाद्वारे संकलित आकडेवारीनुसार भारतातील
सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये राजकीय वंशवाद सामान्य गोष्ट आहे असा निष्कर्ष
काढला आहे. राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवर राजकीय वंशवादाचे प्रमाण राष्ट्रीय
पातळीपेक्षा जास्त दिसून आलेले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 543
पैकी 156 खासदार हे राजकीय घराणेशाहीच्या पार्श्वभूमीतून आलेले दिसून येतात. भाजप
सारख्या राजकीय वंशवादाला विरोध करणाऱ्या पक्षात देखील वरच्या पातळीवर
घराणेशाहीतून आलेले सदस्य कमी दिसत असले तरी राज्य पातळीवरील आणि स्थानिक राजकारणात
भाजपमध्ये देखील घराणेशाहीचा बोलबाला दिसून येतो.
भारतात राजकीय
वंशवाद वाढीची कारणे-
1.
व्यक्तीपूजा वृत्ती- भारतीय समाजात
असलेल्या व्यक्तीपूजाच्या तत्वामुळे भारतात राजकीय वंशवादाचा विकास झालेला दिसून
येतो.
2.
सरंजामशाही सामाजिक संरचना आणि मानसिकता- भारतीय
राजकारणातील सरंजामशाही सामाजिक संरचना आणि येथील लोकांच्या सरंजामशाही
मानसिकतेमुळे राजकीय वंशवादाच्या उदयाला पोषक पार्श्वभूमी निर्माण झालेली आहे.
3.
राजकीय परिवार प्रयत्न- राजकीय परिवाराच्या
माध्यमातून लोकशाही व्यवस्थेत राजकीय वंशवाद टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून
झालेल्या प्रयत्नांमधून देखील या वृत्तीला चालना मिळालेली दिसते. कारण अनेक नेते
आपल्या मुलांना इतर व्यवसायात पाठवण्याऐवजी राजकारणात पाठवणे योग्य मानतात.
4.
राजकीय पक्ष लोकशाही तत्त्व अभाव- राजकीय
पक्षांच्या अंतर्गत रचनेत लोकशाही तत्वाचा अभाव आहे. राजकीय पक्षांमध्ये
निवडणुकांऐवजी नेमणुकीच्या तत्वाला राजकीय वंशवादाच्या तत्वाला चालना मिळते.
5.
राजकीय
भ्रष्टाचार आणि निवडणुका खर्चिक- वडणुका निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी वाढत्या
खर्चामुळे सर्वसामान्यांकडून निवडणुका लढवणे अशक्य बनते याचा फायदा उचलून राजकीय
घराणेशाही आपला प्रभाव निर्माण करत असते.
6.
पक्ष नेतृत्व- राजकीय पक्षाचे
नेतृत्व विशिष्ट घराण्याकडे असल्यामुळे देखील राजकीय वंशवादाला त्यांना मिळालेली
दिसून येते.
7.
संस्थावर प्राबल्य- घराणेशाही असलेल्या
नेतृत्वाकडे असलेले संस्थात्मक आणि आर्थिक प्राबल्यामुळे त्यांना नेतृत्व करण्याची
लवकर संधी प्राप्त होते. उदा. महाराष्ट्रात सहकारी संस्था आणि शिक्षण संस्था
असलेल्या नेत्यांच्या मुलांकडेच पुढे नेतृत्व आलेले दिसते.
8.
जनतेची मानसिकता- भारतीय जनते देखील
राजकीय वंशवादाला अनुकूल असलेल्या वृत्तीमुळे राजकीय वंशवादाला पोषक वातावरण
निर्माण झालेले दिसून येते.
वरील कारणामुळे
भारतात राजकीय वंशवादाचा विकास झालेला आहे.
राजकीय
वंशवादाचे लोकशाही वरील परिणाम-
1.
राजकीय वंशवादामुळे देश हितापेक्षा परिवार
हिताला जास्त महत्त्व दिले जाते. लोकशाही यंत्रणा परिवाराच्या भल्यासाठी वापरली
जाते.
2.
वंशवादी राजकारण लोकशाहीची मधील स्पर्धा नष्ट
करून मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.
3.
वंशवादी राजकारण दरबारी संस्कृतीला जन्म देत
असते. या संस्कृतीत परिवाराची सेवा आणि गुणगाणाला महत्त्व असते. परिवाराची सेवा चाकरी
करणाऱ्यांना पदे बहाल केली जातात.
4.
