समुदायवाद अवधारणा परिचय आणि परीक्षण
समुदायवाद हा नवीनतम स्वरूपाचा विचार असला तरी समुदायवादाची
बीजे प्लेटो, अॅरिस्टॉटल, रूसो, हेगेल, ग्रीन आणि कार्ल
मार्क्ससारख्या विचारवंताच्या विचारात आढळून येतात. १९६० व ७० च्या दशकात
मार्क्सवादी सिद्धांताच्या विरोधात व्यक्तीच्या प्राकृतिक वा नसर्गिक अहस्तांतरित
अधिकारांचे समर्थन करणाऱ्या विचारसरणीला स्वतंत्रतावाद का स्वेच्छाचारितावाद किंवा
नवउदारमतवाद नावाने संबोधिले जाते. हायेक, फ्रीडमन, जॉन रॉल्स, रॉबर्ट नॉजिक व द्वारकिन इत्यादी
विचारवंत स्वतंत्रतावादाचे प्रमुख समर्थक मानले जातात. नवउदारमतवादाची व्यक्तीला
प्रकृतीकडून अधिकार प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीचे अधिकार जन्मजात असतात कारण
ते व्यक्तीला जन्मतः प्राप्त होतात.व्यक्तीचे अधिकार जन्मजात असल्यामुळे ते
हिरावून घेण्याचा अधिकार वा प्रतिबंध लादण्याचा अधिकार समाज व राज्याला
नाही.स्वातंत्र्यावर केवळ संरक्षणाच्या कारणावरून राज्याला प्रतिबंध लादता येतील.
राज्याचे कार्य न्यूनतम स्वरूपाचे असले पाहिजे. रॉबर्ट नॉजिक सारखे अभ्यासक
न्यूनतम राज्याची (Minimal State) संकल्पना मांडतात.
समुदायवादाचा जन्म वरील मुद्यांचे खंडन करण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे समुदायवाद
ही विचारधारा उदारमतवादाची प्रतिक्रिया मानली जाते. १९७१ मध्ये जॉन रॉल्सचे 'A
Theory of Justice' हे पुस्तक प्रकाशित झाले. जॉन रॉल्स यांनी
स्वातंत्र्य आणि समानतेची व्याख्या करताना समुदाय संकल्पनेकडे दुर्लक्ष केले.
रॉल्सच्या सामाजिक न्याय सिद्धांताने राज्यशास्त्रात राजकीय तत्त्वज्ञानाची
पुनर्स्थापना केली आणि सार्वभौमिक मूल्यांची स्थापना केली. या सार्वभौमिकतेच्या
प्रतिक्रियेच्या स्वरूपात आधुनिक समुदायवाद विचारधारेचा उदय झाला असे मानले जाते.
समुदायवाद अर्थ व वैशिष्ट्ये'-समुदायवाद' शब्दाचा
सर्वप्रथम वापर गुडविन बारम्बी यांनी केलेला आढळतो. हेवूड समुदायवादाला विचारधारा
न मानता सैद्धांतिक प्रवृत्ती मानतात. समुदायवाद व्यक्तिवादाला विरोध करून राजकीय
जीवनातील समुदायाच्या महत्त्वावर भर देतात. राजकीय संस्थांच्या विकासात समुदायाचे
महत्त्वपूर्ण स्थान असते यावर जोर देतात. मायकल सैण्डल, माइकल
वॉल्जर, एलीस्डेयर, मॅकेन्टायर,
डेनियल बेल आणि चार्ल्स टेलर हे समुदायवादाचे समर्थक मानले जातात.
इंग्रजीतील Community या शब्दापासून Community हा शब्द बनला आहे. हा समुदायवादाचा शब्दश: अर्थ सांगता येतो. विशिष्ट भूभागात
दीर्घकाळापासून निवास करणाऱ्या आणि परस्परांच्या सहकायनि जगणाऱ्या व्यक्ती गटाला
समुदाय असे म्हणतात. समान जीवनमूल्य असणाऱ्या आणि विशिष्ट ध्येय, हितसंबंधाची एकत्र येणाऱ्या व्यक्तीगटाला
देखील समुदाय असे म्हटले जाते. उदारमतवादी असे मानतात की, प्रत्येक
व्यक्तीला आपले हित-अहित योग्य प्रकारे समजत असल्यामुळे समाज व राज्याने व्यक्तीला
आपल्या इच्छेनुसार विकास घडवून आणण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. व्यक्तीच्या
जीवनात हस्तक्षेप करू नये, असे विचार व्यक्त करून व्यक्तीला
प्राधान्य देतात. समुदायवादी स्वउदारवाद्यांच्या उपरोक्त विचारांना विरोध करतात.
