मंगळवार, ५ जुलै, २०२२

राजकीय अभिजन वा श्रेष्ठजन व्याख्या, अर्थ, इतिहास,स्वरूप आणि वैशिष्टये Political Elite Meaning, History, Nature and Characteristics

 



राजकीय अभिजन वा  श्रेष्ठजन व्याख्या, अर्थ, इतिहास,स्वरूप आणि वैशिष्टये

Political Elite Meaning, History, Nature and Characteristics

राजकीय श्रेष्ठजन म्हणजे काय ?

सर्वंकषवादी, हुकूमशाही राजकीय व्यवस्था मानवी असमानतेवर आधारलेल्या असतात. समाजात मूठभर लोक राज्यकर्ते म्हणून जन्माला आलेले असतात त्यांनी राज्य करावे आणि इतरांनी त्यांच्या आज्ञेचे पालन करणे अपेक्षित असते. परंतु लोकशाही व्यवस्थेत मानवी समानतेला महत्व दिले जाते. सर्व नागरिकांना समान योग्यतेचे मानले जाते आणि सर्वांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाते पण प्रत्यक्ष व्यवहारात लोकशाही शासनव्यवस्थेत देखील मूठभर लोकांच्या हातात सत्ता असते त्या सर्वांची संमती असते. राजकीय प्रक्रियेत सत्तास्थानी असलेल्या  वर्गासाठी श्रेष्ठजन ही संकल्पना जर अधिकृत मूल्य वाटप करण्याचा अधिकार या वर्गाला असल्यामुळे हा वर्ग कायमस्वरूपी सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करीत असतो. अधिकृत मूल्यांचे निर्धारण आणि अधिकृतपणे दंडशक्तीचा वापर करण्याच्या अधिकारामुळे अभिजन वर्गाबद्दल समाजात आदर आणि भीतीची भावना देखील अस्तित्वात असते. राजकीय अभिजन हे समाजातील व्यक्तीवर हुकूमत गाजवित असतात. समाजातील विविध ग आणि हितसंबंधी संघटना यांच्याशी संबंध ठेवून अभिजन वर्ग आपले जास्तीत जास्त प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. या वर्गाला शासक या नावाने ओळखत असतो. प्रत्येक शासनव्यवस्थेत शासक व शासित असे दोन वर्ग अस्तित्वात असतात. शासकवर्गात काही थोडया किंवा समाजातील मूठभर व्यक्तीचा समावेश असतो. शासिताच्या पाठिंबा किंवा आवश्यकता भासल्यास दशक्तीच्या जोरावर हा वर्ग सत्तेचा उपभोग घेत असतो, प्रत्येक राजकीय व्यवस्थेत पदसोपान अस्तित्वात असते, या पदसोपानाच्या शिरोभागी राहून हा वर्ग सत्ता गाजवित असतो. विशेष योग्यता, कौशल्य, बुद्धिमत्ता आणि गुणांच्या आधारावर हा वर्ग, संपूर्ण समाज आणि राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवित असतो. संपूर्ण निर्णय प्रक्रिया या वर्गाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असते.

प्रत्येक राजकीय व्यवस्थेत सत्ता मूठभर लोकांच्या हाती असते. ज्या देशात लोकशाही असते तेथे देखील सर्व नागरिक सत्ता गाजवितात असे नाही म्हणजे प्रत्यक्ष सत्ता गाजविणारे थोडे लोक असतात अर्थात ते सर्वांच्या वतीने गाजवितात त्यांना श्रेष्ठीजन असे म्हणतात. प्रत्येक समाजात श्रेष्ठीजन संकल्पना कमी अधिक प्रमाणात आढळतात.. या संकल्पनेचा संबंध नैसर्गिक व व्यावहारिक या दोन्ही गोष्टीशी निगडित आहे. निसर्गाला समता मान्य नाही. निसर्गाने प्रत्येकाला उपजत गुण दिले आहेत. ते सर्वांना सारखे मिळालेले नाहीत. बुद्धी, सौदर्य व शारिरीक क्षमता इ. बाबत नैसर्गिक विषमता जाणवते. परिणामी निसर्गाला विषमता मान्य आहे असा त्यांचा अर्थ होतो. यातून श्रेष्ठ व कनिष्ठ असे दोन वर्ग निर्माण होतात. प्रत्येक समाजात श्रीमंत गरिब, श्रेष्ठ कनिष्ठ, सत्ताधीश सत्ताहीन प्रत्येक व्यवस्थेत दिसून येतात.

