रविवार, ३१ जुलै, २०२२

महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा रचना व कार्य- Maharashtra University Senate Composition and Function

महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा रचना व कार्य-

Maharashtra University Senate Composition and Function

    अधिसभा ही सर्व वित्तीय अंदाजाकरिता आणि अर्थसंकल्पीय विनियोजन आणि विद्यमान आणि भविष्यातील शैक्षणिक कार्यक्रमाच्या बाबतीत सामाजिक परिणामांची माहिती देण्याकरिता प्रमुख प्राधिकरण आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 कलम 28 (2) मध्ये   अधिसभेची रचना दिलेली आहे.

विद्यापीठ अधिसभा कार्यकाल व बैठक-

  •    विद्यापीठ अधिसभेचा पाच वर्षाचा कालावधी असतो.
  •       कुलपती हा विद्यापीठ अधिसभेचा अध्यक्ष असतो. त्याच्या अनुपस्थितीत कुलगुरू अध्यक्ष असतो.
  •      विद्यापीठ अधिसभेची वर्षातून दोन बैठका होतात. त्यांचा दिनांक निश्चित करण्याचा अधिकार कुलपतींना असतो.

अधिसभा  पदसिद्ध सदस्य-

 कुलपती, कुलगुरू, प्र कुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता, संचालक परीक्षा व मूल्यमापन, वित्त व लेखा अधिकारी, विद्यापीठ उप परिसराचे संचालक, संचालक नवोपक्रम, नव संशोधन व साहचर्य, संचालक उच्च शिक्षण किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला सहसंचालक दर्जाचा व्यक्ती, संचालक तंत्र शिक्षण किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला सहसंचालक दर्जाचा व्यक्ती, संचालक, ज्ञान स्रोत केंद्र, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, संचालक, क्रीडा व शारीरिक  शिक्षण, संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ, विद्यापीठाचा विद्यार्थी परिषद अध्यक्ष आणि सचिव

 अधिसभा निर्वाचित सदस्य-

  •   प्राचार्य गटातून दहा निर्वाचित सदस्य-S.T, S.C.,N.T, OBC, Women  प्रत्येकी  प्रवर्गातील एक सदस्य आणि उर्वरित पाच सदस्य खुला प्रवर्गातील
  •        संलग्न महाविद्यालयातील व्यवस्थापनाची सहा प्रतिनिधी- S.T, S.C.,N.T, OBC,  प्रवर्गातून आळीपाळीने किमान एक सदस्य आणि एक महिला सदस्य आणि उर्वरित तीन सदस्य खुला प्रवर्गातील
  •      संलग्न महाविद्यालयातील अध्यापकांचे दहा प्रतिनिधी- सदस्य-S.T, S.C.,N.T, OBC, Women  प्रत्येकी  प्रवर्गातील एक सदस्य आणि उर्वरित पाच सदस्य खुला प्रवर्गातील
  •   नोंदणीकृत पदवीधर गटातील दहा प्रतिनिधी- S.T, S.C.,N.T, OBC,  प्रवर्गातून आळीपाळीने किमान एक सदस्य आणि एक महिला सदस्य आणि उर्वरित पाच सदस्य खुला प्रवर्गातील
  •   विद्यापीठ अध्यापक गटाचे तीन सदस्य- S.T, S.C.,N.T, OBC,  प्रवर्गातून आळीपाळीने किमान एक सदस्य आणि एक महिला सदस्य आणि उर्वरित एक सदस्य खुला प्रवर्गातील

अधिसभा नामनिर्देशित सदस्य-

·      कुलपती द्वारे दहा नामनिर्देशित सदस्य- त्यापैकी चार कृषी समाज कार्य सहकार, विधी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उरलेल्या सहापैकी उद्योग क्षेत्रातील, शिक्षणतज्ञ, पर्यावरण तज्ञ,

  • ·      कुलगुरू नामनिर्देशित दोन सदस्य- एक विद्यापीठ परिसरातील अध्यापकेतर कर्मचारी तर दुसरा संलग्न महाविद्यालयातील अध्यापकेतर कर्मचारी
  • ·      विधानसभा अध्यक्षांनी अडीच वर्षासाठी नामनिर्देशित केलेले दोन विधानसभा सदस्य
  • ·      विधान परिषद सभापतीने अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नामनिर्देशित  केलेला एक सदस्य
  • ·      कुलगुरूंनी एका वर्षासाठी नामनिर्देशित केलेला नगरपालिका किंवा महानगरपालिका सदस्य
  • ·      विद्यापीठ परिसरातील जिल्हा परिषद शिक्षण समितीचा एक वर्षाच्या आळीपाळीने नामनिर्देशित केलेला एक सदस्य