समुदायवाद्याच्या मते, व्यक्ती हा समुदायाचा अविभाज्य भाग
असल्यामुळे तिचा स्वतंत्रपणे विचार शक्य नाही. म्हणून व्यक्तीला समाजापासून
स्वतंत्र मानून स्वातंत्र्याचा अधिकार दिला जाऊ शकत नाही. समुदायवाद म्हणजे
प्रत्येक समाजाच्या अंतर्गत सहभागी व्यवहार आणि विश्वासाला महत्त्व देणारा विचार
आहे.
समुदायवादाची वैशिष्ट्ये-
1.
व्यक्तीचे
अस्तित्व स्वतंत्र नसून ते समाज वा समुदायाद्वारे निर्माण होत असते. व्यक्ती
समाजात जन्माला येत असतो आणि त्याची जडणघडण समुदायाने निर्माण केलेल्या सांस्कृतिक
वातावरणात होत असते.
3.
व्यक्तीजवळ
अहस्तांतरित कर्तव्ये असतात. त्यामुळे कर्तव्यांचे पालन करणे व्यक्तीवर बंधनकारक
असते.
4.
समुदायवादी
लोकतांत्रिक स्वरूपाच्या राज्याला मान्यता प्रदान करतात. या राज्याला नागरिक
काळानुरूप आकार देत असतात असे मानतात.
5.
समुदायवादी
उत्तरदायी स्वरूपाच्या राज्याला मान्यता देतात. ज्या प्रकारे राज्य व्यक्तीला
उत्तरदायी असते तसेच राज्याचा सदस्य व्यक्तीदेखील राज्याचा उत्तरदायी असतो.
समुदायवादाचा
स्वरूप- समुदायवाद शब्दाचा वापर तत्त्वज्ञानात्मक
आणि वैचारिक या दोन अर्थाने केला जातो. तत्त्वज्ञानात्मक स्वरूपाचा समुदायवाद
नवउदारवाद आणि स्वेच्छाचारितावाद यांना अयोग्य मानून टीका करतात. नवउदारवादी
समुदायाला व्यक्तीच्या ऐच्छिक गतिविधिचे फळ मानतात. समाजाची व्यक्ती
जीवनात विशेष स्वरूपाची भूमिका नसते याचा अर्थ उदारवादी समुदायाच्या उपयोगितेचा
पर्याप्त व्यक्तीच्या विकासात समुदायाची भूमिका मानतात. व्यक्तीचा विकास
समुदायांतर्गत स्वरूपात विचार करत नाही. याउलट तत्वज्ञानात्मक स्वरूपात समुदायवादी
होऊ शकतो असे मानतात. वैचारिक समुदायवाद समुदायावर आपल्या विचारांची वनात वामपंथी
विचारधारा इमारत उभी करण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक विवेचनात व सामाजिक
रूढीवादाचा आधार घेतात, समुदायाचे
मूल्य आणि विश्वास सार्वजनिक जीवनात कायमस्वरूपी अस्तित्वात राहावे. व्यक्ती एकाकी
जीवन जगत नसून तिची मळे समाजात रुजलेली असतात कारण व्यक्ती समाजात जन्माला येते.
तिच्या जन्माआधीपासून समाज अस्तित्वात असतो. व्यक्ती समाजाकडून संस्कार घेत असते.
व्यक्तीचा बौद्धिक विकास समाजाची देणगी आहे. त्यामुळे ते व्यक्तीकडून समुदायाप्रति
आदर व सन्मानाची अपेक्षा करतात. समाजातील विद्यमान संस्थांचे समर्थन करतात आणि
त्या संस्थांकडून व्यक्तीस शिक्षण, स्वच्छ पर्यावरण आणि
सामाजिक संरक्षण मिळत असते.
समुदायवादाचे
परीक्षण- उदारमतवादाला पर्याय
देणाऱ्या गरजेतून समुदायवादाचा उदय झाला. समुदायवादाने व्यक्तीपेक्षा समुदायाला
जास्त महत्त्व दिलेले आहे. उदारमतवादी अभ्यासकांनी समुदायवादावर पुढील आक्षेप
घेतलेले आहेत.