श्रेष्ठीजन व्याख्या वा अर्थ :-

'Elite' हा इंग्रजी शब्द 'Eligere' शब्दापासून बनलेला आहे. त्यांचा शाब्दिक अर्थ 'काही लोकांची निवड' असा होतो परंतु हा अर्थ अत्यंत संकुचित स्वरूपाचा आहे. श्रेष्ठजन शब्दाचा अर्थ नेतृत्वाच्या संदर्भात केला जातो. नेतृत्वाच्या संदर्भात अभिजन संकल्पनेचा विचार प्लेटो आणि अॅरिस्टॉटलच्या काळापासून केला जात आहे शासन किंवा राज्यकारभार चालविण्यासाठी विशिष्ट गुणांची आवश्यकता असते आणि ते गुण समाजातील विशिष्ट वर्ग वा लोकांजवळ असतात ज्याकडे से असतात त्यांना शासन करण्याचा नैसर्गिक अधिकार असतो. आधुनिक काळात 'अभिजन' (Elite) शब्दाचा वापर सर्वप्रथम १७ व्या शतकात विशेष श्रेष्ठता धारण करणाऱ्या वस्तुचे वर्णन करण्यासाठी केला गेला नंतरच्या काळात ह्या शब्दाचा वापर शक्तीशाली सैनिक अधिकारी आणि उच्च दर्जाच्या सामतासाठी वापर केला जाऊ लागला. ब्रिटन आणि अमेरिकेत या शब्दाचा वापर १९३० नंतर मोठ्या प्रमाणात राज्यशास्त्रात वापरला जाऊ लागला. दुसऱ्या महायुद्धानंतर अभिजन सिद्धांत फार लोकप्रिय बनले. १९५० मध्ये अमेरिकन समाजशास्त्रज्ञ शुम्पीटर, अर्थशास्त्रज्ञ लासवेल आणि राजशात्रज्ञ सी. राईट मिल्स यांच्या द्वारा अभिजन शब्दाचा विभिन्न स्वरूपात वापर केला. इटालियन विचारवंत विल्फ्रेड पेरेटो, गेटेनो प्रॉस्का, राबर्ट मिचेल्स, सी. राईट मिल्स, बोटोमोर, कार्ल मॅनहम, जार्ज आटेंगा, बाई, गैसेट यांनी अभिजनवादी सिद्धांताची मांडणी करून ही संकल्पना विकसित केलेली आहे.

१) दुवर्जर : श्रेष्ठीजन म्हणजे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सर्वाधिक कार्यक्षम वा कर्तृव्यवान व्यक्ती होय.

२) रॉबर्ट ढाल : राजकीय संघर्षाच्या निराकरणात ज्या विशिष्ट लोकांच्या पसंतीनुसार सातत्याने निर्णय घेतले जातात अशा आकाराने लहान असलेल्या नियंत्रक गटास श्रेष्ठीजन म्हटले जाते.

३) बटोमोर यांच्या मते, राजकीय सत्तेवर प्रभाव पाडणारा व सत्ता स्पर्धा किंवा सत्ता संघर्षात गुंतलेला असा व्यक्तींचा गट जो वर्ग असतो त्यापैकी विशिष्ट वेळी सत्तेचा प्रत्यक्ष वापर करणारा गट म्हणजे राजकीय अभिजनांचा गट होय.

वरील व्याख्याचा विचार करता असे दिसून येते की, प्रत्येक राजकीय व्यवस्थेत मूठभर लोकांची मक्तेदारी असते. या लोकांच्या इच्छेतून शासकीय धोरण, निर्णय आणि कार्यक्रम आखले जात असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व राजकीय व्यवस्था कार्य करीत असते. समाजातील इतर वर्गापेक्षा वेगळे स्थान के प्रतिष्ठा राजकीय अभिजनाचा असतो. त्यांच्या विशेषाधिकाराला देखील समाजाची अधिमान्यता असते.

राजकीय अभिजन वर्गाचे स्वरूप आणि वैशिष्टये :-

राजकीय अभिजन वर्गाची अभ्यासकांनी अनेक विशेषतः सांगितलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे होत.

१) राजकीय अभिजनाकडे विशिष्ट अशा पात्रता, कौशल्य आणि गुण त्या आधारावर ते बहुसंख्याकावर राज्य करत असतात.

२) राजकीय अभिजन बहुसंख्याकापासून अलिप्त राहून शासन करत असतात.

३) राजकीय अभिजनाकडे सार्वभौमत्व आणि दंडशक्ती असते त्या आधारावर शासितावर राज्य करीत असतात.

४) राजकीय अभिजन बनण्याची खुली स्पर्धा असते या स्पर्धेचा वापर करून कनिष्ठ व निम्न अभिजन समानतेच्या आधारावर स्पर्धेत सहभागी होऊन उच्च स्थान प्राप्त करू शकतात.

५) राजकीय अभिजनाची सत्ता वैधानिक आणि सनदशीर स्वरूपाची असते. सनदशीर सत्तेच्या जोरावर ते राजकीय व्यवस्थेची अधिमान्यता टिकवून ठेवत असतात.

६) राजकीय अभिजनाचे स्थान जनसमर्थनावर अवलंबून असते हे समर्थन अस्थायी स्वरूपाचे असते. सत्तांतराच्या विविध मार्गाच्या माध्यमातून हा जनाधार केव्हाही कमी होऊ शकतो ही अनामिक भीती त्यांना असते.

७) राजकीय अभिजनांना बल प्रयोगाचा वापर करण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त असतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाना विरोध होत असेल तर ते बलाचा वापर करून निर्णय मान्य करण्यास जनतेस बाध्य करू शकतात.

८) राजकीय अभिजन हे समाजातील अत्याधिक सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त गट असतो. तो राजकारणात नियमितपणे सक्रिय असतो. सत्तेपासून मिळणारे सर्व लाभ आणि फायदे या वर्गाला विनासाय मिळत असतात.

९) राजकीय अभिजनामध्ये समाजातील मूठभर लोकांचा समावेश होता. राजकीय योग्यता, संघटन कौशल्य, धाडस, निर्णयक्षमता इत्यादी गुणांचे अस्तित्व त्यांच्यात असते.

१०) राजकीय परिवर्तन आणि राजकीय राजकीय श्रेष्ठीजनाचे अभिसरण होत असते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...