शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

सत्तेचे संकल्पनेचे मूलभूत आधार आणि परीक्षण Fundamental Factor and Evaluation of Concept of Power

 

सत्तेचे संकल्पनेचे मूलभूत आधार आणि परीक्षण

Fundamental Factor and Evaluation of Concept of Power

सत्तेची निर्मिती अचानक होत नसून व्यतीत असलेल्या योग्यतेच्या आधारावर सत्ता प्राप्त होत असते. प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या योग्यतामध्ये फरक असल्यामुळे व्यक्ती व्यक्तीकडे असलेल्या सत्तेही फरक असतो. या फेरकाचे विश्लेषण करण्यासाठी सत्तेच्या मूळ आधाराचा शोध घेणे गरजेचे असते. सत्तेचे मूलभूत आधार पुढीलप्रमाण सांगता येतात.

१) शक्ती :- शक्ती ही नैसगिक देणगी असून तिच्यामुळे दुसऱ्याकडून सक्तीने कार्य करून घेण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. बळाचा वापर शारीरिक आणि मानसिक दबावासाठी केला जात असतो. शासनव्यवस्था वा राज्यकर्ता वर्ग पोलिस आणि लष्करी कार्यवाहीच्या माध्यमातून शक्तीचा वापर करीत असतात. शक्तीच्या वापरात यातना देणे, ठार मारणे, तरुंगात टाकणे, हद्दपार करणे इत्यादी मार्गांचा वापर करून दहशत निर्माण करून सत्तेची निर्मिती केली जात असते. प्राप्त झालेल्या सत्ता टिकविण्यासाठी देखील शक्तीचा वापर केला जातो. उदा. सर्वकपशाहीत दंडशक्तीचा वापर करून सत्ता निर्माण केली जाते वा टिकविली जात असते. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शारीरिक शक्तीसोबत मानसिक दडपणाचा देखील वापर केला जातो. समूहातील व्यक्तीवर दबाव आणून सत्तेची निर्मिती वा विकास केला जात असतो. संमोही नेतृत्व मानसिक दडपणाचा उपयोग करून सत्ता प्रस्थापित करत असतो. मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी संसूचन आणि प्रसिद्धी माध्यमाचा वापर करत असतात. उदा. हिटलरच्या काळात गोबेल्स नीतीचा अवलंब करून जर्मन जनतेवर मानसिक दडपण आणण्यात आलेले होते. आधुनिक काळात देखील राज्यकर्ता वर्ग प्रसिद्धी माध्यमाचा वापर करून लोकांच्या मनावर एखादा विचार बिंबविण्याचा प्रयत्न करत असतात. प्रसिद्धी तंत्र आणि व्यवस्थापन तंत्राचा वापर करून लोकांना मानसिक दडपणात आणून सत्तेला मान्यता मिळविता येते. उदा. हिटलर यांनी सत्तेवर आल्यानंतर सार्वमताचा वापर केला होता.

२) आर्थिक शक्ती :- आर्थिक शक्तीचा वापर करून देखील सत्ता निर्माण केली जात असते. लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा सत्ता मिळविण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग असतो. निवडणुका लढविण्यासाठी मोठया प्रमाणावर आर्थिक शक्तीची गरज असते. परिणामतः आर्थिकदृष्ट्या ताकदवान लोक राजकारणात सहभाग घेत घेतात. लोकशाही सर्वांना सत्तेत सहभागी करून घेणे हे स्वप्नच राहते. राजकीय सत्तेत नेहमीच अर्थकारणाला महत्त्वाचे स्थान असते. निवडणुका लढविण्यासाठी मोठया प्रमाणावर राजकीय पक्षांना निधीची गरज असते. ही निधी भांडवलदार वर्गाकडून उपलब्ध करून दिली जात असते. भांडवलदारांनी दिलेल्या आर्थिक सहाय्यातून सत्तेवर आलेले सत्ताधारी त्यांच्या हितसंबंध रक्षणासाठी सत्तेचा वापर करीत असतात. आधुनिक काळात आर्थिक शक्ती असलेले घटक स्वतः राजकारणात सहभाग घेऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतात. उदा. भारतात राज्यसभेची निवडणुकीत उदयोगपती आर्थिक शक्तीचा वापर करून विजय मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत.

 ३) राजकीय साधनसामुग्रीची मुबलकता :- सत्ता प्राप्त करण्यासाठी राजकीय साधनसामुग्रीची उपलब्धता देखील महत्त्वपूर्ण असते. राजकीय साधनसामुग्रीत विशिष्ट घराण्यात जन्म, उत्तम आर्थिक परिस्थिती, सामाजिक दर्जा, राजकीय अनुभव आणि राजकीय घडामोडीचे ज्ञान इत्यादीचा समावेश होतो. राजकीय साधनसामुग्रीची मुबलकता असलेल्या व्यक्ती सत्तेच्या राजकारणात सक्रिय होऊन ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. मात्र फक्त साधनसामुग्री असून उपयोगाचे नाही तर सत्ताप्राप्तीची आकांक्षा असणे आवश्यक आहे. सत्ताप्राप्तीविषयी आकर्षण नसेल तर ही साधने अनउपयुक्त असतात..

