बुधवार, २३ मार्च, २०२२

मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, फॉर्म,पात्रता आणि अपात्रता

 मतदार नोंदणी पद्धती-

मतदार हा लोकशाहीचा पाया मानला जातो. लोकशाहीचा डोलारा मतदारावर उभा असतो. मतदारांनी निवडलेले सरकार लोकशाही यंत्रणा चालवत असते. लोकशाहीचा एक घटक होण्यासाठी व्यक्तीचे मतदार म्हणून नाव नोंदणी होणे आवश्यक असते. भारतीय राज्यघटनेने प्रौढमताधिकाऱ्याला मान्यता दिलेली आहे.

मतदार नोंदणी यंत्रणा-

राज्यघटनेच्या कलम ३२४ () नुसार मतदार यादया तयार करण्याचे किंवा त्या कार्यावर संपूर्ण नियंत्रणाचे काम निवडणूक आयोगाकडे दिलेले आहे. विधानसभा मतदार संघासाठी तयार केलेली मतदार यादी 'मूळ यादी' समजली जाते. ही मूळ मतदार यादी सर्व निवडणुकीसाठी वापरली जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाला मदत करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रत्येक राज्यात निर्माण केलेले आहेत. राज्य मुख्य निवडणूक आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी, प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी (उप जिल्हाधिकारी), त्यांना मदत करण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (तहसिलदार), मतदार केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात पदनिर्देशित अधिकारी (डेसिग्रेटेड ऑफिसर्स) पर्यवेक्षक लेव्हल ऑफिसर्स (BLO) अशी राज्य पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत मतदार नोंदणी यंत्रणा उभी केलेली असते.

मतदारांचीपात्रता- घटनेच्या कलम ३२६ आणि ६१ व्या दुरुस्तीनुसार निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अर्हतादिनी १८ वर्ष वय पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला आयोगाने निश्चित केलेला पुरावा सादर करून मतदार यादीत आपले नांव नोदविता येते. मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येत नाही. निवडणुकीत देखील उमेदवारी करता येत नाही. मतदार नोंदणी करताना धर्म, लिंग, पंथ, जात इत्यादी कोणत्याही आधारावर भेदभाव करता येत नाही. सामान्यतः त्या भागाचा रहिवासी असलेल्या प्रत्येक व्यक्तीस आपले नाव नोंदविता येते. सामान्य रहिवास याचा अर्थ त्या जागेचा झोपण्यासाठी वापर करत असलेला व्यक्ती होय परंतु कारागृहातील कैदी, इस्पितळातील रोगी यांना त्या भागाचे रहिवासी समजले जात नाही कारण त्याचा निवास तात्पुरता असतो. राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, आमदार, खासदार, सैनादलातील व्यक्ती, शासकीय सेवेसाठी परदेशात गेलेल्या व्यक्तींना त्या कोठेही राहत असल्या तरी आपल्या मूळ मतदार संघात नाव नोंदविता येते.

मतदाराचीअपात्रता-

निवडणूक आयोगाने मतदाराची अपात्रता कायद्यान्वये निश्चित केलेल्या आहेत.

 १. भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्ती

२. मानसिकदृष्टया विकल व्यक्ती (सक्षम न्यायालयाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे)

३. निवडणूक गुन्ह्याखाली भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्यामुळे अपात्र ठरविलेल्या व्यक्ती (विहीत कालावधीसाठी) (लोकप्रतिनिधित्व कायदा १९५९ कलम १२५, १३५, १३६ (२) (a) खाली शिक्षा झालेली व्यक्ती)

४. त्या भागाचा रहिवासी नसलेला व्यक्ती

५. प्रत्येक मतदाराला एकाच मतदार संघात व एकदाच नाव नोंदविता येते. मतदाराचे नाव दोन ठिकाणी असेल तर एका ठिकाणचे नाव वगळले जाते.

६. राष्ट्रपतींनी अपात्र ठरविलेल्या व्यक्ती


 मतदारनोंदणीसाठी आवश्यक नमूना-

मतदार नोंदणीसाठी आवश्यक विहित नमूने निवडणूक आयोगाने निश्चित केलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे होत.

१. नमुना ६- मतदार यादीत नाव नसल्यास नमुना ६ भरून दयावा लागतो. पहिल्यांदा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी १८ वर्ष वय पूर्ण झाल्याचा आणि रहिवासी असल्याचा पुरावा जोडून नमुना ६ भरावा लागतो. मतदार संघबदलल्यास नव्या जागी नाव समाविष्ट करण्यासाठी देखील नमुना नंबर ६ भरावा लागतो.

. नमुना ७- मतदार यादीतील नावाबद्दल आक्षेप असल्यास तो नमुना ७ मध्ये नोंदवावा लागतो. या नमुन्यात स्वतःचा भाग क्रमांक, क्रमांक, अनुक्रमांक यांची माहिती नमून्यात नमूद करावी लागते.

३. नमुना ८ व ८ अ- मतदार यादीतील नावात किंवा तपशिलात चुका असल्यास दुरुस्त करण्यासाठी नमुना ८ भरावा लागतो. एकाच मतदार संघात पत्ता बदलल्यास किंवा मतदान केंद्र बदल्यास किंवा मतदाराचे नाव स्थलांतरित करावयाचे असेल तर नमुना ८ अ भरावा लागतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video