  अधिसभा अधिकार व कार्य-

  1. ·      विद्या, संशोधन, विकास, प्रशासन व व्यवस्था यासारखे विद्यापीठाचे आवश्यक असलेले सर्व क्षेत्रांमध्ये करता येऊ शकेल अशा सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्राधिकरणांना सूचना करणे.
  2. ·       विद्यमान विद्या विषयक कार्यक्रम व सहयोगी कार्यक्रम यांचे  पुननिरीक्षण करणे.
  3. ·      उच्च शिक्षणाच्या सामाजिक गरजांशी सुसंगत असे नवीन विद्या विषयक अध्ययनक्रम सुचवणे.
  4. ·      विद्यापीठाच्या विकास व सुधारणांसाठी उपाय सुचवणे
  5. ·      व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार सन्मान जनक पदव्या प्रदान करणे.
  6. ·      विद्यापीठाची  स्थूल धोरणे आणि कार्यक्रम यांचे पुननिरीक्षण करणे, सुधारणा व विकासासाठी उपाय सुचविणे.
  7. ·       विद्यापीठाचे वार्षिक वित्तीय पत्रक, लेखापरीक्षणावर अहवाल, अनुपालन अहवाल यावर चर्चा करणे आणि संमत करणे.
  8. ·      विद्या परिषदेने शिफारस केलेल्या महाविद्यालय आणि परिसंस्थांसाठी सम्यक  आणि वार्षिक योजनेस मंजुरी देणे.
  9. ·      विद्यापीठ  कुलसचिवाने सादर केलेला विद्यार्थी तक्रार निवारण  अहवालाचे पुननिरीक्षण करून  ते  स्वीकृत करणे.
  10. ·      संबंधित संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, क्रीडा व शारीरिक  शिक्षण विभागाने सादर केलेल्या अहवाल पुननिरीक्षण करून  ते स्वीकृत करणे.
  11. ·      विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य क्षेत्रात करता येतील अशा  सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्राधिकरणांना सूचना देणे.
  12. ·      विद्यापीठासाठी  परिनियम तयार करणे, त्यात सुधारणा करणे वा निरसित करणे




 

 

  

शनिवार, ३० जुलै, २०२२

राजकीय विकासाचे मूलभूत घटक, साधने आणि अभिकरणे Fundament Mean and Factor of Political Development

 

राजकीय विकासाचे मूलभूत घटक, साधने आणि अभिकरणे :-

Fundament Mean and Factor of Political Development

आधुनिक काळात राजकीय विकास संकल्पनेला महत्त्व प्राप्त होत आहेत. राजकीय विकास घडवून आणणारे अनेक घटक असतात. राजकीय विकास प्रक्रियेत राजकीय व्यवस्थेतील अंतर्गत आणि बाहय दबावाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. राजकीय विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यात शासन आणि शासनाशी संबंधित विविध संस्थाची भागीदारी महत्वपूर्ण मानली जाते त्यांनाच राजकीय विकासाची साधन किया अभिकरणे असेही म्हटले जाते. डॉड, रोस्टो इत्यादी विचारवंतांनी राजकीय विकासाचे पुढील मूलभूत घटक सांगितलेले आहेत.

