मंगळवार, २२ मार्च, २०२२

वस्तुनिष्ठता म्हणजे काय

 वस्तुनिष्ठता म्हणजे काय ते सांगुन वस्तुनिष्ठता प्राप्तीतील अडथळयांची चर्चा करा.

(Objectivity) सामाजिक संशोधनात व्यक्तिनिष्ठ अभ्यास आणि वस्तुनिष्ठ संशोधन हे दोन प्रकार आहेत. व्यक्तिनिष्ठता ही एक विचारशक्ती असते. ती शैक्षणिक पार्श्वभूमी, प्रशिक्षण, बौद्धिक क्षमता आणि तात्त्विक दृष्टीकोन या घटकातून विकसित होते. या सर्व घटकांच्या प्रभावामुळे प्रत्येक समस्येकडे बघण्याचा आणि अर्थ लावण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन व्यक्तीत विकसित झालेला असतो. व्यक्तिनिष्ठ संशोधनात संशोधकाच्या विकसित झालेल्या दृष्टीकोनाचा प्रभाव पडत असतो त्यासोबत संशोधकाचा पूर्वग्रहाचा देखील प्रभाव पडत असतो. पूर्वग्रहाचे अस्तित्व अभ्यास विषयातील लक्षात आलेले सत्य लपविण्याचा प्रयत्न करते. संशोधन कार्य पूर्वग्रहावर आधारित असता कामा नये. वस्तुनिष्ठता पूर्वग्रहाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

वस्तुनिष्ठताचा अर्थ व्याख्या- वस्तुनिष्ठता म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी केलेल्या व्याख्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उदाहरणासाठी काही विचारवंतांनी केलेल्या वस्तुनिष्ठतेच्या व्याख्या पुढील प्रमाणे होत.

.ग्रीन-निष्पक्षपणे घटनेचे, समस्येचे परीक्षण म्हणजे वस्तुनिष्ठता होय.

२.जे कार- सत्याची वस्तुनिष्ठता म्हणजे असाधारण किंवा अद्भुत जग कोणत्याही विश्वास, आशा. एक वास्तविकता आहे. ज्याचा शोध आपण अंतःदृष्टी किंवा कल्पनाद्वारे नाही तर वास्तविक निरीक्षणातून घेतो.

वस्तुनिष्ठतेच्या समस्या वा वस्तुनिष्ठता प्राप्तीतील अडथळे- शास्त्रीय संशोधनात निष्पक्षपातीपणा पुराव्याच्या आधारावर काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठतेची साक्ष देतात परंतु सामाजिक संशोधनात नैसर्गिकशास्त्र आणि विज्ञानासारखी वस्तुनिष्ठता निर्माण करणे अनेकदा शक्य होत नाही. सामाजिक घटनाचे सर्व पैलू संशोधकाच्या दृष्टोत्पतीला येत नाही. विशिष्ट परिस्थिती निर्माण करून प्रयोग देखील करता येत नाही. संशोधक हा समाजव्यवस्थाचा एक घटक असतो. समाजव्यवस्थाचा एक घटक या नात्याने समाजातील संस्कृती, पूर्वग्रह, परंपरा, श्रद्धा भावनेचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. या प्रभावामुळे समाजात संशोधत वस्तुनिष्ठतेपेक्षा व्यक्तिनिष्ठेकडे जास्त झुकते. शंभर टक्के बिनचूक संशोधन पद्धती वापरणे अशक्य आहे. वस्तुनिष्ठतेवर परिणाम करणान्या घटकावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही

वस्तुनिष्ठता प्राप्तीची साधने- संशोधनाला वैज्ञानिक शास्त्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी ते वस्तुनिष्ठतेच्या कसोटी केले पाहिजे. मॅक्स वेबरसारख्या अभ्यासकांच्या मतानुसार सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता राखणे अवघड असते तर दुर्खीमच्या मतानुसार सामाजिक संशोधन हे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केली जाऊ शकते

वस्तुनिष्ठतेचे महत्त्व आवश्यकता- अनुभवाधिष्ठित आणि शास्त्रीय संशोधनात वस्तुनिष्ठता अत्यंत महत्वाची मानली जाते. वस्तु, घटना आणि समस्या जशी आहे तशी पाहणे किंवा चितारणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय. वस्तुनिष्ठता म्हणजे पूर्वग्रहाचा प्रभाव पडू देता संशोधन समस्येचा अभ्यास करणे होय. पक्षपात, पूर्वग्रह आणि व्यक्तिगत मताचा संशोधनावर प्रभाव पडत असतो. सामाजिकशास्त्रातील संशोधनात वस्तुनिष्ठता सांभाळणे अनेकदा कठीण बनते, अध्ययन करताना कळतनकळत संशोधकाच्या वैयक्तिक कल,विचार, पूर्वग्रह याचा प्रभाव पडण्याची शक्यता असते. वारंवार केलेल्या चाचण्या आणि निरीक्षणातून हाती आलेले अनुमान वा निष्कर्ष सारखे येणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय. वूल्फ यांच्या मते, "घटनेचे सकृतदर्शनचे स्वरूप, प्रचलित कल्पना व्यक्तिगत इच्छा आदींनी प्रभावित होता निश्चय व खरीखुरी वस्तुस्थिती स्वीकारण्याची वृत्ती हीच गाढ ज्ञानाची पहिली गरज आहे. " सामाजिकशास्त्रात सत्याचा शोध घेण्यासाठी वस्तुनिष्ठतेची नितांत गरज असते. संशोधनावरील व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव कमी करून संशोधन शास्त्रीय बनवण्यासाठी वस्तुनिष्ठतेचा आधार घेतला जातो. सामाजिक संशोधनात एखादया घटनेचा किंवा  समस्एच विचार हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून होणे आवश्यक असते. वस्तुस्थितीदर्शक दृष्टिकोन समजून घेताना पूर्वग्रह घटनेबाबत खात्री न करता विचारांचा प्रभाव पडण्याची शक्यता असते. अनेक संशोधनकर्त्यांनी एकाच घटनेचा अभ्यास करून सामान्य निष्कर्ष काढलेले असतात त्याला वस्तनिष्ठता असे म्हणतात.

१. राज्यशास्त्राला वैज्ञानिक दर्जा प्राप्तीसाठी

२.निष्पक्ष निष्कर्ष प्राप्ती

३. योग्य प्रतिनिधिक तथ्य प्राप्ती

४.वैज्ञानिक पद्धतीचा वापर यशस्वी करणे

५.पडताळणी करणे

६. नवीन संशोधनाला चालना

सविस्तर माहितीसाठी येथे क्लीक करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video