बुधवार, ६ जुलै, २०२२

राजकीय श्रेष्ठीजनाचे अभिसरण व बदल Circulation of Political Elites

 

श्रेष्ठीजनाचे अभिसरण व बदल :-

राजकीय अभिजनविषयक सिद्धांत मांडणाऱ्या अभ्यासकांनी समाज व्यवस्थेवर आपले वर्चस्व व सत्ता टिकविण्यासाठी हा वर्ग एकोप्याने वागतो असा दावा करतात. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात राजकीय अभिजन वर्गामध्ये एकीचा अभाव दिसून येतो. पक्षांतर्गत गटबाजी, सत्ता संघर्ष, निवडणुका, वैचारिक मतभेद, सत्ताप्राप्ती इत्यादी घटकांमुळे राजकीय अभिजनातील एकी नष्ट होत असते. उदा. आंध्रप्रदेश राज्यात चंदाबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी तेलगू देशम पक्षात फूट पाडली होती. श्रेष्ठीजन निर्मिती एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत श्रेष्ठीजनाचे सतत अभिसरण सुरू असते. अभिसरणाशिवाय कोणतेही व्यवस्था गतिमान होणार नाही. व्यवस्थेनुसार

अभिसरणाची प्रक्रिया बदल असते. पुढील कारणामुळे श्रेष्ठीजनामध्ये बदल होतो.

१) सत्ताधीश व प्रतिश्रेष्ठीजन :- सत्ताधीश म्हणजे प्रत्यक्ष सत्तेवर असलेले आणि प्रतिश्रेष्ठीजन म्हणजे सत्तेवर असणाऱ्यांना विरोध करणारे असे दोन वर्ग लोकशाहीत दिसून येतात. लोकशाहीत निवडणुकीमुळे राजकीय पक्षांमध्ये सत्तेचे सतत संक्रमण होत असते. आजचे सत्ताधीश निवडणुकीत पराभूत झाल्यास उद्याचेप्रतिश्रेष्ठीजन बनतात. उदा. झग्लड आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षपद्धती असल्यामुळे सातत्याने सत्तांतर होऊन श्रेष्ठीजनाच्या भूमिका बदलत असतात. अनेक देशात निवडणुकीच्या काळातील सत्तात्तरामुळे श्रेष्ठीजनाच्या भूमिका बनतात. तसेच जे निवडून आलेले आहेत आणि ज्यांना बहुमत मिळले त्यांचा समावेश सत्ताधारी वर्गात होतो. याउलट जे निवडून आलेले असतात पण बहुमत न मिळाल्यामुळे ज्यांना विरोधात बसावे लागते त्यांचा समावेश प्रतिश्रेष्ठजन वर्गात होतो. प्रतिश्रेष्ठजन हा वर्ग प्रत्यक्ष सत्तेवर नसतो मात्र संधी मिळाल्यास सत्ता संभाळण्यास तयार वा पात्र असतो. प्रतिश्रेष्ठजन निर्णय घेत नसला तरी निर्णय प्रक्रियेला प्रभावित करत असतो तसेच पर्यायाच्या रूपात कार्य करत असल्यामुळे सत्ताधारी वर्गावर अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवित असतो. उदा. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकाराचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ते प्रतिश्रेष्ठजन बनले आणि भाजपप्रणित लोकशाही आघाडीस निवडणुकीत यश मिळाल्यामुळे सत्ताधीश बनले. सत्ताधीश आणि प्रतिश्रेष्ठजन यात सतत सत्ता मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेत ज्यांना बहुमत मिळते सत्ताधीश बनतो. सत्तेबाहेर असलेले लोक प्रतिश्रेष्ठजन बनतात.