१) राजकीय पक्ष :- राजकीय विकास प्रक्रियेला गती देण्यात राजकीय पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. राजकीय पक्षातून राजकीय नेतृत्वाची निर्मिती होत असते आणि नेतृत्व देशाच्या विकास प्रक्रियेला आकार देण्याची भूमिका बजावत असते. उदा. भारताच्या राजकीय विकासात नेहरू आणि इंदिरा गांधीचा वाटा मोठा राहिलेला असला तरी या नेतृत्वाला पाठवळ पुरविणान्या काँग्रेस पक्षाचे योगदानही कमी लेखता येणार नाही. विकसनशील देशात राजकीय जागृती मर्यादित असते. त्या देशातील लोकांमध्ये राजकीय विकासाची समज निर्माण करणे आणि अल्पसंख्य बुद्धिवान लोकांना राजकारणात आणून राजकीय नेतृत्व सोपविणे ही महत्त्वाची भूमिका राजकीय पक्षांनी पार पाडलेली आहे. राजकीय पक्षाचे राजकीय विकासातील योगदान लोकशाही नव्हेतर सर्वकष व्यवस्थेत देखील महत्त्वपूर्ण असते. सर्वकष सत्तावादी राजवटी राजकीय पक्ष राजकीय विकासाचे कार्य करतात. उदा. रशिया, चीन देशात साम्यवादी पक्ष हे सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रमुख साधन बनले आहेत. राजकीय पक्षाशिवाय लोकशाहीची कल्पना करता येणार नाही. राजकीय पक्ष लोकशाहीला गतिमान करण्यासोबत राजकीय विकासाला गती देण्याचेही कार्य करत असतात. राजकीय पक्षाचे कार्याचा विचार दोन दृष्टीने केला जातो. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी राजकीय पक्ष जनमतांचा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी विकासाच्या नव्या नव्या योजना आखत आणतात व त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. शासन पद्धती कोणत्याही प्रकारची असली तरी राजकीय विकासाच्या बाबतीत राजकीय पक्षाचे अमान्य करता येणार नाही. मात्र एकपक्षीय राजवटीपेक्षा बहुपक्षीय राजवटी असलेल्या देशात होणारा राजकीय विकास अधिक परिपक्क व संतुलित स्वरूपाचा असतो.

२) लष्करी बळ :- सध्याच्या काळात राजकीय व्यवस्थेमध्ये सैन्यशक्तीला दिवसेंदिवस महत्व प्राप्त होत आहेत. भारताच्या शेजारी राष्ट्रामध्ये सैन्यच राजकीय व्यवस्था चालवितात. अनेक देशात नागरी सत्ता लयास जाऊन देशात लष्करी सत्ता प्रस्थापित होत आहेत. कारण लोकांना अपेक्षित असलेला राजकीय विकास घडवून आणण्यास नागरी सत्ता अपयशी ठरल्यास सैन्याने सत्ता हाती घ्यावी हे लोकमत अपेक्षित करत असते. लोकशाही शासनव्यवस्था अपयशी ठरलेल्या अनेक देशात राजकीय विकासाची पार्श्वभूमी विकसित करण्यात लष्कराने मोलाची भूमिका बजावलेली आहे. लष्करी सत्ता देखील जनमताचा पाठिंबा मिळविण्यासाठी नव्या नव्या कल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. उदा. पाकिस्थानात जनरल अयुबखान यांच्या राजवटीच्या काळात अनेक संकल्पना व योजना राबविण्यात आलेल्या होत्या. हटिंगटनच्या मते, सैन्याचा हस्तक्षेप सैन्याद्वारे राज्यकारभारात होता आणि त्यांची नागरी प्रशासनापासून मुक्ती होते हे राजकीय विकासाचे लक्षण मानले जाते. लष्कराच्या माध्यमातून राजकीय विकास साध्य होत असला तरी तो विकास धोकादायक वा एकांगी स्वरूपाचा असतो. लष्कर अनेकदा विकासासाठी सक्ती किंवा दडपशाही मार्गाचा अवलंब करत असते त्यातून विद्रोह निर्माण होत असतो. लष्करी राजवट पूर्वग्रहाच्या माध्यमातून विशिष्ट समाज गटांचा विकास करते इतरांच्या विकासकडे दुर्लक्षही करते किंवा काही घटकांना दडपून टाकण्याचे प्रयत्न देखील करत असते त्यामुळे लष्कराच्या माध्यमातून होणारा विकास हा अनेकदा सर्वसमोवशक नसतो.

३) सुबुद्ध व गतिशील नेतृत्व :- राजकीय विकास राजकीय परिवर्तनाचे एक गतिशील स्वरूप असते. कोणतेही परिवर्तन शीघ्र गतीने करण्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज असते. गतिशील राजकीय नेतृत्वातून राजकीय विकासाची प्रक्रिया वेग घेत असते. राज्यकारभारातील उणिवा दूर करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी गतिशील नेतृत्व प्रयत्न करत असते. उदा. भारतात पंडित नेहरू सारख्या नेत्यामुळे भारताच्या विकासाची प्रक्रिया गतिमान झाली. समाजाच्या आशा आकांक्षा आणि प्रशासन यांची सांगड नेत्याला घालता आली तर नेतृत्वाभोवती आदर व दिव्यवलयी कवच निर्माण होते अशा नेत्याला राजकीय विकास सहज घडवून आणता येतो. अशा नेतृत्वाने केलेल्या कार्याला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळतो.

