मंगळवार, २२ मार्च, २०२२

गृहितकृत्य म्हणजे काय

 गृहितकृत्याची अर्थ,व्याख्या,उगमस्थाने आणि महत्त्व

गृहितकृत्ये (Hypothesis)- सामाजिकशास्त्रात वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करण्यासाठी संशोधकास विशिष्ट शिस्तीचे पालन करावे लागते. वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करण्यासाठी संशोधकाने निवडलेल्या समस्येविषयी पूर्वज्ञान असणे आवश्यक असते. पूर्वज्ञानाच्या आधारावर संशोधक आपल्या समस्येसंदर्भात सामान्य अनुमान या गृहितक निश्चित करतो. गृहितकृत्य हे भविष्यकाळात करणाऱ्या संशोधनाला मार्गदर्शन करण्याचे काम करतो. गृहितकृत्य तथ्यसंकलन, तथ्यवश्लेषणाला दिशा देण्याचे काम करत असतात. गृहित ही समस्येचा संभाव्य उत्तरे असतात. ही उत्तरे व्यवस्थितपणे विधानाच्या रूपात मांडावी लागतात. ती मांडताना शास्त्रीय नियमाचे पालन करावे लागते

गृहितकृत्याचा अर्थ आणि व्याख्या- अनुभवाधिष्ठित आणि शास्त्रीय संशोधनासाठी गृहितकृत्य आवश्यक मानली जातात. अध्ययन समस्येचे संभाव्य निराकरण करणारे उत्तर व्यवस्थित पद्धतीने मांडल्याशिवाय संशोधनाला चालना मिळू शकत नाही. अध्ययन समस्येविषयो असलेली माहिती, पूर्वज्ञान आणि अनुभवाच्या आधारावर संशोधक काही संभाव्य उत्तरे तयार करत असतो. सर्व प्रकारच्या संशोधनात गृहितकृत्ये आवश्यक मानली जात नाही. ऐतिहासिक अध्ययन पद्धतीवर आधारलेले अध्ययन किया नेतृत्वाचा अभ्यास करणान्या संशोधनात गृहितकृत्याची आवश्यकता नसते. अनुभवाधिष्ठित संशोधनात गृहितकृत्ये आवश्यक मानली जातात

. गुड आणि हॅट यांच्या मते,- ज्यांची सप्रमाणता ठरविण्यासाठी परिक्षण केले जाते आणि जे संशोधनासाठी उपयुक्त असते असे विधान म्हणजे गृहितक होय.

..एस.बोगास- परिक्षण केल्या जाणाऱ्या विधानास गृहितक असे म्हणतात.

 वरील व्याख्यावरून गृहितकाचा अर्थबोध होण्यास मदत मिळते. साधारणतः गृहितक हे अनुमान या अंदाज व्यक्त करणारे विधान आहे. ते संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात शोधलेले संभाव्य उत्तर असते आणि परिक्षणानंतर त्यांची सत्यता निश्चित होते. संशोधनाला दिशा या मार्गदर्शन करण्याचे काम करते.

गृहितकाची उगमस्थाने- संशोधनासाठी गृहितक आवश्यक असतात. गृहितकाची अनेक उगमस्थाने अभ्यासकांनो नमूद केलेली आहेत.

. व्यक्तिगत अनुभव

. सामान्य संस्कृती

.सादृष्य वा सारखेपणा

. सिद्धांत- 

गृहितकाचे महत्त्व- संशोधन कार्यात तथ्यसंकलनाइतके गृहितक निर्मितीला महत्त्व दिले जाते. गृहितकाशिवाय संशोधनाला योग्य दिशा गवसणार नाही. समुद्रात भरकटणाऱ्या जहाजांना दिशा दाखविण्याचे काम दीपस्तंभ करतो. ती भूमिका संशोधनात गृहितके पार पाडतात. अनावश्यक आणि विस्कळीत माहितीच्या ढिगाराऱ्यापासून बचावासाठी गृहितके उपयोगी पडतात. गृहितकांचे महत्त्व पुढील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करता येते.

 १.संशोधनास दिशा प्रदान करते. 

.अध्ययनास निश्चितता प्राप्ती

. अध्ययन क्षेत्र मर्यादित राहते. 

. संशोधनाची उद्देश स्पष्टता

५.तथ्य संकलनास सहाय्यक

६.निष्कर्ष काढण्यास सहाय्यक

७.वेळ आणि पैसाची बचत- 

८. सिद्धांत निर्मिती

सविस्तर माहितीसाठी येते क्लीक करा

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...