४) लोकमान्यता :- बळाच्या आधारावर अस्तित्वात असलेल्या सत्तेला मिळालेली अधिमान्यता ही तात्पुरत्या स्वरूपाची असते याउलट जनमान्यतेवर आधारलेली सत्ता टिकावू स्वरूपाची असते. टी.एच. ग्रीनच्या मते, 'सत्तेचा आधार शक्ती नसून जनइच्छा असते.' सत्ता टिकविण्यासाठी जनइच्छेची मान्यता आवश्यक असल्यामुळे राज्यकर्ता वर्ग सतत प्रयत्न करीत असतो. चर्चा, वाटाघाटी, आश्वासने इत्यादी मार्गानी प्रयत्न केला जात असतो. लोकशाही व्यवस्थेत नव्हे तर सर्वकष व्यवस्थेत सत्ताधारी वर्ग लोकमान्यता मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. बळाचा वापर करून सत्ता जास्त दिवस टिकू शकत नाही कारण सत्तेचा मुख्य आधार जनमान्यता आहे.

सत्ता संकल्पनेचे परीक्षण वा मर्यादा-

     सत्तावादी अभ्यासकांनी सत्ता संकल्पनेला राज्यशास्त्रातील मध्यवर्ती संकल्पना मानली आहे. अर्थव्यवस्थेत जे स्थान पैसाला असते त्याप्रमाणे राजकारणाला सत्ता असते. पैसाची अनेक साधने व मूलस्त्रोत असतात त्यामुळे सत्तेचे देखील अनेक मूलस्रोत असतात. पैसाप्रमाणे सत्तेचे काटेकोर मोजमाप करता येते असा दावा सत्तावादी करत असतात मात्र वरील सर्व दावे अशास्त्रीय आणि हास्यास्पद आहेत असे सत्तावादी अभ्यासकांचे विरोधक मानतात. सत्ता संकल्पनेवर विविध विचारवंत आणि नीतीवाद्यांनी पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

१) सत्तेचे मोजमाप करणे अशक्य :- सत्तावादी अभ्याक सत्ता संकल्पनेचे काटेकोर मापन करता देतो हा दावा करतात. लावेल, प्लान आणि ब्लोने उत्कृष्ट वापरून सत्तामापनाचे प्रयत्न केले मात्र ते विफल ठरले. कारण एका व्यक्तीवर सत्तेचा जो परिणाम होईल तेवढा दुसन्यावर होईलच असे नाही, म्हणून ब्लाँडने मान्य केले की, 'अ च्या सत्तेची व च्या सत्तेशी अचूक तुलना करता येईल अशी सार्वत्रिक मोजपट्टी शोधून काढणे अशक्य आहे.' याचा अर्थ सत्ता संकल्पनेचे मोजमाप करणे अशक्य आहे.

२) सत्ता संकल्पनेला अतेरिकी महत्त्व :- सत्ता संकल्पनेला सत्ताबादी अभ्यासकांनी दिलेल्या अतिरेकी महत्व दिलेले आढळते. सर्व सामाजिक व राजकीय जीवनात सत्तेचे अस्तित्व असल्यास कोणताही प्रश्न सुटू शकणार नाही. सत्तावादी व्यक्ती व्यक्तीचे संबंध मूलतः संघर्षाचे असतात त्यांच्यात आढळणारे सहकार्यामागे स्वार्थ भावना असते असे मानतात. सत्तावादाचा हा दृष्टिकोन अत्यंत अशास्त्रीय आहे. सत्तेचे विश्लेषण सत्तावादी व्यक्तिगत संबंधाच्या आधारावर करतात मात्र सामाजिक संबंधाकडे दुर्लक्ष करतात. सत्तेला समाजव्यापी संदर्भ देण्यात सत्तावादी कमी पडलेले आहेत.

३) राजकारण म्हणजे सर्वस्व नव्हे : व्यक्तीला फक्त राजकीय प्रेरणा क्रियान्वित करत नसतात. राजकारणाखेरीज सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रातील प्रेरणा देखील कियान्वियत करत असतात. उदा. नोबेल पारितोषिक प्राप्त कैलाश सत्यार्थी यांनी नोकरीचा त्याग करून आपले जीवन अनाथ मुलाच्या सेवेसाठी खर्च करीत आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतामध्ये कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसतानाही ते समाजघटकासाठी कार्य करीत असतात. मानवाला सत्तापिपासू प्राणी मानणे हा सत्तावादयांचा दृष्टिकोन राजकारणाला सर्वस्व मानतात हे मत प्रत्यक्ष व्यवहाराचा अभ्यास केल्यानंतर अयोग्य वाटते.

४) सत्ता हे साधन असते:- सत्तावादाचे अभ्यासक सत्तेला साध्य मानतात. परंतु सत्तेला साध्याचा दर्जा मिळूच शकत नाही. सत्ता हे मूलतः कशाचे तरी साधन असते. सत्ता साधनाच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या इच्छा आकांक्षाची पूर्ती करत असते.

५) राजकारण म्हणजे सत्तासंबंध नव्हे:- राजकारणाला सत्तासंघर्षाचा आखाडा मानणे नीतीवादयांना मान्य नाही. राजकारणाची ही ओळख समाजात नैराश्य निर्माण करणारी आहे. राजकारण म्हणजे निव्वळ सत्तासंघर्ष मानणे हे भयावह आहे त्यातून राजकारणाबद्दलचे भयंकर चित्र उभे राहते.

सत्ता संकल्पनेला सत्तावादी विचारवंतांनी दिलेल्या अवाजवी महत्त्वामुळे वरील टिकेला सामोरे जावे लागते.



 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...