४) राजसत्तेचे नेतृत्व :- वास्तविक हा शासन प्रकार परंपरागत व प्राचीन काळाचा मानला जात असला तरी आधुनिक काळात राजकीय विकासात यांचे योगदान दिसते. राजसत्तेने दूरदृष्टीने विद्युतवेगाने राजकीय विकास घडवून आणता येता. आजही सौदी अरेबिया, कुवत आणि मध्य पूर्वतील अनेक देशात राजसत्ता राजकीय विकासाची प्रमुख साधन बनली आहे. राजसत्तेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकीय विकासाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्याशिवाय राजसत्तेला अधिमान्यता मिळणार नाही.

५) समाजाचा सहभाग :- राजकीय विकासाच्या गतीवर सामाजिक परिस्थिती व समाजाच्या सहभागाचा फार मोठा परिणाम घडून येतो. राजकीय व्यवस्था आणि सामाजिक रचना हे परस्परांशी निगडीत असतात. समाजाची स्थिती, समाजाची विचारसरणी आणि समाजाचा राजकीय व्यवस्थेतील सहभाग यावर राजकीय सहभाग अवलंबून असतो. ज्या समाजातील जनता राजकीय व्यवस्थेत सहभागी होत नाही तेथील राजकीय विकास खुंटतो. सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी समाजात गतिशील नेतृत्व असणे आवश्यक असते. नेतृत्व प्रेरणा, उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करून समाजाला विकासाच्या मार्गात सहभागी करू शकतो.

६) राजकीय व्यवस्थेची समर्थता :- आधुनिक काळात जनतेच्या शासनाबद्दलच्या अपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या आहेत. त्यातून समाजाच्या राजकीय मागण्या वाढलेल्या आहेत. त्या मागण्यांचे धोरण व निर्णयात रूपांतर करून राजकीय व्यवस्था आपले सामर्थ्य वाढवू लागला की राजकीय विकास घडून येतो पण हे लोकशाही व्यवस्थेत शक्य असते. कारण लोकशाही नोकरशाही राजकीय विकासाचे माध्यम म्हणून कार्य करत असते. वैधानिक, प्रशासकीय व राजकीय पातळीवर नोकरशाहीच्या मदतीने राजकीय विकास घडवून आणू शकतात.

७) आधुनिक नोकरशाही :- काही विचारवंताच्या मते राजकीय विकासात नोकरशाहीची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असते. नोकरशाही ही शासनाला स्थिरता देण्याचे कार्य करत असते. परपरागत समाजाला आधुनिक बनविण्याचा प्रयास करत असते. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोवर योग्य ध्येयधोरणे आखून राजकीय विकासाला गती देण्याचे कार्य करीत असतात. आधुनिक नोकरशाही यंत्रणेमुळे राजकीय व्यवस्थेला स्थायित्व प्रदान झालेले आहे. त्यामुळे आधुनिक काळात नोकरशाही राजकीय विकासाचे एक साधन मानली जाते. विकसनशील देशात राजकीय विकासात नोकरशाहीने सुरुवातीच्या काळात प्रभावी भूमिका बजावलेली होती. परंतु आधुनिक काळात भ्रष्टाचार, राजकीय सत्तेचा गैरवापर, राजकीय हस्तक्षेपाला बळी पडणे इत्यादीमुळे नोकरशाही जनआकांक्षाची पूर्तता करण्यात असफल ठरत असल्यामुळे राजकीय विकासासाठी त्यात सुधारणा करणे गरजेचे ठरले आहे.

८) राष्ट्रीयत्वाची भावना :- राष्ट्रीयत्वाची भावना राजकीय विकासाचे साधन मानले जाते. जनतेत राष्ट्राविषयी आत्मीयता, जिव्हाळा आणि निष्ठा असेल तर जनता राजकीय विकासासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध होईल. राष्ट्रीयत्वाच्या भावना असलेल्या देशात राजकीय एकता आणि राजकीय स्थिरता मोठया प्रमाणावर आढळत असते हे सिद्ध झालेले आहे. राजकीय एकता आणि राजकीय स्थिरता या दोन्हीची राजकीय विकासासाठी आवश्यकता असते म्हणून राष्ट्रीयत्वाची भावना ही राजकीय विकासाचे साधन ठरते.