२) राजकीय भरतीच्या मार्गाने बदल वा अभिसरण:- राजकीय भरतीमुळे देखील श्रेष्ठीजन बदलतात. लोकशाही व्यवस्थेत विशिष्ट काळानंतर निवडणुका होतात. निवडणुकीत सत्ता बदल होत असल्याने श्रेष्ठींजन बदलतात. उदा. १९७७ साली जनता पक्ष सत्तेवर आला तर १९८० साली काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. निसर्गनियमाप्रमाणे काही लोक निवृत्त होतात त्यांच्या रिकाम्या जागी नवीन माणूस नेमला जातो. लोकशाही व्यवस्थामध्ये राजकीय पदासाठी कमाल वयाच्या मर्यादाची अट नसल्यामुळे त्यांची निवृत्ती ऐच्छीक असते. उदा. सिताराम केसरीच्या निवृत्ती नंतर सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या. तसेच मृत्युमुळेही श्रेष्ठीजनाचे अभिसरण होते. लढाईतील मृत्यूमुळे राजकीय सत्तेचे अभिसरण होत असे. उदा. इंदिरा गांधीच्या मृत्युनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.या शिवाय हुकूमशाही देशात पक्षांतर्गत गटस्पर्धा, सत्तास्पर्धा किंवा देशांतर्गत क्रांती होऊन एकाची सत्ता जाऊन दुसरा व्यक्ती सत्तेवर येतो. उदा. पाकिस्तानात नवाज शरीफ यांची सत्ता जाऊन परवेझ मुशर्रफ सत्तेवर आले. ही परिवर्तनीय विशेषतः हुकूमशाही देशामध्ये जास्त दिसून येतात.

३) विविध स्तरावरील अभिसरण वा बदल:- राजकीय दृष्टिकोनातून राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक या पातळया पडतात. तीनही पातळीवर नेतृत्व तयार होते. सामान्यतः राजकीय कर्तृव्य, अनुभव, वरिष्ठ राजकीय नेत्याशी लागेबांधे आणि जनमतांचा पाठिंबा इत्यादींच्या आधारावर स्थानिक पातळीवरील श्रेष्ठीजनकालातराने वरच्या पातळीवर जात असतात, उदा. व्ही पी सिंग है उत्तर प्रदेशाच्या स्थानिक पातळीवरून मुख्यमंत्री त्यानंतर केंद्रीय मंत्री व पंतप्रधान बनले. ज्या पद्धतीने खालून वरती अभिसरण होते त्याच पद्धतीने वरून खाली देखील अभिसरण होत असते. उदा. शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री होते त्यानंतर ते परत राज्याचे मुख्यमंत्री बनले. याउलट काही राजकीय नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर निर्माण होते उदा. सोनिया गांधी आणि राहुल गांधी

४) सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत बदल:- सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत बदलामुळे अभिजन वर्गात बदल घडून येतो. पारंपरिक समाजातील अभिजन वर्ग व आधुनिक समाजातील अभिजन वर्ग यांच्यात फरक दिसतो. सामाजिक व आर्थिक बदलामुळे भारतातील अनेक घटकराज्यात मागासलेल्या राज्यकारणात सहभाग प्राप्त झाला. त्याचा परिणाम उच्च जातीतील पारंपरिक अभिजन वर्गाची पिछेहाट झाली. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीतून बहुजनामध्ये मोठया प्रमाणावर राजकीय जागृती झाल्यामुळे इतर मागासवर्गिय समाजातून नव नेतृत्वाचा उदय झालेला दिसून येतो. उदा. मायावती सारखी दलित स्त्री उत्तरप्रदेश राज्याची चारदा मुख्यमंत्री झाली. शिक्षणाचे प्रमाण बाढू लागताच विधिमंडळात सुशिक्षित वर्गाचे प्रमाण वाढू लागले. गुटस्मन यांनी ब्रिटनमधील राजकीय अभिजन विषयक अभ्यासात सामाजिक व आर्थिक बदलाबरोबर राजकीय अभिजन वर्गातही बदल होऊ लागला हे दाखवून दिले आहे. उदा. १८६८ ते १८८६ पर्यंत कामगार वर्गाचा मंत्रिमंडळात एकही प्रतिनिधी नव्हता. १९३५ वे १९५५ या काळात कामगार वर्गाचे मंत्रिमंडळात २१ लोक प्रतिनिधित्व करत होते यावरून बदलत्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा परिणाम श्रेष्ठीजन अभिसरणात होत असतो.

अशा पद्धतीने राजकीय सत्ता स्पर्धा, राजकीय भरती, विविध स्तरातील अभिसरण आणि सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या बदलातून राजकीय अभिजनामध्ये बदल होत असतो. सर्वंकष व्यवस्थेत वरील मार्गापैकी दुसऱ्या मार्गाद्वारे राजकीय श्रेष्ठीजनांमध्ये बदल होत असतो मात्र लोकशाही व्यवस्थेत वरील चार ही मार्गाने राजकीय अभिजनाचे अभिसरण होत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...