समुदायवादी
विचारधारा रूढीवादी व सत्तावादी आहे, असा आक्षेप घेतला जातो. समुदायवादी विद्यमान सामाजिक संघटन व नैतिक
नियमांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.
स्त्रीवादी
अभ्यासकांच्यामते समुदायवादी विचारधारा रुढीवादी विचारधारा आहे. समाजातील रूढी, परंपरा यात परिवर्तन घडवून आणण्यास विरोध
करतात. रूढी व परंपरेमुळे स्त्रिया व वंचित वर्गाच्या होणाऱ्या शोषणाकडे दुर्लक्ष
करतात. समुदायवादी विचारधारा व्यक्तीचे स्वातंत्र्य व अधिकारांची उपेक्षा करतात.
व्यक्तीला स्वातंत्र्याचे समर्थन करण्याऐवजी समुदायाच्या स्वातंत्र्यावर भर देतात.
व्यक्तीच्या अधिकाराऐवजी कर्तव्य व उत्तरदायित्व निभावण्यावर भर देतात.समुदायवादी
सामाजिक व राजकीय यांच्यातील सीमारेषा पुसट करतात. समुदायाचा सदस्य ही व्यक्तीची
ओळख मानतात तर नागरिकत्वातून तिचा औपचारिक राजकीय दर्जा व्यक्त होतो. परंतु
समुदायाचे सदस्य हे व्यक्तिगत व सामाजिक स्वरूपाचे असतात. नागरिकत्व हे
कायद्याद्वारे व्यक्तीला प्राप्त होत असते. समुदायवादी राजकीय क्षेत्रात सामाजिक व
व्यक्तिगत क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा प्रयत्न सार्वजनिक आणि
खाजगी जीवनाची सरमिसळ करणारा आहे असे टीकाकारांना वाटते. समुदायवादाची नेमकी व
सुस्पष्ट व्याख्या तिच्या पुरस्कर्त्यांना करता आली नाही. समुदायवाद्यांची
राज्यविषयक भूमिकादेखील सर्वंकषवादाच्या जवळ जाणारी वाटते. राज्याकडे पालकत्वाची
भूमिका सोपवतात. समुदायवादी समुदाय आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरा यात समन्वय
प्रस्थापित करण्याची कसरत करतात. परंतु दोन्हीमध्ये समन्वय प्रस्थापित करणे अत्यंत
अवघड काम असल्याचे प्रत्यक्षात समुदायवादी विवेचनाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात
येते. त्यांनी केलेला समन्वय अत्यंत कुचकामी व अशास्त्रीय स्वरूपाचा जाणवतो.
सारांश-समुदायवादी विचारधारेने राजकीय प्रक्रियेतील समुदायाचे
महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवी जीवनातील अतिव्यक्तीकेंद्री
आणि व्यक्तीच्या स्वायत्ततेच्या गुणगान करणाऱ्या नवउदारवादी विचारधारेचे उणिवा
उजागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समुदायवाद हा आधुनिक राजकीय आणि सामाजिक तत्त्वज्ञानातील
महत्त्वाचा विचार प्रवाह मानला जातो. व्यक्ती स्वातंत्र्यांसोबत सामूहिक हित
परंपरा आणि नैतिक मूल्ये यांच्या आधारावर समाजाची रचना करण्यावर भर देतो. वैयक्तिक
स्वातंत्र्य संकल्पनेला पर्याय म्हणून सामूहिक नैतिकता आणि सामाजिक बंद यांना
केंद्रबिंदू मानतो.
संदर्भ
सूची-
1.
Etzioni, A. (1998). The Essential Communitarian Reader. Rowman &
Littlefield.
2.
Macintyre, A. (1981). After Virtue. University of Notre Dame Press.
3.
Sandel, M. (1982). Liberalism and the Limits of Justice. Cambridge
University Press.
4.
Taylor, C. (1994). Multiculturalism: Examining the Politics of Recognition.
Princeton University Press.
5.
Parekh, B. (2000). Rethinking Multiculturalism: Cultural Diversity and
Political Theory. Harvard University Press.
6.
Bhargava, R. (2010). What is Political Theory and Why Do We Need It? Oxford
University Press.
7.
महेंद,
पाटील (2018). आधुनिक राजकीय सिद्धांत.अथर्व प्रकाशन जळगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box