९) जन सहभाग :- जनसहभाग राजकीय विकासाचा एक घटक आधुनिक काळात मानला जातो. म्हणूनच आधुनिक काळात सर्वच देश राजकीय सहभागाला प्रोत्साहन देतात. जनसहभागातून जनतेची सामाजिक आणि राजकीय समज विकसित होत असते. जनसहभागातून राजकीय व्यवस्थेला मोठया प्रमाणावर अधिमान्यता मिळवून राजकीय स्थिरता निर्माण होत असते. जनसहभागामुळे राजकीय व्यवस्थेचे कायदे, नियम आणि ध्येयधोरणाची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते. अंमलबजावणीसाठी जनतेचे सहकार्य मिळाल्यास दंडशक्तीच्या वापराची गरज नसते. म्हणूनच जनसहभाग हा राजकीय विकासाचा एक घटक मानला जातो.

१०) साम्यवादी नमुना :- राजकीय विकास घडविण्याचे मुख्य साधन म्हणजे साम्यवादी शासन व्यवस्था असल्याचे अनेक विचारवंताचे मत आहे. १९१७ साली लेनिनने मार्क्सवादाच्या आधारावर सर्व राजकीय शक्ती केंद्रीत करून अल्पकाळात रशियाचा विकास घडवून आणला. रशियाच्या विकासापासून प्रेरणा घेऊन चीन व साम्यवादी देशानी राजकीय विकास घडवून आणला. साम्यवादी विकास मॉडेलने प्रभावित होऊन विचारवंत या विकास प्रतिमाचे समर्थन केले करू लागलेले आहेत. लोकशाही देशात विकासाची संथ आणि दीर्घकालीन असते. त्यामुळे कम्युनिस्ट देशातील विकास प्रक्रिया गतीशिल असते. कारण राजकीय विकास संकल्पनेला विचारसरणीचे स्वरूप प्राप्त करून दिले जाते व त्यासंबंधीची लोकांमध्ये एक प्रकारची जाणीव, निष्ठा निर्माण केली जाते. त्यामुळे राजकीय विकासाचा हा नवीन नमुना सर्वमान्य नाही. त्यांच्या यशाबद्दल शंका आहेत.

राजकीय विकास संकल्पना अर्थ, स्वरूप आणि विविध दृष्टिकोन Political Development Meaning, Nature and Approaches

 राजकीय विकास संकल्पना अर्थ, स्वरूप आणि विविध दृष्टिकोन: Political Development Meaning, Nature and Approaches

आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासात राजकीय विकास संज्ञेला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय परिर्वतन ही जुनी संकल्पना आहे. आधुनिक राज्यशास्त्राचा राजकीय परिवर्तनाविषयीच्या धारणा, आकलन आणि दृष्टिकोन पारंपरिक राज्यशास्त्रज्ञांपेक्षा पूर्णपणे भिन्न दिसून येतो. राजकीय परिवर्तनाविषयीचे मार्क्सवादी विश्लेषणाला नाकारून पर्यायी विकास प्रतिमान विकसित करण्यासाठी नवोदित राष्ट्रांनी पाश्चिमात्य देशातील संस्थाचा स्वीकार करून आपल्या कार्याला सुरुवात केली पण भिन्न सामाजिक वातावरण असलेल्या विकसनशील देशात पाश्चिमात्य राजकीय प्रक्रिया विशेष फायदेशीर ठरू शकल्या नाहीत. त्यामुळे त्या देशातील राजकीय प्रमुखांनी पाश्चिमात्य दृष्टीकोन वगळून एक नव्या पद्धतीचा स्वीकार करून आपले विकासविषयक कार्य करण्यास सुरुवात केली. त्यातून राज्यशास्त्रात राजकीय विकास आणि आधुनिकीकरण संकल्पना अस्तित्वात आल्या. त्यातूनच आधुनिक राज्यशास्त्राची अभ्यास मर्यादा पाश्चिमात्य देशातील प्रश्नापुरती मर्यादित न राहता नवोदित राष्ट्रांच्या राजकीय समस्याचाही अभ्यास व्हावा हा व्यापक वा उदार दृष्टिकोन निर्माण झाला.

