बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

विद्यापीठ अभ्यास मंडळ रचना, अधिकार आणि कार्य University Board of Study Composition, Power and function

 

विद्यापीठ अभ्यास मंडळ रचना, अधिकार आणि कार्य
University Board of Study Composition, Power and function

   विद्यापीठ कायदा 2016 कलम 40 नुसार प्रत्येक विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील प्रत्येक विषयासाठी किंवा विषयाच्या गटासाठी एक अभ्यास मंडळ निर्माण केले जाते. हे अभ्यास मंडळ हे विद्यापीठाचे प्राथमिक विद्या विषयक मंडळ असते.

अभ्यास मंडळाची रचना-

   अभ्यास मंडळात पुढील सदस्यांचा समावेश होतो.

   संबंधित विद्यापीठातील विभागाचा किंवा परिसंस्थेचा प्रमुख त्या विषयाचा विद्यापीठात विभाग नसेल तर पदव्युत्तर स्तरावर अध्यापन करणाऱ्या संलग्न महाविद्यालयातील विभाग प्रमुख स्वीकृत करतील.

   विद्या शाखेच्या अधिष्ठात्याशी चर्चा करून किमान दहा वर्षाच्या अनुभव असलेले पुढील प्रवर्गातील नामनिर्देशित सहाय्यक अध्यापक

   1. संबंधित विषयातील विद्यापीठ विभागाच्या पूर्णवेळ अध्यापकांमधून एक अध्यापक

   2. संबंधित विषयातील पदव्युत्तर अध्ययन करणाऱ्या संलग्न महाविद्यालयातील दोन अध्यापक

   3. संलग्न महाविद्यालयातील विभाग प्रमुख नसलेले तीन अध्यापक

   4. संलग्न महाविद्यालयातील विभागप्रमुख गटातून निवडून द्यायचे तीन विभाग प्रमुख

   कलम 65 नुसार अभ्यास मंडळ सदस्य आपल्या मधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतील. अध्यक्ष हा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापन करणारा असावा.

   इतर विद्यापीठातील एक प्राध्यापक

   चार तज्ञ व्यक्ती

   ) राष्ट्रीय प्रयोगशाळा किंवा मान्यताप्राप्त संस्था उद्योगात सहाय्यक संचालक दर्जापेक्षा कमी नसलेले पद धारण करणारा त्या विषयातील किमान एक संदर्भ पुस्तक किंवा तीन संशोधन प्रबंध झालेल्या व्यक्तीस नेमणूक देता येईल

   ) त्या विषयातील नामवंत विद्या व्यासंगी

   ) विषयाशी संबंधित उद्योग किंवा व्यवसायातील नामवंत व्यक्ती

   ) विषयाशी संबंधित उद्योगांमध्ये किमान दहा वर्षाचा अनुभव असणारी व्यक्ती

   ) आधीच्या वर्षातील अंतिम वर्ष पदवी आणि अंतिम वर्ष पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची एका वर्षासाठी निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक केली जाईल

   अभ्यास मंडळ अधिकार आणि कार्य-

   नवीन पदविका पदव्या सुरू करण्याबाबत विद्या शाखा किंवा विद्या परिषदेमार्फत व्यवस्थापन परिषदेत शिफारस करणे.

   अप्रस्तुत ठरलेल्या पदव्या पदविका बंद करण्यासंदर्भात विद्या शाखा किंवा विद्या परिषदेमार्फत व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे.

   पाठ्यक्रम अभ्यास, पाठ्यक्रम संरचना आणि विविध पाठ्यक्रमाच्या मूल्यमापन योजनेबाबत विद्याशाखेला शिफारस करणे.

   अभ्यास पाठ्यक्रमासाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके आणि इतर उपयोगी साहित्याबाबत विद्या शाखेला शिफारस करणे.

   पाठ्यक्रम अद्ययावत करणे किंवा त्यातील फेरबदल्याबाबत विद्याशाखेला शिफारस करणे.

   विद्या परिषदेने निर्धारित केलेल्या निकषाच्या आधारावर विद्यापीठे परीक्षा मूल्यमापनासाठी प्राश्निक, परीक्षक आणि नियामक नामिका तयार करून परीक्षा मूल्यमापन मंडळाकडे शिफारस करणे.

   उन्हाळी किंवा दिवाळी सुट्ट्यांमध्ये विषयानुरूप दिशा निर्देशक आणि उजळणी पाठ्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात विद्याशाखा अधिष्ठात्याला सुचविणे.

   संबंधित पाठ्यक्रमाबाबत ग्रंथालय प्रयोगशाळा साधनसामग्री संबंधात आवश्यक गोष्टीची सिद्धता करणे.

   सुरू केलेल्या पाठ्यक्रमाबाबत विस्तार कार्यक्रम सुचविणे.

   उद्योग किंवा उद्योग समूह वा समाजाच्या गरजा नुरूप अध्यापन अध्ययन प्रक्रिया सुसंबद्ध करण्यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक बाबींचा समावेश करणे.

   माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान साधने  वापरून सहयोग व सहभाग याद्वारे अध्ययनास प्रोत्साहन देणे.

   अभ्यासक्रम तयार करताना व्यवसाय शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमाचा समावेश करणे. अपेक्षित प्राविण्याचा स्तर गाठण्यासाठी किमान कालावधी निश्चित करणे.

   स्वायत्त महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी विकसित केलेले अभ्यासक्रम, सर्व प्रक्रिया व सराव आणि अध्यापकांच्या मान्यतेबाबतच्या शिफारशींचे समर्थन करणे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...