वंशवादी राजकारणामुळे योग्यतेच्या आधारावर नव्हे
तर विशिष्ट परिवारात जन्म झाला याच्या आधारावर राजकीय पद मिळतात. . लोकशाहीतील
समान संधीच्या सिद्धांताला राजकीय वंशवादा मुळे अडथळा निर्माण होतो.
5.
राजकीय वंशवाद लोकतंत्राला मजबूत होऊ देत नाही. राजकीय
वंशवादामुळे प्रतिभा संपन्न लोकांना राजकीय पद मिळण्याऐवजी विशिष्ट घराण्यातील
लोकांना सातत्याने पदे मिळत जातात. त्यामुळे लोकशाही विशिष्ट कुटुंबाची मक्तेदारी
बनत असते.
6.
राजकारणातील वंशवाद देशातील लोकशाही प्रधान
संस्थांना कमजोर बनवण्याचा प्रयत्न करत असते.
7.
राजकीय घराणेशाहीच्या माध्यमातून व्यक्तीवाद आणि
व्यक्तीपूजेला प्रोत्साहन मिळते. व्यक्तीपूजा ही लोकशाहीला मारक आहे. राजकीय
वंशवादामुळे पात्रतावान लोकांना योग्य संधी प्राप्त होत नाही.
8.
राजकीय वंशवादामुळे राजकारणात एकाधिकारशाही
विकसित होते. एकाच कुटुंबातील लोकांकडे अनेक राजकीय पद प्राप्त होतात. परिणामतः
घराणेशाही ही नव नेतृत्व निर्माण करण्याच्या कार्यात अडथळे निर्माण करते.
घराणेशाहीतील राजकीय नेतृत्व स्थानिक पातळीवर नव नेतृत्व निर्माण होऊ देत नाही, त्यांच्या नेतृत्वाचे
खच्चीकरण केले जाते किंवा दुय्यम पदे देऊन त्यांच्या विकासाच्या मार्गात अडथळे
निर्माण केले जातात. राजकीय वंशवादामुळे सत्तेच्या राजकारणात मर्यादित लोकांना
सत्ता प्राप्त होत असल्याने त्यांची सत्तेवर मक्तेदारी निर्माण होते.
राजकीय
वंशवादावर नियंत्रण उपाय- राजकीय वंशवादाचा आधार न घेता स्वकर्तुत्वावर
नेतृत्व प्रस्थापित केलेले अनेक लोक भारतात दिसून येतात. परंतु एकंदरीत राजकारणाचा
विचार करता त्यांची संख्या खूपच कमी दिसून येते. राजकीय वंशवादाला लगाम
लावल्याशिवाय दुसऱ्या लोकांना संधी मिळणार नाही. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी
घराणेशाहीच्या आधारावर व्यक्तींचे मोजमाप करण्याऐवजी गुणवत्तेच्या आधारावर मोजमाप
केल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेची संधी प्राप्त होईल.
1.
समाजातील सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील
संस्थांमधील राजकीय वंशवादाची मक्तेदारी नष्ट केल्याशिवाय घराणेशाहीला चाप बसणार
नाही. कारण या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ, मनुष्यबळ, सामाजिक
प्रतिष्ठा प्राप्त होत असते. त्या भांडवलाच्या जोरावर हा वर्ग इतरांपेक्षा लवकर
सत्ता प्राप्त करत असतो.
2.
भारतीय राजकारणातील घराणेशाही किंवा वंशवाद नष्ट
करण्यासाठी भारतीय राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या अंतर्गत लोकतंत्राची स्थापना
केली पाहिजे.
3.
भारतीय जनता जोपर्यंत सामाजिक शैक्षणिक आणि
राजकीय दृष्ट्या जागृत बनत नाही तोपर्यंत राजकीय वंशवादाच्या विरोधात होणाऱ्या
लढायला यश प्राप्त होणार नाही.
4.
राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नैतिकतेच्या
आधारावर आपल्या परिवारातील सदस्यांना पदे बहाल न केल्यास राजकीय वंशवादावर मात
करता येईल.
अशा पद्धतीने
राजकीय वंशवाद ही भारतीय लोकशाहीतील प्रमुख समस्या मानले जाते. या समस्येचे योग्य
पद्धतीने निराकरण करण्यासाठी आवश्यक राजकीय सुधारणा घडून आणल्यास ह्या समस्येचे
निराकरण करता येईल. राजकीय परिवारातील
पुढील पिढीने राजकारणात येणे चुकीचे नाही. परंतु घराणेशाहीच्या आधारावर नव्हे तर
आपले गुण कौशल्य आणि कार्याच्या आधारावर नेतृत्वासाठी दावा केल्यास राजकीय
वंशवादाचा प्रश्न निकाली काढता येईल.