राजकीय विकास अर्थ व व्याख्या :-

राजकीय विकास संकल्पनेवर अनेक अभ्यासकांनी अध्ययन केले आहे. जगातील विविध अभ्यासकांनी राजकीय विकासाचे भिन्न भिन्न अर्थ लक्षात घेतलेले आहेत. या अर्थाच्या आधारावर विविध व्याख्या केलेल्या आहेत त्यामुळे राजकीय विकासाच्या अर्थ आणि व्याख्याबाबत विचारवंतात एकमत दिसून येत नाही. जगातील विविध विचारवंतानी राजकीय विकासाच्या पुढील व्याख्या केलेल्या दिसतात.

१) आयसेन्टाड : सातत्याने होणाऱ्या बदलास पचविण्याची क्षमता असणारी संस्थात्मक यंत्रणा निर्माण होणे म्हणजे राजकीय विकास होय.. २) हालपर्न:- स्थायी स्वरूपाच्या क्रांतीशी जमवून घेण्याची सततची क्षमता म्हणजे राजकीय विकास होय.

३) सॅम्युएल हंटिग्टन- प्रतियोग क्षमता, गुंतागुंत, स्वायत्तता व सुसंगती या बाबतीत उच्च पातळी साधलेल्या राजकीय संस्थांची निर्मिती म्हणजे राजकीय विकास होय.

४) मेकंझी : राजकीय विकास म्हणजे समाजाच्या उच्चस्तरीय अनुकुल असणाऱ्या बाबींविषयीची अनुकूलता असण्याची क्षमता होय.

राजकीय विकासाचे विविध दृष्टिकोन :-

राजकीय विकास संकल्पनेबाबत विचारवंतामध्ये एकमत नाही. राजकीय विकासाचे विविध दृष्टिकोनविचारवंतांनी विशद केलेले आहेत ते पुढीलप्रमाणे होत.

१) राजकीय विकास म्हणजे आर्थिक विकासाचे साधन :- राजकीय परिस्थिती आर्थिक विकासाला कारणीभूत असते. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी अगोदर राजकीय विकास आवश्यक आहे असे मानले जाते पण हा राजकीय विकासाचा नकारात्मक अर्थ आहे. प्रत्येक समाजाचे आर्थिक प्रश्न निरनिराळे असतात आणि त्या संदर्भात जर आपण राजकीय विकासाचा विचार करु लागला तर राजकीय विकास समाजपरत्वे भिन्न भिन्न स्वरूपाचा होऊ शकतो. अविकसित देशात आर्थिक बाबींपेक्षा राजकीय बाबींना जास्त महत्त्व असते. या देशातील लोकांचे लक्ष राजकीय विकासाकडे जास्त असते की जो आर्थिक विकासापासून स्वतंत्र असतो. म्हणून राजकीय विकास ही संकल्पना आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून मांडली जाते.

 २) राष्ट्रराज्याचा विकास म्हणजे राजकीय विकास :- राष्ट्रराज्याची बांधणी म्हणजे राजकीय विकास असे ही म्हटले जाते. पारंपरिक काळात राज्य ही संस्था एक तांत्रिक संरचना मानली जात होती. राज्याची कार्य देखील मर्यादित होती. परकिय आक्रमणापासून संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था राखणे इतपत राज्याची भूमिका मर्यादित होती म्हणून राज्याबद्दल जनतेत फारशी आत्मीयता नव्हती. आधुनिक काळात राष्ट्र राज्याची संकल्पना उदयाला आली आहे. राष्ट्र या संकल्पनेतून राज्याविषयी जनतेत आत्मीयता व जिव्हाळा निर्माण झालेला आहे. राष्ट्र राज्य संकल्पनेमुळे जनतेत राष्ट्रासाठी त्याग करण्याची वृत्ती निर्माण झालेली आहे. राष्ट्र राज्य संकल्पनेच्या माध्यमातून जनतेला राजकीय सहभाग आणि राजकीय विकासात भागीदारी देणे शक्य झालेले असल्यामुळे राष्ट्रराज्याच्या राजकीय संस्थाच्या संदर्भात चालणारे राजकारण म्हणजे राजकीय विकास मानला जातो.

