बुधवार, २३ मार्च, २०२२

निवडणुक ओळख पत्र निर्मिती प्रकिया

 

निवडणुक ओळख पत्र निर्मिती प्रकिया

(EPIC Electoral Photo Identity Card) 

    लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ कलम ६१ ब व मतदार नोंदणी अधिनियम १९६० च्या नियम २८ मध्ये मतदारांची ओळख पटविण्यासाठी सर्व पात्र मतदारांना ओळखपत्रे देण्याबाबत आयोग निर्णय आदेश देऊ शकते अशी तरतूद केलेली आहे. सर्व मतदारांना ओळखपत्रे उपलब्ध करून दिल्यास मतदानात होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालता येईल. एक मतदार दुसऱ्या मतदाराच्या जागेवर मतदार करणार नाही. २८ ऑगस्ट १९९३ ता निवडणूक आयोगाने सर्व लोकसभा मतदार संघातील मतदारांना ओळखपत्रे उपलब्ध करून दयावीत हे निर्देश दिले होते. ११ जानेवारी १९९५ नंतर होणाऱ्या निवडणुकीत ओळखपत्रे वापरणे बंधनकारक केले होते. परंतु बहुसंख्य लोकांची ओळखपत्रे तयार न झाल्यामुळे ही अट नंतर शिथिल करण्यात आली. २ एप्रिल २००४ रोजी आयोगाने काढलेल्या आदेशानुसार मतदान करताना निवडणूक ओळखपत्र सादर करणे आवश्यक केलेले आहे. ओळखपत्र नसेल तर आयोगाने निश्चित केलेल्या १४ फोटो पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

निवडणूक ओळखपत्रे तयार करण्याचा सर्व खर्च सरकारमार्फत केला जातो. ओळखपत्रे ओळखपत्राला विशिष्ट हे निवडणुकीसाठी अधिकृत ओळखपत्र वापरले आणिोलोग्र जाते. ओळखपत्रावरील तपशिल, भाषा, त्याचा आकार, जाडी, मजकूर इत्यादी बाबी आयोग निश्चित करत असतो. महाराष्ट्रात मराठी व इंग्रजी भाषेत ओळखपत्रे उपलब्ध करून दिली जातात. त्या राज्याची राजभाषा आणि इंग्रजीत ओळखपत्रे साधारणत: उपलब्ध करून दिली जातात. ओळखपत्रावर मतदाराचे नांव, त्यांच्या/तिच्या वडीलांचे/ पतीचे नांव, लिंग, पत्ता, वय, यादी-भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदारसंघाचा जिल्ह्याचा राज्याचा क्रमांक हा तपशील व मतदाराचे छायाचित्र असते, मतदार नोंदणी अधिकाराची स्वाक्षरी असते. ओळखपत्र दोन प्रतीत तयार केले जाते. एक प्रत मतदाराला आणि दुसरी प्रत नोंदणी अधिकाऱ्यांकडे असते. ते नष्ट झाल्यास पैसा भरून दुसरे तयार करून दिले जाते. प्रत्येक ओळख विशिष्ट क्रमांक आणि होलोग्रॉम असतो. मतदानांना छायाचित्र असलेले ओळख देण्याची योजना निवडणूक सुधारणतेलील महत्त्वपूर्ण पाऊत मानले जाते. छायाचित्र असलेल्या मतदान ओळखपत्रामुळे दुसन्याच्या नावावर मत देण्याच्या गैरप्रक आळा बसण्यास मदत मिळाली आहे. दुसऱ्याच्या नावावर मतदान होऊ नये भारत उमेदवार आपले प्रतिनिधी नमू शकते. ते प्रतिनिधी मतदाराच्या ओळखआक्षेप घेऊ शकतात. अर्थात प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारास प्रतिनिधी मिळतील याची खात्री नसते. अशा वेळेस छायाचित्रांकित ओळखपत्र हा ओळखीचा सर्वात महत्त्वपूर्ण पुरावा ठरतो.

मतदार ओळखीसाठी आवश्यक पुरावा- निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आणि विश्वसनीय स्वरुपाची बनण्यासाठी  मतदारांची ओळख पटणे आवश्यक असते. मतदारांची ओळख योग्य पद्धतीने उमेदवारांचे प्रतिनिधि आणि निवडणूक कार्यात कार्यरत कर्मचाऱ्यांना पटावी म्हणून आयोगाने प्रत्येक मतदाराला फोटा ओळखपत्रे बहाल केलेले आहे. फोटो मतदार यादी देखील उपलब्ध करून दिलेली असते. ओळखपत्र आणि मतदार यादीतील फोटोची खात्री करून मतदाराला मतदान करू दिले जाते. मतदाराकडे ओळखीचा पुरावा नसल्यास दुबार मतदान होण्याची किंवा खऱ्या मतदाराऐवजी दुसराच व्यक्ती त्यांच्या नावाबर मतदान करण्याची शक्यता असते. निवडणुकीत गैरप्रकारांना रोखण्यासाठी १९९३ साली आयोगाने काढलेल्या आदेशानुसार सर्व मतदारांना शासनाने ओळखपत्रे उपलब्ध करून दिलेली आहे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्रे आवश्यक पुरावा मानला जातो. परंतु मतदारांकडे अनेकदा ओळखपत्रे नसते. ओळखपत्रे नष्ट झालेले वा हरवलेले असते अशा परिस्थितीत मतदारांना मतदान करता यावे म्हणून निवडणूक आयोगाने २ एप्रिल २००४ साली काढलेल्या आदेशानुसार मतदाराची ओळख पटविण्यासाठी १४ पुराव्याची यादी दिलेली आहे. आयोगाने पुढील कागदपत्रांना ओळखीचा पुरावा म्हणून मान्यता दिलेली आहे. १. पासपोर्ट २. वाहन परवाना ३. आयकर पॅन कार्ड ४. सेवा ओळखपत्र ५. पोस्ट-बँक पासबुक ६. विद्यार्थी ओळखपत्र ७. मालमत्ता विषयक कागदपत्रे ८. रेशनकार्ड ९. जातीचे प्रमाणपत्र १०. पेन्शनपत्रे ११. स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्रे

सविस्तर माहितीसाठी येथे क्लीक करा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...