गुरुवार, २४ मार्च, २०२२

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज कसा भरला जातो.

 

विधानसभा आणि लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत वा प्रकिया

निवडणूक कार्यक्रम-लोकसभा अथवा विधानसभेचा कार्यकाल संपण्यापूर्वी निवडणुका घेऊन नवीन लोकसभा किंवा विधानसभा अस्तित्वात आणण्याची अधिसूचना निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने राष्ट्रपती राजपत्रात जाहीर करत असतात. अधिसूचनेसोबत आयोग निवडणुकीचा विस्तृत कार्यक्रम जाहीर करत असतो. निवडणूक कार्यक्रमाच्या अधिसूचनेत नामनिर्देशन पत्र कोठे भरावयाची, कोणासमोर, केव्हा (वेळ) तसेच छाननी, माघारी, प्रचार संपण्याची तारिख, मतदानाचा दिवस व वेळ, मतमोजणीचा दिवस इत्यादीचा समावेश असतो. प्रत्येक मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे कारवाई करत असतात, भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निवडणूक कार्यक्रमाची विस्तृत माहिती दिलेली असते.

उमेदवाराच्या प्रतिनिधीत्वाच्या नामनिर्देशनाची कार्यपद्धती- संसद किंवा राज्य विधिमंडळाची निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक पात्रता भारतीय राज्यघटनेत आणि निवडणूक कायदयामध्ये नमूद केलेली आहे. निवडणुकीत उमेदवारी करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक असते. नागरिक नसलेल्या व्यक्तीला कोणताही निवडणूक लढविता येत नाही. उमेदवाराचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असते. मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तीला कोणतीही निवडणूक लढविता येत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय अर्ज छाननीच्या दिवशी २५ वर्ष पूर्ण असावे, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी ३० वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक असते. प्रचलित निवडणूक कायदयाद्वारे अपात्र ठरविलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविता येत नाही. राखीव मतदार संघात उमेदवार विशिष्ट जातीचा असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. लोकसभेसाठी देशातील कोणत्याही मतदार संघात तर विधानसभा, विधानपरिषद आणि राज्यसभेसाठी राज्यातील कोणातरी विधानसभा मतदार संघाच्या यादीत मतदार म्हणून नाव असणे आवश्यक असते.

नामनिर्देशन- उमेदवार म्हणून आवश्यक पात्रता असलेल्या व्यक्ती स्वतः किंवा आपल्या प्रस्तावकामार्फत दिलेल्या मुदतीत कामकाजाच्या दिवशी व ठराविक ठिकाणी सकाळी ११ ते ३ च्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतो. लोकसभेसाठी नमुना २ अ व विधानसभेसाठी नमुना २ ब मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला जातो. छाननीच्या शेवटच्या वेळेपर्यंत प्रत्येक उमेदवाराला विहित नमुन्यातील खालील माहिती दयावी लागते.

१. कोणत्याही गुन्ह्याखाली शिक्षा न झाल्याचे शपथपत्र व अपात्र नसल्याचे घोषणापत्र द्यावे लागते. आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दयावी लागते.

२. नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर लगेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचेसमोर भारतीय संविधानाचे पावित्र्य, सार्वभौमत्व व एकात्मतेचा आदर राखण्याबद्दल शपथ घेतली जाते.

३. जंगम व स्थावर मालमत्ता, कर्ज, बचत इत्यादीबाबत तपशिल देणारे शपथपत्र नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करावे लागते,

 ४. शासकीय थकबाकी नसल्याबाबत बेबाकी प्रमाणपत्र

५. शैक्षणिक व वैयक्तिक पात्रता आणि पार्श्वभूमीची माहिती अर्जात भरावी लागते. ६. उमेदवाराचा दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, सोशल मिडिया खाते यांचा तपशिल शपथपत्रात दयावा लागतो.

नामनिर्देशत पत्रातील सर्व रकाने भरले पाहिजेत. शपथपत्रातील कोणताही रकाना रिक्त ठेवता येणार नाही. तो रिक्त ठेवल्यास नामनिर्देशित पत्र रद्द होऊ शकते,

सविस्तर माहितीसाठी ;येथे क्लीक करा-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...