३) राजकीय विकास म्हणजे आधुनिकीकरण :- आधुनिक काळात औद्योगिकदृष्टया प्रगत व विकसित राष्ट्र निर्मिती म्हणजे राजकीय विकास हा विचार मांडला जातो. कारण पाश्चिमात्य देशांनी औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाच्या माध्यमातून राजकीय विकास साध्य केलेला आहे. पाश्चिमात्य देश औद्योगिकदृष्टया संपन्न आणि पुढारलेले आहेत. पाश्चिमात्य देशातील औद्योगिकीकरण आणि नागरीकरणातून नवीन राजकीय प्रथा आणि परंपरा विकसित झालेल्या आहेत. म्हणून राजकीय विकासाची संकल्पना आधुनिकीकरणाच्या माध्यमातून मांडली जाते. राजकीय आधुनिकीकरण झालेल्या देशात कायदे, नियम राजकीय संस्थांना अतिशय आधुनिक व प्रगत स्वरूप प्राप्त केलेले दिसते तिसऱ्या जगातील बहुसंख्य देशांनी राजकीय विकासाचा हाच मार्ग अवलंबिलेला दिसतो.

४) राजकीय विकास म्हणजे प्रशासकिय व वैधानिक विकास :- राजकीय व्यवस्थेजवळ सार्वजनिक प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता असली पाहिजे. सार्वजनिक प्रश्नाचे निराकरण करण्याची क्षमता असलेल्या राजकीय व्यवस्थेला विकसित मानता येणार नाही. आधुनिक काळात सार्वजनिक आणि सामुदायिक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सर्व राजकीय व्यवस्थेत प्रशासकिय आणि वैधानिक यंत्रणाची निर्मिती केलेली आहे. पारंपरिक काळातील प्रशासकीय यंत्रणा आणि संस्था अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या कार्य करत होत्या त्यांचे कार्य कायदा व सुव्यवस्था आणि परकिय आक्रमणापासून संरक्षण एवढ्यापुरते मर्यादित होते. पाश्चिमात्य देशात उदयाला आलेल्या कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे जनकल्याणासाठी नव्या नव्या प्रशासकीय यंत्रणा आणि वैधानिक व्यवस्थाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाशीमात्य देशाच्या प्रभावामुळे तिसऱ्या जगातील देशात नव्या नव्या प्रशासकीय व वैधानिक व्यवस्था अस्तित्वात आल्या व त्यांचा अजूनही विकास होत आहे. त्यामुळे प्रशासकीय व वैधानिक विकासाला राजकीय विकास म्हटले जाते.

५) राजकीय विकास म्हणजे लोकांचा सहभाग :- जनता सहभाग आणि विकासात भागीदारीतून राजकीय विकास हा राजकीय विकासाचा आधुनिक दृष्टिकोन आहे. राजकीय जागृतता आणि नागरीकत्वाच्या भावनेचा विकास होणे राजकीय विकासासाठी अनिवार्य आहे. जनता राजकीयदृष्टया जागृत झाल्याशिवाय दैनंदिन प्रशासनात सहभाग घेणार नाही जनसहभागाशिवाय कोणतीही व्यवस्था विकसित होणार नाही. खन्या अर्थानि जनता राजकीय विकासात सक्रिय होईल तेव्हा शासनाला देखील जनताभिमुख बनण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आधुनिक काळात जगातील बहुसंख्य देशांनी लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केलेला आहे तरीही अपेक्षित राजकीय विकास दिसून येत नाही. जनता आंदोलने, उपोषणे, संप, बंद, हरताळ मार्गाचा अवलंब करून राजकीय सहभाग घेतील तर विकासाच्या मार्ग सूकर होण्याऐवजी बिकट होईल. जनतेचा राजकीय सहभाग हा सकारात्मक असला पाहिजे राजकीय व्यवस्थेला अडचणीचा ठरता कामा नये म्हणून आधुनिक काळात जनसहभागातून राजकीय विकास हा दृष्टिकोन मांडला जातो. या दृष्टिकोनानुसार राजकीय विकासासाठी जनतेची सक्रिय भागीदारी अपेक्षित केली जाते.

६) राजकीय विकास म्हणजे लोकशाहीकरण- लोकशाही हा अंत्यत प्रगत शासन प्रकार मानला जातो. जगातील जवळजवळ सर्वच राष्ट्रटांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीला बळकटी आणून देण्याची प्रक्रिया आहे तिला राजकीय विकास म्हणतात. लोकशाही ही शासनप्रणाली नसून जीवनप्रणाली आहे हा विचार विकसित करणे राजकीय विकासासाठी आवश्यक मानले जाते. लोकशाही मूल्यांची समाजात रूजवणूक करणे राजकीय विकासाकरिता अपरिहार्य मानले जाते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाही मूल्यावर जनतेची निष्ठा असली पाहिजे. म्हणूनच जगातील लोकशाहीवादी देश लोकशाही मूल्यांचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतात. हुकूमशाही जुना व अपरिपक शासन प्रकार आहे. राजकीय विकासाच्या संदर्भात लोकशाही शासनप्रकार उत्तम मानला जातो. त्यांची वाढ व बळकट करणे म्हणजे राजकीय विकास होय.

७) राजकीय विकास म्हणजे स्थैर्य- स्थैर्य हा राजकीय विकासाचा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. लोकशाही शासन प्रकार कितीही चांगला असला जरी त्याला स्थैर्य नसेल तर त्या देशाचा विकास होऊ शकणार नाही. जलदगतीने देशाचा विकास करायचा असेल तर राजकीय आणि आर्थिक स्थैर्याची गरज असते. स्थैर्य असेल तर दूरगामी धोरणे आखून नियोजनपूर्वक आणि मुल्यवस्थिपणे देशाचा विकास घडवून आणता येतो. अर्थात राजकीय विकासाचा संबंध स्थैर्याशी जोडतांना स्थिरता राजकीय विकासाला कितपत सहाय्य करते याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. स्थैर्य म्हणजे राजकीय विकास हे समीकरण अनेकदा फसवे ठरलेले आहे.

८) राजकीय विकास म्हणजे शासकिय शक्ती- राजकीय विकास राजकीय सत्तेची सूत्रे असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा फार मोठा वाटा असतो. राज्यकारभार ज्यांच्या हातात असतो त्यांची शक्ती म्हणजे राजकीय विकासाचे मुख्य साधन होय. जुन्या काळात शासकीय शक्तीचे एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रीकरण असतानाही राजकीय विकास झाला नाही कारण शासकीय शक्तीत सामान्य जनतेला अजिबात वाव नव्हता. युरोपातील प्रबोधन युगानंतर लोकांनी शासकीय शक्तीत सहभाग दर्शविण्यास प्रारंभ केला. राज्यकत्र्यावर्गाला शासकीय शक्ती जनहितासाठी दिलेली आहे या दृष्टिकोनाच्या प्रसारानंतर मोठया प्रमाणावर शासकीय शक्तीने जनविकासाच्या योजना हातात घेऊन राजकीय विकासाला वेग दिला. औदयोगिकरणामुळे निर्माण पोस्ट, तार, रेल्वे आणि दळणवळणसाधनांच्या विकास इ. भौतिक सुधारणामुळे शासनाला आपली शक्ती अधिक विस्तृत करता आली. त्यामुळे राजकीय विकासाला अनुकूल परिस्थिती आधुनिक काळात निर्माण झालेली दिसते.

९) राजकीय विकास म्हणजे विविध साधनांची जुळवाजुळव :- राजकीय व्यवस्था समाजभिमुख आणि समाजविकासास लाभदायक असली पाहिजे असे आधुनिक काळात मानले जाते. समाजविकासाच्या दृष्टीने लोकशाही शासनप्रणाली अपुरी आहे असे काही विचारवंताना वाटते त्यांनी कार्यक्षमतेच्या आधारावर शासन संस्थेने आणि राजकीय विकासाचे काही नमूने विकसित केलेले आहे. बलशाली राजवटीत निर्णय घेणाऱ्या शक्ती बलसंपन्न असतात. देशात उपलब्ध असलेली साधनसामुग्री जास्तीत जास्त प्रमाणात एकत्र करून त्याचा पुरेपूर उपयोग करण्याची शक्ती म्हणजे राजकीय विकास मानला जातो. परंतु आधुनिक काळात लोकशाही शासनव्यवस्थेत लोकांच्या संमती व सहकार्याने साधनसामुग्रीची जुळवाजुळव हुकूमशाहीपेक्षा अधिक प्रभावीपणे करताना दिसतात.

१०) राजकीय विकास म्हणजे सामाजिक बदल- सामाजिक हे अनेकदा राजकीय विकास घडवून आणतात. समाजातील वेगवेगळया दिशेने होणान्या बदलाचा राजकीय विकासावर निश्चितपणे परिणाम होत असतो. समाजातील आर्थिक व सामाजिक रचना राजकीय विकासाला कारणीभूत ठरत असतात. समाजव्यवस्थेत ज्या मार्गाने बदल होत जाईल त्या मागनि राजकीय विकास साधला जाईल म्हणून राजकीय म्हणजे सामाजिक बदल असे मानले जाते.

अशा  प्रकारे राजकीय विकासाचे विविध दृष्टिकोन सांगता येतात.

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...